Thursday, April 3, 2025
मराठी

Daily Reads

आंबेडकर मुद्द्यावर काँग्रेस विरुद्ध भाजप: संसदेतील हाणामारीत राहुल गांधींनी भाजप खासदाराला धक्काबुक्की केल्याचे मान्य केले का?

Written By Vasudha Beri, Translated By Prasad S Prabhu, Edited By Pankaj Menon
Dec 20, 2024
banner_image

गृहमंत्री अमित शहा यांनी बी. आर. आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून संसदेत निदर्शने आणि प्रति-निदर्शने झाली आहेत. आंबेडकर मुद्द्यावर काँग्रेस विरुद्ध भाजप असे चित्र आहे. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी गुरुवारी संसदेच्या आवारात एकाच वेळी निदर्शने करून एकमेकांवर आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप केला. दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आपल्या खासदारांना धक्काबुक्की आणि गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याने हा वाद आणखी वाढला.

अमित शाह यांच्या बीआर आंबेडकरांबद्दलच्या टिप्पण्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

भाजपने आरोप केला आहे की त्यांचे दोन खासदार, प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत हे संसदेच्या आवारात झालेल्या हाणामारीत काँग्रेस नेते आणि एलओपी राहुल गांधी यांच्याकडून जखमी झाले. कथित हल्ल्याबद्दल गांधींवर निंदा करताना संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, “तुम्ही (गांधी) इतर खासदारांना मारण्यासाठी कराटे, कुंगफू शिकलात का?”

काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी मात्र असे आरोप आपल्या भावाविरुद्धचे षड्यंत्र असल्याचे म्हटले आहे. त्यांनी भाजप खासदारांच्या कथित गुंडगिरीवर प्रकाश टाकला आणि दावा केला की काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना भांडणात ढकलले गेले आणि ते “जमिनीवर पडले.”

काँग्रेस आणि भाजप ब्लेम-गेममध्ये गुंतत असताना, राहुल गांधी यांनी भाजप खासदाराला धक्काबुक्की केल्याचे कबुल करताना दाखवणारा व्हिडिओ ऑनलाइन व्हायरल झाला आहे.

भाजपचे अमित मालवीय यांनी व्हिडिओ शेअर करत दावा केला आहे की, “विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कॅमेऱ्यात कबूल केले की भाजप खासदार प्रताप सारंगी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. यामुळे त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राहुल गांधींना दोषी ठरवण्यासाठी जबरदस्त पुरावे, व्हिडिओ फुटेज आणि त्यांची स्वतःची कबुली आहे. कायद्याने पुढील कारवाई केली पाहिजे.” इतर अनेकांनी ही केस पुढे फॉलो केली.

आंबेडकर मुद्द्यावर काँग्रेस विरुद्ध भाजप: संसदेतील हाणामारीत राहुल गांधींनी भाजप खासदाराला धक्काबुक्की केल्याचे मान्य केले का?
Screengrab from X post by @amitmalviya

गांधींनी भाजप नेत्याला धक्का दिल्याचे कबूल केल्याचा आरोप करत त्याच क्लिपची एक छोटी आवृत्ती अनेकांनी शेअर केली. अशा पोस्ट इथे, इथे आणि इथे बघता येतील.

पण राहुल गांधींनी भाजप खासदाराला धक्का दिल्याचं मान्य केलं का?

व्हायरल व्हिडिओचे काळजीपूर्वक विश्लेषण केल्यावर, आम्ही पत्रकारांना राहुल गांधींना विचारताना ऐकले, “खासदार तुमच्यावर आरोप करत आहेत…”

त्याला उत्तर देताना ते म्हणतात, “…हे संसदेचे प्रवेशद्वार आहे. मी आत जाण्याचा प्रयत्न करत होतो आणि भाजपचे खासदार मला रोखण्याचा प्रयत्न करत होते, मला धक्काबुक्की करत होते आणि धमक्या देत होते. म्हणून हे घडले आहे…”

त्याच अनुषंगाने आम्ही पत्रकारांना “खर्गे जी यांना धक्काबुक्की करण्यात आली होती का?” असे विचारताना ऐकले.

तेव्हा गांधी असे म्हणताना ऐकू येतात, “….होय, ते झाले….येथे धक्काबुक्की करून काहीही होत नाही. हे संसद भवनाचे प्रवेशद्वार आहे आणि आम्हाला आत जाण्याचा अधिकार आहे…”

न्यूज एजन्सी एएनआयने देखील व्हायरल क्लिप शेअर केली आणि राहुल गांधींचे विधान दाखविले की, “हे तुमच्या कॅमेऱ्यात असू शकते. मी संसदेच्या प्रवेशद्वारातून आत जाण्याचा प्रयत्न करत होतो, भाजपचे खासदार मला रोखण्याचा, धक्काबुक्की करण्याचा आणि धमक्या देण्याचा प्रयत्न करत होते. तर हे घडले…होय, हे घडले आहे (मल्लिकार्जुन खर्गे यांना ढकलणे). पण धक्के मारल्याने आम्हाला फरक पडत नाही. पण हे प्रवेशद्वार आहे आणि आम्हाला आत जाण्याचा अधिकार आहे. भाजपचे खासदार आम्हाला आत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करत होते… मुख्य मुद्दा हा आहे की ते संविधानावर हल्ला करत आहेत आणि आंबेडकरांच्या स्मृतीचा अपमान करत आहेत.”

आंबेडकर मुद्द्यावर काँग्रेस विरुद्ध भाजप: संसदेतील हाणामारीत राहुल गांधींनी भाजप खासदाराला धक्काबुक्की केल्याचे मान्य केले का?
Screengrab from X post by @ANI

NDTV नेही काँग्रेस नेत्याचा दुसऱ्या अंगलमधून घेतलेला हाच व्हिडिओ बाइट शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये, एक रिपोर्टर सुरुवातीला असे म्हणताना ऐकले जाऊ शकते, “…हे तुमच्यासोबत घडले का?”, मल्लिकार्जुन खरगे यांच्याबद्दल विचारणारे इतर आवाजही ऐकू येतात. त्याला प्रत्युत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, “हो, ते घडले..”

आंबेडकर मुद्द्यावर काँग्रेस विरुद्ध भाजप: संसदेतील हाणामारीत राहुल गांधींनी भाजप खासदाराला धक्काबुक्की केल्याचे मान्य केले का?
Screengrab from YouTube video by NDTV

हाच व्हिडिओ घेऊन Times of India ने देखील म्हटले आहे की मल्लिकार्जुन खरगे यांना धक्काबुक्की केल्याबद्दलच्या प्रश्नांना उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले “होय, हे घडले आहे”.

आंबेडकर मुद्द्यावर काँग्रेस विरुद्ध भाजप: संसदेतील हाणामारीत राहुल गांधींनी भाजप खासदाराला धक्काबुक्की केल्याचे मान्य केले का?
Screengrab from X post by @timesofindia

राहुल गांधींनी संसदेच्या आवारात भाजप खासदारांना धक्काबुक्की केल्याचे मान्य केलेले कोणतेही विश्वसनीय रिपोर्ट आम्हाला आढळले नाहीत.

भाजप विचलित करत आहे: संसदेच्या घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

संसदेतील कथित गोंधळानंतर पत्रकार परिषदेला संबोधित करताना गांधी यांनी भाजप आणि आरएसएसवर “संविधानविरोधी आणि आंबेडकरविरोधी मानसिकता” असल्याचा आरोप केला. सत्ताधारी पक्ष अमेरिकेतील अदानी प्रकरण आणि आंबेडकर वादावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

“आम्ही म्हणालो की गृहमंत्र्यांनी माफी मागावी आणि राजीनामा द्यावा (बीआर आंबेडकरांवर केलेल्या टिप्पणीबद्दल)… आज पुन्हा त्यांनी एक नवीन गोंधळ सुरू केला आहे. आंबेडकरांच्या पुतळ्यापासून आम्ही शांततेने संसद भवनाकडे जात होतो. भाजपचे खासदार संसद भवनाच्या पायऱ्यांवर लाठ्या घेऊन उभे होते आणि आम्हाला आत जाऊ दिले नाही. आणि आता ते हे विक्षेप निर्माण करत आहेत…”

आंबेडकर मुद्द्यावर काँग्रेस विरुद्ध भाजप: संसदेतील हाणामारीत राहुल गांधींनी भाजप खासदाराला धक्काबुक्की केल्याचे मान्य केले का?
Screengrab from X post by @INCIndia

“वास्तविक गोष्ट अशी आहे की त्यांनी आंबेडकरांचा अपमान केला आहे… मुख्य मुद्दा त्यांना मिटवायचा आहे तो म्हणजे नरेंद्र मोदींचे मित्र अदानी जी यांच्यावर अमेरिकेत केस आहे आणि नरेंद्र मोदी जी भारताला अदानीजींना विकत आहेत. हा मुख्य मुद्दा आहे आणि हे लोक त्यावर चर्चा करू इच्छित नाहीत,” ते पुढे म्हणाले.

संसदेपासून पोलिस स्टेशनपर्यंत: भाजप, काँग्रेसच्या तक्रारी

BJP ने आपल्या खासदारांवर हल्ला केल्याचा आरोप करत राहुल गांधींविरोधात “हत्येचा प्रयत्न” केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. “आम्ही दिल्ली पोलिसांकडे राहुल गांधींविरोधात मारहाण आणि चिथावणी दिल्याची तक्रार दाखल केली आहे. मकरद्वारच्या बाहेर आज घडलेल्या घटनेचा आम्ही तपशीलवार उल्लेख केला आहे, जिथे एनडीएचे खासदार शांततेत निषेध करत होते. आम्ही कलम 109, 115, 117, 125, 131 आणि 351 अंतर्गत तक्रार दिली आहे. कलम 109 हत्येचा प्रयत्न आहे, कलम 117 स्वेच्छेने गंभीर दुखापत करत आहे,” भाजप खासदार अनुराग ठाकूर म्हणाले.

भाजपच्या सदस्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्यावर धक्काबुक्की आणि गैरवर्तन केल्याचा आरोप करत Congress च्या खासदारांनी भाजपच्या गुंडागर्दीच्या विरोधात संसद स्ट्रीट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. असे पक्षाची एक्स पोस्ट सांगते.


(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी वसुधा बेरी यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,631

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage