Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
आम आदमी पार्टीने आपल्या पोस्टरमध्ये झाड़ूच्या जागी अपशब्द लिहिला असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा तर मणिपुरमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू होते आहे. ओपिनियन पोल आणि राजकीय जानकार मानतात की पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये आम आदमी पार्टी इतर राज्यांच्या तुलनेत मजबूत स्थितीत असल्याचे दिसत आहे.
जसं की, Newschecker आपल्या पडताळणींच्या माध्यमांतून आपल्या वाचकांना सांगत आलेला आहे की, निवडणुकींच्या दरम्यान फेक न्यूज मोठ्या प्रमाणांवर शेअर होतात. Newschecker द्वारे 2021 साली पडताळणी केलेल्या दाव्यांशी संबंधित आमचा विस्तृत रिपोर्ट येथे वाचू शकता.
याच क्रमात सोशल मीडियावर एका फोटोवर दावा केला आहे की आम आदमी पार्टीने आपल्या पोस्टरमध्ये झाड़ूच्या जागी अपशब्द लिहिला.
Fact Check/Verification
आम आदमी पार्टीने आपल्या पोस्टरमध्ये झाड़ूच्या जागी अपशब्द लिहिला नावाखाली शेअर केलेला फोटो आम्ही गुगलवर सर्च केला. या प्रक्रियेत आम्हाला माहिती मिळाली की सोशल मीडियावर 2019 पासून व्हायरल फोटो शेअर केला जात आहे.
õûr Craze BeCaúßé ThìS ìß My PãGe आहे. नावाच्या फेसबुक पेजद्वारे आपल्या पोस्टरमध्ये झाड़ूच्या जागी अपशब्द लिहिला हा फोटो 12 मार्च, 2019 ला शेअर केला आहे.
Zee News Global Fans नावाच्या एक फेसबुक पेजद्वारे 5 मार्च 2019 रोजी हा फोटो शेअर केला गेला आहे.
आपल्या पोस्टरमध्ये झाड़ूच्या जागी अपशब्द लिहिला या कीवर्डच्या मदतीने ट्विटरवर शोध घेत असताना, आम्हाला Zeeshan Rashidi नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने 11 मार्च 2019 रोजी शेअर केलेल्या ट्विटमध्ये व्हायरल चित्राची मूळ आवृत्ती सापडली. ट्विटमध्ये त्याच विषयावर Alt News ने प्रकाशित केलेल्या तथ्य तपासणी अहवालाची लिंक देखील शेअर केली आहे.
व्हायरल इमेज आणि मूळ इमेज यांच्यातील तौलनिक अभ्यासात सोशल मीडियावर व्हायरल होणारी इमेज एडिट करण्यात आल्याचे समोर आले. मूळ फोटोत “भाजपला हरवायचे आहे? तर झाडूलाच मतदान करा” असे लिहिले आहे. आपल्या पोस्टरमध्ये झाड़ूच्या जागी अपशब्द लिहिला असल्याचा दावा चुकीचा असल्याचे स्पष्ट झाले ऑआहे.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात आम आदमी पार्टीने आपल्या पोस्टरमध्ये झाड़ूच्या जागी अपशब्द लिहिला नावाखाली शेअर केलेला हा फोटो एडिट केल्याचे स्पष्ट झाले आहे. आम आदमी पार्टीच्या खऱ्या पोस्टरमध्ये, “भाजपला हरवायचे आहे त्यामुळे झाडूलाच मत द्या” असे लिहिले आहे.
Result: Manipulated Media
Our Sources
Social Media Posts
Self Analysis
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.