Saturday, November 2, 2024
Saturday, November 2, 2024

HomeFact Checkमध्य प्रदेशातील पोलिसांनी खरंच बुरखा घातलेल्या त्या मुस्लिम महिलेला कान पकडून उठाबशा...

मध्य प्रदेशातील पोलिसांनी खरंच बुरखा घातलेल्या त्या मुस्लिम महिलेला कान पकडून उठाबशा काढायला सांगितल्या ? जाणून घ्या सत्य काय आहे

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात बुरखा घातलेली एक मुस्लिम महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उठाबशा काढताना दिसत आहे. 

हा व्हिडिओ मध्य प्रदेशातील खरगोनमधील आहे, असे सांगितले जात आहे. जिथे नुकतीच जातीयवाद घटना घडली होती. 

यात असा दावा केलाय की, ही बुरखा घातलेली मुस्लिम महिला खरगोनमध्ये दगडफेक करत होती. पण नंतर पोलिसांनी त्या महिलेला कान पकडून उठाबशा काढायला सांगितल्या.

या ट्विटचे संग्रहण तुम्ही इथे पाहू शकता.

या ट्विटचे संग्रहण तुम्ही इथे पाहू शकता.

सोशल मीडियावर वेगवेगळ्या मजकुरासह त्या बुरखा घातलेल्या महिलेचा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर खूपच व्हायरल होत आहे.

खरगोनमध्ये नुकत्याच झालेल्या रामनवमी उत्सवात जातीयवाद घटना भडकली होती. याची सुरवात शोभा यात्रेवर दगडफेक करण्याने झाली. 

यात असा आरोप केलाय की, जेव्हा शोभा यात्रा एका मस्जिदीच्या जवळ चालली होती. त्याच वेळी दगडफेक करण्यास सुरवात झाली. त्यामुळे तेथील वातावरण बिघडले. मग तिथे दगडफेक आणि जाळपोळ झाली. यात पोलिसांसह अनेक जण जखमी झाले.

Fact Check / Verification

मध्य प्रदेशातील पोलिसांनी बुरखा घातलेल्या त्या मुस्लिम महिलेला कान पकडून उठाबशा काढायला सांगितल्या, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही इन-वीड टूलमध्ये व्हायरल व्हिडिओ शोधण्याचा प्रयत्न केला.

या व्हिडिओबाबत यांडेक्स सर्च इंजिनवर आम्हांला एस ९ न्यूज गुजरात या अधिकृत युट्यूब वाहिनीवर एक बातमी सापडली. त्यावर ही व्हिडिओ १८ एप्रिल २०२० अपलोड केली होती.

त्या बातमीनुसार, ही व्हिडिओ सुरतमधील आहे. जेव्हा ताळेबंदी लागली होती, तेव्हा नियमांचे पालन न करणाऱ्या महिलेला पोलिसांनी उठाबशा काढायला सांगितल्या होत्या. 

सदर व्हिडिओत तो पूर्ण व्हिडिओ दिसत आहे. त्यात बुरखा घातलेल्या महिलेसह अन्य काही लोकांना देखील पोलीस शिक्षा देतांना दिसत आहे.

त्यावेळी हा व्हिडिओ सुरतचा आहे, असं सांगून बऱ्याच जणांनी युट्यूब वाहिनीवर त्याची बातमी दिली होती. काही कीवर्ड टाकून आम्हांला दिव्य भास्करने दोन वर्षांपूर्वी केलेल्या या व्हिडिओ संदर्भातील एक बातमी आढळली. सुरतमधील सलाबतपुरा भागांतील व्हिडिओ आहे, असं त्यात सांगितले आहे.

इथे वाचू शकता : मुंबईतील तीन वर्षांपूर्वीच्या गणपती विसर्जनाचा व्हिडिओ रामनवमीचा सांगितला जातोय 

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, बुरखा घातलेली मुस्लिम महिला उठाबशा काढत आहे. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. 

सदर व्हिडिओ खरगोनचा नसून सुरतमधील आहे. खरगोनमधील हिंसाचाराच्या नावाखाली जनतेची दिशाभूल करून हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. 

Result : False Context / False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular