Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
5G ट्रायलमुळे मानवी जीवितासाठी धोका असल्याची व मोबाईल बंद ठेवण्याची सुचना देणारा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.या ट्रायल दरम्यान लहान मुलांच्या हाती मोबाईन न देण्याची तसेच मोबाईल बंद ठेवण्यास सांगितले आहे. हे करणे आपल्या कुटूंबासाठी चांगले असल्याचे म्हटले आहे. मेसेजसोबत एबीपी न्यूजच्या बातमीची व्हिडिओ क्लिप देखील शेअर केली गेली आहे. यात मोबाईल हाताळण्यासंदर्भात सुचना करण्यात आलेल्या आहेत.
व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटले आहे?
“संध्याकाळी 10 वाजल्यापासून 12 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत कृपया विनंती आहे की आपला मोबाईल लहान मुलांकडे देऊ नका व आपणही त्याचा वापर करू नका कारण उद्यापासून 5G इन्स्टॉलेशन म्हणजेच 5G नेटवर्क ची ट्रायल घेणार आहेत त्यामळे मानवी जीवनाला आणि लहान मुलांना याचा धोका आहे म्हणून आपला मोबाईल बंद ठेवाल तेवढं आपल्या कुटुंबासाठी चांगलं आहे.”
आम्ही याबाबत शोध घेतला असता 4 मे रोजी अमल उजाला या हिंदी दैनिकाच्या वेबसाईटवर 5 जी ट्रायल संदर्भात प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, दूरसंचार विभागाने 5G तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रम चाचण्यांना परवानगी दिली आहे. दूरसंचार सेवा कंपन्या भारताता वेगवेगळ्या ठिकाणी 5G चाचणी सुरू करणार असल्याचे मंत्रालयाने मं सांगितले. या कंपन्या ग्रामीण, अर्ध-शहरी आणि शहरी भागात या चाचण्या सुरू करतील.
मात्र या कंपन्या कधी ट्रायल सुरु करतील याचा उल्लेख मात्र या बातमीत नाही तसेच ट्रायल दरम्यान काय खबरदारी घ्यावी याचीही माहिती यात देण्यात आलेली नाही.
आम्ही याबाबत अधिक शोध घेतला असता मात्र आम्हाला कोणत्याही बातमीत 5G टेस्टिंगमुळे मानवी जीवितासाठी धोका असल्याचा उल्लेख आढळला नाही. यानंतर आम्ही एबीपी न्यूजचा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता हा व्हिडिओ सुमारे आठ वर्षापुर्वीचा 11 सप्टेंबर 2012 रोजीचा असल्याचे आढळून आले.
युट्यूबवर अपलोड करण्यात आलेल्या बातमीच्यात व्हिडिओ म्हटले आहे की, मोबाइल वापरकर्त्यांसाठी सरकारने जारी केलेल्या सावधगिरीच्या मार्गदर्शक सूचनांचा भाग म्हणून मोबाईल वर बोलताना स्पीकरफोन किंवा हेडसेटचा वापर करून शरीरापासून मोबाईल लांब कसा राहिल हे लक्षात ठेवले पाहिजे. सरकारने त्यावेळी मोबाईलधारकाने नेमकी काय काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शक सुचना करणारे पत्रक प्रसिद्ध केले होते. त्याच्या आधारे एबीपी न्यूजने ही बातमी प्रसिद्ध केली होती.
भारत सरकार द्वारे 2021 मध्ये मोबाईल टाॅवर आणि हॅंडसेट मधील रेडियशन संदर्भात जारी केलेले पत्रक देखील आम्हाला इंटरनेटवर आढळून आले.
5G मुळे मानवी जीवितासाठी काही धोका आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला medicalnewstoday या वेबसाईटवर एक लेख आढळून आला ज्यात म्हटले आहे की, 5G वायरलेस तंत्रज्ञान हळूहळू जगभरात पोहचत आहे. ब-याच सरकारी संस्था सल्ला देतात की आपल्या आरोग्यावर रेडिओफ्रिक्वेन्सी लहरींचा परिणामहोत नाही त्यामुळे घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. परंतु काही तज्ञ दाव्याशी सहमत नाहीत.
याशिवाय आम्हाला cnet.com या वेबसाईटवर एक लेख आढळून आला ज्यात म्हटले आहे की, 5G फ्रिक्वेन्सी अर्थातच ‘नॉन-आयोनायझिंग’मध्येच येत असली तरीही सध्या आपण वापरत असलेल्या 3G-4G पेक्षा जवळपास 5 पट जास्त क्षमता आहे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नॉन-आयोनायझिंग रेडीएशन्सला सुद्धा कॅन्सर निर्माण करु शकणारा घटक म्हटले आहे. मात्र वैज्ञानिकांमध्ये याबाबत एकमत नाही. ब-याच वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार 5G रेडीएशन्सचा मानवी जीवितास धोका असल्याचे ठोस पुरावे आढळलेले नाहीत.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) याबद्दल काय म्हटले आहे याचा शोध घेण्यासाठी आम्ही संघटनेच्या वेबसाईटला भेट दिली असता 5G रेडीएशन्सचा मानवी जीवितास काही धोका असल्याचे सबळ पुरावे अजूनतरी उपलब्ध झाले नसल्याची माहिती मिळाली.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, एबीपी न्यूजचा व्हिडिओ आठ वर्षापुर्वीचा आहे. यात मोबाईल वापरासंदर्भातील सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या योग्य आहेत मात्र त्याचा सध्याच्या 5 जी ट्रायलशी संबंध नाही. शिवाय भारतात अजून 5 जी ट्रायल सुरु झालेल्या नाहीत त्यामुळे व्हायरल मेसेजमध्ये काही तथ्य नाही.
Read More : टाटा हेल्थ कंपनीने घरगुती कोविड-19 मेडिकल किट सुचविले आहे का?
Claim Review: 5G ट्रायलमुळे मानवी जीवितास धोका Claimed By: Social Media post Fact Check: false |
WHO- https://www.who.int/news-room/q-a-detail/radiation-5g-mobile-networks-and-health
CNET https://www.cnet.com/news/is-5g-making-you-sick-probably-not/
Medicalnewstoday- https://www.medicalnewstoday.com/articles/326141
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.