Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
मध्यप्रदेशात आंदोलन करणाऱ्या महिलांना पोलिसांनी मारहाण केली.

या व्हिडिओमध्ये एमपीमध्ये आंदोलक महिलांना पोलिसांनी मारहाण केली आहे का? हे तपासण्यासाठी, न्यूजचेकरने व्हायरल व्हिडिओ कीफ्रेममध्ये विभाजित केला आणि Google वर रिव्हर्स इमेज शोध घेतला, ज्यामुळे आम्हाला YouTube वर अपलोड केलेल्या एका व्हिडिओ न्यूजकडे नेले, ज्यामुळे घटनेची वास्तविक माहिती मिळाली. सप्टेंबर 2019 मध्ये झारखंडमध्ये ही घटना घडली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अंगणवाडी सेविकांनी नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी रांचीमध्ये मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने केल्याचे नमूद केले आहे.
त्यानंतर आम्ही “रांची’ “अंगणवाडी कर्मचारी” “प्रोटेस्ट” आणि “सीएम होम” या शब्दांसाठी कीवर्ड शोध घेतला ज्याने आम्हाला समान माहिती प्रसारित केलेल्या अनेक बातम्यांकडे नेले.
क्विंटच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “24 सप्टेंबर रोजी, अनेक आंदोलक अंगणवाडी सेविका सहाय्यक संघाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या निषेधाच्या सलग 40व्या दिवशी झारखंडच्या रांची येथे पोलिसांनी मारहाण केली.” रिपोर्टमध्ये व्हिज्युअल्सचा तोच क्रम आहे जो आता व्हायरल झाला आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या दुसर्या वृत्तातही व्हायरल व्हिडिओमध्ये दिसल्याप्रमाणे त्याच क्रमाने व्हिज्युअल्स आहेत. फोटो कॅप्शनमध्ये “रांची, 24 सप्टेंबर 2019 रोजी आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला” असे लिहिले आहे.
अशाप्रकारे, हे स्पष्ट झाले आहे की एमपीमध्ये महिलांवर हल्ला केल्याचा दावा करणारा व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात झारखंडचा आहे आणि 2019 चा आहे.
Sources
Video report on YouTube, published by Workers Unity Live, dated September 25, 2019
Report published by The Quint, dated September 25, 2019
Report published by Hindustan Times, dated September 25, 2019
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी पंकज मेनन यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा: https://whatsapp.com/channel/0029Va23tYwLtOj7zEWzmC1Z
Salman
August 6, 2025
Sandesh Thorve
April 19, 2022
Sandesh Thorve
April 20, 2022