Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
मुकेश अंबानींच्या जन्मदिनानिमित्त जिओकडून सर्व भारतीय युजर्सना ८४ दिवसांचे मोफत रिचार्ज दिले जात आहे.
Fact
हा दावा खोटा आहे. दाव्यात वापरली जात असलेली लिंक मोबाईल क्रमांक जमा करण्याच्या उद्देशाने बनविण्यात आली असून जिओ कंपनीने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.
मुकेश अंबानींच्या जन्मदिनानिमित्त जिओकडून सर्व भारतीय युजर्सना दिले जातेय मोफत रिचार्ज असे सांगत एक दावा सध्या व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.

“अंबानी बर्थडे ऑफर JIO कंपनी अपने मालिक मुकेश अंबानी का जन्मदिन मनाने के लिए सभी भारतीय यूजर्स को 84 दिनों के लिए ₹555 का मुफ्त रिचार्ज दे रही है। नीचे दिए गए नीले रंग के लिंक पर क्लिक करके अपना नंबर रिचार्ज करें। jio-offer.site” असे हा दावा सांगतो.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

आम्ही व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी सर्वप्रथम दाव्यात देण्यात आलेली jio-offer.site ही लिंक तपासली. लिंक पाहताच ती अधिकृत नाही हे आमच्या निदर्शनास आले. जिओ कंपनी मोफत रिचार्ज देत असल्यास कंपनीने आपली अधिकृत वेबसाईटची लिंक www.jio.com चा वापर केला असता. दरम्यान आम्ही अधिकृत वेबसाईटवर मुकेश अंबानींच्या जन्मदिनानिमित्त जिओकडून सर्व भारतीय युजर्सना ८४ दिवसांचे मोफत रिचार्ज दिले जात आहे का? याचा शोध घेतला. मात्र काहीच उपलब्ध झाले नाही.

दरम्यान याप्रकारची घोषणा जिओ कंपनीने केली आहे का? यासाठी किवर्डसच्या माध्यमातून शोध घेतला. मात्र आम्हाला अशी कोणतीही माहिती मिळाली नाही.
आम्ही jio-offer.site या साईटवर क्लिक करून तपासून पाहिले. या साईटवर तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक आणि कंपनीचे नाव विचारले जाते. पुढे हाच मेसेज फॉरवर्ड केल्यास रिचार्ज होईल असे सांगितले जाते. मात्र मोफत रिचार्जची कोणतीच प्रक्रिया होत नाही. एकंदर हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे आमच्या लक्षात आले.

कोणत्याही वेबसाईटच्या किंवा लिंकच्या वैधतेबद्दल तपास करणाऱ्या www.scam-detector.com वर आम्ही संबंधित लिंक तपासली असता, विश्वासाच्या बाबतीत अवघी ३.८ टक्क्यांची श्रेणी असलेली ही वेबसाईट असून नुकतीच बनविण्यात आली आहे. गुणवत्ता आणि विश्वासाच्या बाबतीत ती संशयास्पद असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.

आम्ही यासंदर्भात सायबर सुरक्षा सल्लागार हितेश धरमदासानी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी “हा मेसेज पूर्णपणे फेक असून नागरिकांचे नुंबर जमविण्यासाठी केलेली बनावट वेबसाईट सर्वत्र पसरविण्याचा एक भाग असल्याचे सांगितले. फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना मोबाईल क्रमांक हवे असतात. यामार्गाने नंबर मिळवून फसवणुकीसाठी त्यांचा वापर केला जातो. दरम्यान नागरिकांनी सावध राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.”
अशाप्रकारे आमच्या तपासात मुकेश अंबानींच्या जन्मदिनानिमित्त जिओकडून सर्व भारतीय युजर्सना ८४ दिवसांचे मोफत रिचार्ज दिले जात आहे, हा दावा खोटा आहे. दाव्यात वापरली जात असलेली लिंक मोबाईल क्रमांक जमा करण्याच्या उद्देशाने बनविण्यात आली असून जिओ कंपनीने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. हे स्पष्ट झाले.
Our Sources
Official website of JIO
Google Search
Detection on Scam Detector
Conversation with Cyber Security Expert Hitesh Dharamdasani
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Komal Singh
June 14, 2024
Komal Singh
April 26, 2024
Prasad S Prabhu
March 9, 2024