Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Crime
विविध व्हायरल दाव्यान्नी मागील आठवड्यातही धुमाकूळ घातला. पुण्यात एका हिंदू तरुणीवर मुस्लिमाने जीवघेणा हल्ला केल्याचा दावा करण्यात आला. नाशिक रोड रेल्वे स्टेशनवर कुत्र्यांचे मांस पकडण्यात आले आहे, असा एक दावा झाला. समान नागरी कायद्यासाठी समर्थन देण्यास एका क्रमांकावर मिस कॉल देण्याचे आवाहन करण्यात आले. कर्नाटक सरकारने सुरु केलेल्या मोफत बससेवा योजनेचा लाभ घेताना एका महिलेला हात गमवावा लागला, असा दावा झाला. जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना प्रवेश देण्यापासून रोखले असा दावा झाले. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्ट चेक या रिपोर्ट मध्ये पाहता येतील.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना दिल्लीतील जगन्नाथ मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यापासून रोखण्यात आले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

कर्नाटकात मोफत बस प्रवास योजनेचा लाभ घेण्याच्या प्रयत्नात महिलेने हात गमावला असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

महाराष्ट्रातील नाशिक रोड रेल्वेस्टेशनवर कुत्र्यांचे 500 किलो मांस पकडले गेले, असा दावा करण्यात आला. हा दावा खोटा असल्याचे आमच्या तपासात उघड झाले.

पुण्यात एका मुस्लिमाने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर हल्ला केला पण लोकांनी तिला वाचवले, असा दावा करण्यात आला. मात्र हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.

समान नागरी कायद्याला समर्थन करण्यासाठी ही सोशल मीडिया मोहीम असून 9090902024 वर मिस्ड कॉल द्या, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in