Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास १०...

Fact Check: ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास १० हजाराचा दंड? जाणून घ्या सत्य काय आहे

Claim
पॅन कार्ड आधार कार्डशी जोडण्याची शेवटची मुदत ३१ मार्च असून त्यानंतर असे न करणाऱ्यांना १० हजार रुपये दंड भरावा लागेल.

Fact
पॅन कार्ड आधार कार्डशी जोडण्याची शेवटची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे. सध्या १ हजार रुपये दंड भरून घेऊन हे लिंकिंग करून दिले जात आहे. मुदत संपल्यावर पॅन कार्ड अवैध ठरणार असून १० हजाराचा दंड स्वीकारला जाणार अशी घोषणा करण्यात आलेली नाही.

आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक करून घेण्यास विलंब झाल्यानंतर नियम बदलाची घोषणा झाली. याच पार्श्वभूमीवर सध्या एक दावा सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक न केल्यास १० हजाराचा दंड भरावा लागेल असे हा दावा सांगतो.

Fact Check: ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास १० हजाराचा दंड? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: Twitter@Atarangi_Kp

हा दावा ट्विटर च्या बरोबरीनेच व्हाट्सअप च्या माध्यमातूनही व्हायरल झाला आहे. या दाव्याने अद्याप ज्यांनी पॅन व आधार लिंक केले नाही अशा व्यक्तींना संभ्रमात टाकले आहे.

Fact Check/ Verification

पॅन आणि आधार लिंक न केल्यास १० हजाराचा दंड भरावा लागणार का? यादृष्टीने तपास करताना आम्ही कीवर्ड सर्च केला असता, आम्हाला यासंदर्भात बरेच मीडिया रिपोर्ट पाहायला मिळाले.

आम्हाला इंडिया टुडे ने २६ डिसेम्बर २०२२ रोजी प्रसिद्ध केलेला एक रिपोर्ट पाहायला मिळाला. आयकर विभागाने पॅन कार्ड धारकांना त्यांचा क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्याचा अंतिम इशारा दिला आहे. ताज्या सूचनेनुसार ३१ मार्च २०२३ पूर्वी पॅन आधारशी लिंक न केल्यास, पॅन निष्क्रिय होईल. अंतिम मुदतीनंतर, पॅन धारक त्यांचा दहा-अंकी अद्वितीय अल्फान्यूमेरिक नंबर वापरू शकणार नाहीत आणि पॅनशी जोडलेले आर्थिक व्यवहार थांबवले जातील. याशिवाय, सर्व आयकर प्रलंबित रिटर्नवर प्रक्रिया करणे थांबवले जाईल. असे हा रिपोर्ट सांगतो.

Fact Check: ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास १० हजाराचा दंड? जाणून घ्या सत्य काय आहे
Coutesy: India Today

उल्लेखनीय म्हणजे काहींना पॅन आधार लिंकिंगमधून सूट देण्यात आली आहे. आसाम, जम्मू आणि काश्मीर आणि मेघालय राज्यांमध्ये राहणाऱ्या व्यक्ती तसेच अनिवासींना आयकर कायदा, १९६१ नुसार ही सूट आहे. मागील वर्षात ऐंशी वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींनाही ही सवलत आहे. दरम्यान आधारशी पॅन लिंक करण्याच्या प्रक्रियेतून भारतीय नागरिकाला सूट नाही. असे आम्हाला वाचायला मिळाले.

आम्हाला फायनान्शियल एक्सप्रेस ने २३ मार्च २०२३ रोजी प्रकाशित केलेला एक रिपोर्ट वाचायला मिळाला. त्याप्रमाणे, “जर ३१ मार्च २०२३ पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केले नाही तर पॅन निष्क्रिय केले जाईल. केंद्रीय प्रत्यक्ष कर विभाग (CTBT) ने पॅन-आधार लिंकिंगची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली आहे. जी आधी ३१ मार्च २०२२ होती. त्यानंतर ३० जून २०२२ पर्यंत वाढवून विलंब शुल्क म्हणून ५०० रुपये भरावे लागले. त्यानंतर ३० जून २०२२ ते ३१ मार्च २०२३ पर्यंत विलंब शुल्क १ हजार रुपये करण्यात आले आहे.” अशी माहिती वाचायला मिळाली.

Fact Check: ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास १० हजाराचा दंड? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: Financial Express

पॅन आधार लिंकवरील इतर मीडिया रिपोर्ट्स येथे, येथे आणि येथे पाहता येतील.

पॅन-आधार लिंकबद्दल अधिक माहितीसाठी, आयकर विभागाची वेबसाइट तपासली, जेथे ३० मार्च २०२२ रोजी जारी केलेले परिपत्रक उपलब्ध आहे. यामध्ये ३० मार्च २०२२ नंतर पॅन आधार लिंक करणाऱ्यांना १००० दंड भरावा लागेल, असे सांगण्यात आले आहे. २०२३ च्या ३१ मार्चनंतर पॅन निष्क्रिय होईल आणि पॅनच्या वापराद्वारे कोणत्याही प्रकारचे व्यवहार (बँकिंग, शेअर व्यवहार, खरेदी इ.) करणे शक्य होणार नाही. असे वाचायला मिळाले.

PAN आधार लिंकिंगबाबत ३० मार्च २०२२ रोजी Central Board of Direct Taxes ने जारी केलेली प्रेस नोट येथे पाहता येईल.

Fact Check: ३१ मार्च पर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक न केल्यास १० हजाराचा दंड? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: Central Board of Direct Taxes

आयकर खात्याने यासंदर्भात २८ फेब्रुवारी २०२३ रोजी जारी केलेले ट्विट ही आम्हाला पाहायला मिळाले.

यामध्येही ३१ मार्च २०२३ पर्यंत पॅन कार्ड आधाराशी लिंक न केल्यास ते स्थगित किंवा अवैध ठरेल असा उल्लेख आढळला. मात्र १० हजार रुपये दंडाचा उल्लेख कुठेही पाहायला मिळालेला नाही. आयकर खात्याने जारी केलेल्या Frequently Asked Questions (FAQ) मध्येही १ हजार रुपये विलंब शुल्क भरून ३१ मार्च २०२३ पर्यंत हे पॅन आधार लिंकिंग करून घेण्याची माहिती आम्हाला मिळाली.

Conclusion

याप्रकारे आमच्या तपासात आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्याची अखेरची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे हे खरे आहे. मात्र त्यानंतर लिंक न केलेले पॅन कार्ड स्थगित केले जाणार असून १० हजार रुपये दंडाची तरतूद कोठेही करण्यात आलेली नाही.

Result: Partly False

Our Sources:

Circular published by Income Tax Department on March 30, 2022

Press Note of Income Tax Department on March 30, 2022

Link Aadhar FAQ

Report published by India Today on December 26, 2022


Report published by Finacial Express on March 22, 2023


Tweet made by Income Tax Department on February 28, 2023


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular