Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
राहुल गांधींच्या भेटीवेळी उद्धव ठाकरेंचा कणा झुकला.
Fact
हा दावा एडिटेड फोटोच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
“हिंदुत्वाचा सोडला बाणा, हिंदुद्रोह्यांपुढे झुकला उबाठाचा कणा!” असे सांगत एक फोटो व्हायरल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीवेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपला कणा झुकवाला अर्थात वाकून नमस्कार केला अशा आशयाने हा दावा केला जात आहे.
आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर मिळाला.
येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी दिल्ली येथे जाऊन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधी आदींची भेट घेतली, या पार्श्वभूमीवर हा दावा केला जात आहे.
व्हायरल फोटोची बारकाईने पाहणी करता यात दाव्यात म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरे राहुल गांधी यांना वाकून नमस्कार करीत आहेत. राहुल गांधी यांच्या हातात पुष्पगुच्छ आहे. पाठीमागे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची छबी दिसत आहे. भिंतीवर झेंड्याच्या आकारात चंद्रकोर आणि चांदणीचे स्टिकर लावण्यात आले असल्याचे आमच्या निदर्शनास आले. यावरून हा फोटो एडिटेड असल्याचा आम्हाला संशय आला.
व्हायरल फोटोचा मुख्य स्रोत शोधण्यासाठी आम्ही त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला असता, शिवसेनेच्या अधिकृत X हॅन्डलने ७ ऑगस्ट २०२४ रोजी केलेली एक पोस्ट समोर आली. “पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची दिल्लीत भेट भेटली. यावेळी युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत उपस्थित होते.” अशी कॅप्शन आम्हाला वाचायला मिळाली.
या पोस्टमधील राहुल गांधींच्या भेटीचा तो फोटो आम्ही बारकाईने पाहिला.
यामध्ये व्हायरल फोटोप्रमाणेच सर्वकाही आहे मात्र पाठीमागील चंद्रकोर आणि चांदणी नसून उद्धव ठाकरे वाकलेले नव्हे तर ताठ उभे असलेले पाहायला मिळतात. विशेष म्हणजे व्हायरल फोटोतील उद्धव ठाकरे यांच्या अंगावरील पेहराव आणि या पोस्टमधील पेहराव वेगळा असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले.
व्हायरल फोटो आणि खरा फोटो यामध्ये आम्ही तुलनात्मक परीक्षण करून पाहिले. ते खाली पाहता येईल.
या तुलनेत व्हायरल फोटोत उद्धव ठाकरेंचा मूळ फोटो कापून एडिटिंग करण्यात आले असल्याचे स्पष्टपणे दिसून आले.
शिवसेना पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर सुद्धा या विशेष बैठकीचा फोटो प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्येही खऱ्या छायाचित्राची ओळख होऊ शकते. याच पेजच्या अपलोड केलेल्या व्हिडिओत राहुल गांधींच्या भेटीवेळी उद्धव ठाकरे यांनी परिधान केलेल्या पेहरावाचे पुरावे सापडतात.
यावरून एडिटेड फोटोच्या माध्यमातून दिशाभूल करणारा दावा केला जात असल्याचे स्पष्ट होते.
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्या भेटीवेळी उद्धव ठाकरे यांचा कणा झुकला असे सांगत व्हायरल केला जात असलेला दावा एडिटेड फोटोच्या माध्यमातुन केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
X post of @ShivSenaUBT_ on August 7, 2024
Facebook post by Shivsena on August 7, 2024
Video posted by Shivsena on August 7, 2024
Self analysis
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Vasudha Beri
June 19, 2025
Kushel Madhusoodan
June 18, 2025
Runjay Kumar
June 18, 2025