आदित्य ठाकरेंचे उर्दूमधील होर्डिंग व्हायरल झाले आहे. हिरव्या रंगाच्या या होर्डिंगमध्य पांढरा कुर्ता घातलेले आदित्य ठाकरे हात उंचावला आहे, तर उर्दूमध्ये नमसते वरळी असा मजकूर लिहिला आहे.
या फोटोवरुन सोशल मीडियात शिवसेना आणि उद्धव आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मराठी अस्मिता वगैरे वगैरे…. असे व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे. मुक्त लेखिका आणि प्रसिद्ध स्तंभकार शेफाली वैद्य यांनी देखील हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अनेक फेसबुक युजर्सनी हे शिवसेनेचे हिरवं हिंदुत्व आहे का असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.
Fact Check/Verification
मंत्री आदित्य ठाकरेंचा हा फोटो नेमका कधीचा आहे आणि तो आता का शेअर होतो आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला दैनिक भास्करची दोन वर्षांपुर्वीची बातमी आढळन आली. यात हा व्हायरल फोटो शेअर करण्यात आला आहे.
बातमीत म्हटले आहे की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे मुंबईच्या वरळी मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. ठाकरे कुटुंबातील आदित्य हे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले पहिले सदस्य आहेत. अशा परिस्थितीत आदित्यच्या निवडणूक प्रचारात कोणतीही कमतरता नसावी, म्हणून शिवसेनेने जोरात तयारी सुरू केली. वरळीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षाने 6 भाषांमध्ये पोस्टर लावले आहेत.

याशिवाय बीबीसी मराठीची देखील 2 आॅक्टोबर 2019 रोजी प्रसिद्ध झालेली बातमी देखील आढळून आली. यात असे बहुभाषिक होर्डिंग्ज शिवसेनेने का लावले याबाबबत खासदार संजय राउत यांनी स्पष्टीकरण दिल्याचे आढळले. यात राऊत यांनी बीबीसीशी बोलताना म्हटले होते की, देशाचे पंतप्रधान गुजराती आहेत. मुंबईत मराठी लोकांबरोबर गुजराती लोकही राहतात आणि ते शिवसेनेबरोबर आहेत. त्यांच्याही भाषेचा जर वापर केला तर गुन्हा काय? याचा अर्थ मराठीपण सोडलं असा होत नाही,”
बातमीत पुढे म्हटले आहे की,
आज जवळजवळ पाच दशकांनी आदित्य ठाकरे यांनी अशा प्रकारे बहुभाषिक बॅनर्स लावणं, हे शिवसेनेच्या बदलत्या राजकारणाचे एक लक्षण असल्याचं ‘फ्री प्रेस जर्नल’चे राजकीय संपादक प्रमोद चुंचूवार सांगतात. “निवडणुकीचं राजकारण सर्वांना समावेशक व्हायला भाग पाडतं, हेच यातून दिसून येतंय. हे आपल्या देशाच्या लोकशाहीचं वैशिष्ट्य आहे.
“एकेकाळी जी शिवसेना परप्रांतीयांना शिव्या घालत होती, त्या परप्रांतीयांसाठी शिवसेनेनं मेळावे घेतले. कारण अशी भूमिका घेतल्याशिवाय आपण सत्तेत येऊ शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. वरळी मतदारसंघ आणि एकूणच मुंबईमध्ये गुजराती समाज हा भाजपच्या पाठीशी राहतो. पण आपल्याला तो जवळचा मानत नाही, याची शिवसेनेला जाणीव आहे. तसंच इतके दिवस मराठी विरुद्ध गुजराती वाद पेटवण्यात शिवसेनाच आघाडीवर होती.”
तसंच आमचा पक्ष फक्त मराठी माणसांचा नाही तर गुजराती आणि इतर भाषक व्यक्तींशी संवाद साधण्यास, त्यांना आपलं म्हणायला आम्ही तयार आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांना ही कल्पना होती की आपल्यावर टीका होईल, पण गुजराती माणसांच्या मनात त्यांच्याबद्दल जी कटुता आहे, ती दूर व्हायला मदत होईल,” ते सांगतात
Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, मंत्री आदित्य ठाकरे यांचे उर्दु आणि गुजरातीमधील होर्डिंग्ज हे आताचे नाही तर दोन वर्षापूर्वीचे असून मराठीत देखील हे होर्डिंग्ज लावण्याच आले होते.
Result- Misleading
Our Source
दैनिक भास्कर– https://www.bhaskar.com/maharashtra/mumbai/news/kem-cho-worli-shiv-sena-puts-up-posters-of-aditya-thackeray-in-mumbai-01655363.html
बीबीसी मराठी– https://www.bbc.com/marathi/india-49904556
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा