Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
अंबानी कुटुंबाने नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात टिश्यू पेपरऐवजी ₹500 च्या नोटा दिल्या.
Fact
फूड प्रेझेंटेशनचा भाग म्हणून बनावट नोटा वापरल्या गेल्या, त्याचा विपर्यास लावण्यात आलाय.
मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या भव्य उद्घाटनाच्या आलिशान कार्यक्रमातील व्हिज्युअल्सने नेटिझन्सची झोप उडविली. चलनी नोटांनी सजवलेल्या मिठाईच्या प्लेटची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन शेअर केली जात आहे. छायाचित्रकार जर्मन लार्किनच्या इंस्टाग्राम स्टोरीतील हे स्क्रीनग्रॅब, “₹500 च्या नोटा” असलेली डिश दाखवते. अनेकांनी ही अतिशयोक्ती पाहून स्मायली दिली, तर इतर अनेकांनी ते चित्र खरे असल्याचे मानले. तथापि, ते चित्र मिम सारखे शेयर केले जात होते. अनेक युजर्सना त्या डिश मधील त्या चलनी नोटा खऱ्याच वाटल्या.
अनेक ट्विटर आणि फेसबुक युजर्सनी ते फोटो शेयर करीत पुढील कार्यक्रमात तरी या अशा कार्यक्रमात अंबानी आपल्याला बोलावतील तर बरे होईल अशी आशा अनेकांच्या मनात तयार केली.





व्हायरल छायाचित्राने ऑनलाइन मीम क्रिएटर्स साठी एक विशेष दिवसच मिळवून दिल्याचे चित्र निर्माण झाले होते.


व्हायरल छायाचित्राचे बारकाईने परीक्षण केल्यावर, आमच्या लक्षात आले की कथित INR नोटा एका ग्लॉसी कागदाच्या शीटवर छापल्या गेल्या आहेत. आम्ही RBI वेबसाइटवर शेअर केलेल्या ₹500 च्या नमुन्याशी छायाचित्रातील नोटांची तुलना देखील केली आणि त्यात अनेक विसंगती आढळल्या. सर्वप्रथम, खऱ्या चलनी नोटेच्या एका टोकावर लिहिलेला “₹500” असा मजकूर छायाचित्रात दिसत नाही. याव्यतिरिक्त, खऱ्या ₹500 च्या नोटेवर लाल किल्ल्याच्या चित्राच्या खाली लिहिला जाणारा “लाल किला” हा मजकूर देखील गहाळ आहे. व्हायरल छायाचित्रात दिसणाऱ्या कथित चलनी नोटांचा आकारही खूप मोठा असल्याचे दिसून आले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या ₹500 च्या नोटांच्या वैशिष्ट्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हे पहा.
पुढे, व्हायरल छायाचित्र असलेल्या पोस्टच्या कॉमेंट सेक्शन मध्ये शोधताना आम्हाला अनेक कॉमेंट अशा मिळाल्या की, त्यामध्ये सदर नोटा या “दौलत की चाट” नावाच्या डिशच्या सादरीकरणाचा एक भाग आहेत.
त्यानंतर आम्ही Google वर सदर डिशची माहिती शोधून पाहिली. आम्हाला 16 ऑक्टोबर 2018 रोजी द क्विंट ने प्रसिद्ध केलेला एक रिपोर्ट पाहायला मिळाला. ज्यामध्ये प्रसिद्ध मिष्टान्न दौलत की चाट बद्दल दोन सत्रात तुलना करण्यात आली आहे. दौलत की चाट एक रस्त्यावर विक्रेत्याने बनविलेली आणि दुसरी इंडियन एक्सेंटच्या एका शेफने बनविलेली.
विशेष म्हणजे, शेफच्या दौलत की चाटचे सादरीकरण व्हायरल छायाचित्रात दिसणार्या डिशसारखेच दिसते.
27 मार्च 2023 रोजी @Indian_Accent ने केलेल्या ट्विटमध्ये दौलत की चाटचे छायाचित्र पाहायला मिळाले. त्यांचे पाककलेचे सादरीकरण व्हायरल चित्रात दिसणार्या डिशसारखेच आहे. एका बाऊल मध्ये पत्रावळीवर (वाळलेल्या पानावर) घातलेली मिठाई आणि एका बाजूला “₹५०० च्या नोटा” पाहायला मिळतात.

दौलत की चाट बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, हे पहा.
अनेक न्यूज आउटलेट्सने देखील व्हायरल चित्रावर आपला रिपोर्ट देताना स्पष्ट केले की ते पैसे “बनावट” आहेत आणि दौलत की चाटच्या पाककृती सादरीकरणाचा एक भाग आहे. NDTV च्या 3 एप्रिल 2023 च्या रिपोर्ट मध्ये असे म्हटले आहे की, “इंडियन एक्सेंट रेस्टॉरंटने मिठाई (दौलत की चाट) चे नवे रूप सादर केले असून त्यात बनावट नोटा वापरल्या आहेत. तसेच त्याला “श्रीमंतांचे मिष्टान्न” असे संबोधले आहे.
3 मार्च 2023 रोजीच्या इंडिया टुडेने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्ट मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे की, “.. NMACC लाँचच्या वेळी अंबानींच्या पार्टीत आलेल्या पाहुण्यांना 500 रुपयांच्या नोटांसह डिश देण्यात आली होती, परंतु ते खरे पैसे नव्हते.”
इंस्टाग्रामवर शेअर केलेली स्टोरी/स्टेटस पोस्ट केल्याच्या 24 तासांच्या आत गायब होते. त्यामुळे, लार्किनने अंबानी इव्हेंटमधील व्हायरल फोटो शेअर केला होता की नाही हे आम्ही स्वतंत्रपणे तपासू शकलो नाही.
अशा प्रकारे आम्ही असा निष्कर्ष काढू शकतो की व्हायरल फोटोमध्ये पाककृती सादरीकरणाचा भाग म्हणून डिशमध्ये ₹500 च्या बनावट नोटा जोडल्या गेल्या आहेत. टिश्यू पेपरऐवजी अंबानींनी खरे पैसे दिल्याचा दावा चुकीचा आहे.
Sources
Report By The Quint, Dated October 16, 2018
Tweet By @Indian_Accent, Dated March 27, 2023
Report By NDTV, Dated April 3, 2023
Report By India Today, Dated March 3, 2023
Self Analysis
Komal Singh
June 14, 2024
Prasad S Prabhu
March 7, 2024
Prasad S Prabhu
January 27, 2023