Authors
मणिपूरमधील नुकत्याच झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात RSS गणवेशातील दोन पुरुषांची प्रतिमा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे, अनेकांनी असा दावा केला आहे की दोन कुकी महिलांना विवस्त्र करून परेड करणाऱ्या पुरुषांच्या गटात हे दोघेही होते.
आत्तापर्यंत, बी. फायनोम गावातील एका महिलेला ओढून नेत असलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसलेल्या एकासह सहा जणांना अटक करण्यात आली आहे, हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तात असे म्हटले आहे की, दोषींना अटक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.
खोट्या दाव्यासह व्हिडिओ शेअर करणाऱ्या अनेकांमध्ये सीपीआय(एम) नेत्या सुभाषिनी अली यांचाही समावेश होता, ज्यांनी लिहिले, “ते मणिपूरचे आरोपी आहेत. त्यांना त्यांच्या कपड्यांवरून ओळखा.” अली या दोघांनी परिधान केलेल्या जुन्या RSS गणवेशाचा संदर्भ देत होत्या, जो सूचित करतो की ईशान्येकडील राज्यात झालेल्या हिंसाचाराचा RSS भाग होता.
ट्विटची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.
Fact check/ Verification
कॉमेंट सेक्शनमध्ये केलेल्या स्कॅनमध्ये असे दिसून आले की अनेक लोक हे ट्विट खोटे असल्याचे सांगत आहेत.
तत्सम पोस्ट शेअर करणार्या अधिक लोकांबद्दल सोशल मीडियात सर्च केल्यावर, आम्हाला भाजपचे राज्य उपाध्यक्ष, मणिपूरचे चिदानंद सिंग यांचे एक ट्विट आढळले, त्यांनी दावा केला की प्रतिमेत दिसणारे ते स्वतः आणि त्यांचा मुलगा आहेत.
न्यूजचेकरशी बोलताना चिदानंद सिंग यांनी पुष्टी केली की त्यांच्याविरुद्ध खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे. “मी काल संध्याकाळी माझ्या विरुद्ध खोट्या बातम्या पाहिल्या, श्रीमती अलीने शेअर करण्यापूर्वीच. मुख्य आरोपीला अटक करूनही फेक न्यूज शेअर करण्यात आली. मी डीजीपीकडे तक्रार केली आहे. ते मला खास लक्ष्य करत नाहीत, ते आरएसएसला लक्ष्य करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.
‘Friends of Rss’ नावाच्या सोशल मीडिया हँडलने सुभाषिनी अली यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आल्याचा दावाही केला आहे.
आम्हाला मणिपूर पोलिसांचे एक ट्विट आढळले आहे ज्यात या प्रकरणाची एफआयआर नोंदवण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.
चिदानंद सिंग यांनी मणिपूर पोलिसांकडे नोंदवलेल्या एफआयआरची प्रतही शेअर केली.
खोट्या दाव्यासह व्हायरल फोटो शेअर करणार्या सुभाषिनी अली यांनी सोमवारी तात्काळ माफी मागणारे ट्विटही जारी केले, आपण केलेल्या चुकीची जबाबदारी त्यांनी या ट्विट मध्ये स्वीकारली आहे. “मला अत्यंत खेद वाटतो की मी मणिपूरमध्ये महिलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या भयानक प्रकरणात आरोपी म्हणून पसरविले जात असलेल्या 2 व्यक्तींबद्दल खोटे ट्विट रिट्विट केले आहे. अनावधानाने माझ्यामुळे झालेल्या मनस्तापाबद्दल मी बिनशर्त माफी मागते,” असे ट्विटमध्ये लिहिले आहे.
“ते संकटाच्या परिस्थितीत आणखी इंधन भरत आहेत. हे मूर्खपणाचे कृत्य आहे,” असा इशारा चिदानंद सिंग यांनी दिला.
Conclusion
मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात मणिपूरचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि त्यांच्या मुलाची आरएसएसच्या गणवेशातील प्रतिमा खोटेपणाने शेअर करण्यात आली आहे.
Result: False
Sources
Tweet by Manipur police, dated July 23, 2023
Tweet by Chidananda Singh, dated July 23, 2023
Tweet by Friends of RSS, dated July 23, 2023
Tweet by Subhashini Ali, dated July 24, 2023
Telephone conversation with Chidananda Singh, BJP State Vice President, Manipur
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी पंकज मेनन यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in