Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांचे निधन झाले.
हा दावा खोटा असून त्यांच्या निधनाच्या वृत्ताचा त्यांच्या मुलाने इन्कार केला आहे.
ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांचे निधन झाले, असे सांगत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करणारा दावा व्हायरल झाला आहे.
आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर आढळला असून चेन्नई येथे अल्प आजाराने त्यांचे निधन झाल्याचे व्हायरल मेसेज सांगतो.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
व्हायरल दाव्याची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही सर्वप्रथम संबंधित कीवर्डस Google वर शोधले. मात्र यासंदर्भातील म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्या निधनाची माहिती देणारी एकही बातमी आम्हाला आढळली नाही. इतक्या मोठ्या अभिनेत्रीचे निधन झाले असते तर त्याची सर्वत्र मोठी बातमी झाली असती.
दरम्यान शोध घेत असताना महाराष्ट्र टाइम्सने ७ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध केलेली बातमी सापडली. ‘अफवा पसरवू नका…’ “वैजयंतीमाला यांच्या मृत्यूच्या खोट्या बातम्यांवर मुलाची प्रतिक्रिया” या शीर्षकाखाली देण्यात आलेली ही बातमी खाली पाहता येईल.
“तंत्रज्ञान आणि इंटरनेटचे अनेक फायदे असले तरी, धोका देखील कमी नाही. खोटी माहिती खूप वेगाने पसरते. ज्येष्ठ अभिनेत्री आणि नृत्यांगना वैजयंतीमाला यांच्याबद्दलही असंच काहीसं पसरलं. जेव्हा त्यांच्या मृत्यूची खोटी बातमी सोशल मीडियावर पसरली तेव्हा चाहते चिंतेत पडले. मात्र, आता अभिनेत्रीच्या कुटुंबाने या बातम्यांचं खंडन केलं आहे. वैजयंतीमाला यांचा मुलगा सुचिन्द्रा बाली म्हणाला की, त्याच्या आईची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. अफवा पसरवू नयेत.” अशी माहिती या बातमीत वाचायला मिळाली.
दैनिक पुढारी आणि नवराष्ट्र या माध्यमांनीही वैजयंतीमाला यांच्या निधनाचे वृत्त खोटे असून त्यांच्या मुलाने या वृत्ताचे खंडन केल्याचे म्हटले आहे.
पुढारी ने दिलेल्या वृत्तात वैजयंतीमाला यांचा मुलगा सुचिन्द्रा बाली यांनी आपल्या आईच्या निधनाच्या वृत्ताचे खंडन करण्यासाठी घातलेल्या इंस्टाग्राम स्टोरीचे स्क्रिनशॉट आम्हाला पाहायला मिळाले.
असेच वृत्त इंग्रजीमध्ये हिंदुस्थान टाइम्सनेही ७ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध केले असून ते येथे पाहता येईल.
अशाप्रकारे आमच्या तपासात ज्येष्ठ अभिनेत्री वैजयंतीमाला यांच्या निधनाचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
News published by Maharashtra Times on March 7, 2025
News published by Pudhari on March 8, 2025
News published by Navrashtra on March 7, 2025
News published by Hindustan times on March 7, 2025
Prasad S Prabhu
March 7, 2025
Prasad S Prabhu
February 12, 2025
Prasad S Prabhu
January 31, 2025