Fact Check
महाकुंभातील व्हायरल गर्ल मोनालिसाची हत्या आणि निधन असे सांगत व्हायरल दावे खोटे आहेत
Claim
महाकुंभातील व्हायरल गर्ल मोनालिसाची हत्या आणि निधन झाले.
Fact
हे दावे खोटे असून व्हायरल गर्ल मोनालिसा सध्या मुंबई येथे अभिनयाचे प्रशिक्षण घेत आहे.
महाकुंभात आपल्या सुंदरतेने चर्चेत आलेली व्हायरल गर्ल मोनालिसा सध्या तिच्या मृत्यूच्या दाव्यांनी पुन्हा एकदा नेटकऱ्यांची शिकार बनली आहे. मोनालिसाची गोळ्या झाडून हत्या झाली तसेच तिचे अचानक निधन झाले असे सांगणारे दावे सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाले आहेत. मात्र आमच्या तपासात हे दावे खोटे असल्याचे आढळले.


Fact Check/ Verification
महाकुंभातील व्हायरल गर्ल मोनालिसाचा मृत्यू झाल्याचा दावा करत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. हा दावा इंस्टाग्रामवर वेगाने शेअर केला जात आहे. दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही गुगलवर “मोनालिसा, मोनालिसाचा मृत्यू” सारखे कीवर्ड शोधले, परंतु आम्हाला या दाव्याशी संबंधित कोणताही विश्वासार्ह रिपोर्ट सापडला नाही.
आमच्या तपासात आम्हाला मोनालिसाच्या हत्ये संदर्भातही कोणतेही अधिकृत वृत्त सापडले नाही.
या काळात, मोनालिसा महेश्वर सोडून मुंबईला गेली आहे हे निश्चितच माहित झाले, कारण तिला बॉलिवूडमध्ये काम मिळाले आहे. झी न्यूजच्या वृत्तानुसार, मोनालिसा तिच्या कुटुंबासह चित्रपटातील बारकावे जाणून घेण्यासाठी मुंबईला गेली आहे. हे उल्लेखनीय आहे की चित्रपट दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी ‘द मणिपूर डायरीज’ चित्रपटासाठी मोनालिसाला साइन केले आहे.

अधिक माहितीसाठी, आम्ही महेश्वर येथील रहिवासी विनोद चौहान यांच्याशी फोनवर बोललो, जे मोनालिसाच्या वडिलांचे मित्र आहेत आणि त्यांचे मीडिया आणि प्रसिद्धीचे काम पाहतात. त्यांनी आम्हाला सांगितले की, “सोशल मीडियावर मोनालिसाचे अनेक बनावट अकाउंट आहेत आणि तिच्याबद्दल अनेक बनावट बातम्या पसरवल्या जात आहेत. मोनालिसाच्या मृत्यूचा दावा पूर्णपणे खोटा आहे. ती सध्या महेश्वरमध्ये नाहीये पण अभिनय शिकण्यासाठी मुंबईला गेली आहे.”
Conclusion
अशाप्रकारे, आमच्या तपासातून हे स्पष्ट होते की महाकुंभाची व्हायरल गर्ल मोनालिसाच्या मृत्यू आणि हत्येचा दावा खोटा आहे.
Our Sources
Telephone Conversation with Monalisa’s family friend Vinod Chauhan.
Media Reports
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी रोशन ठाकूर यांनी केले असून येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा