Authors
Claim
आपल्या घरापासून ६० किमीच्या आत टोल भरण्याची गरज नाही. असे नितीन गडकरी म्हणाले.
Fact
हा दावा खोटा आहे. प्रत्यक्षात त्यांनी ६० किमीच्या आत दुसरा टोलनाका असणे गैर असून असे असल्यास तो बंद केला जाईल. असे विधान केले आहे.
आपल्या घरापासून ६० किमीच्या आत टोल भरण्याची गरज नाही, असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी म्हणाले, असे सांगणारा दावा त्यांच्या एक भाषणाचा व्हिडीओ घेऊन केला जात आहे. न्यूजचेकरला हा दावा कन्नड भाषेत व्हाट्सअपवर आढळला.
Fact Check/ Verification
वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओची कसून तपासणी केली आहे. ०.३६ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोकसभेत बोलताना ऐकू येत आहेत की, “स्थानिक लोकांनी त्यांचे आधार कार्ड दाखवले तर पास जारी केला जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे ६० किलोमीटरच्या अंतरावर एकापेक्षा जास्त टोल प्लाझा असू शकत नाही. जर ते असेल तर ते बेकायदेशीर आहे आणि ते तीन महिन्यांत तपासले जाईल आणि काढून टाकले जाईल.”
यावर आधारित, आम्ही Google कीवर्ड शोध घेतला. डेक्कन हेराल्डने २२ मार्च २०२२ रोजी प्रकाशित केलेल्या बातमीत म्हटले आहे की, “केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी घोषणा केली की राष्ट्रीय महामार्गावरील ६० किलोमीटर अंतरावरील एकापेक्षा अधिक असलेले टोलनाके पुढील तीन महिन्यात हटवले जातील.” त्याच बातमीत लिहिले आहे की, गडकरी म्हणाले, “महामार्गावरील वाहतूक सुरळीत चालण्यासाठी टोल प्लाझाजवळील स्थानिक रहिवाशांना त्यांच्या आधार कार्ड पत्त्याच्या आधारे सरकार मोफत पास जारी करेल.” ते रस्ते आणि महामार्गांच्या संदर्भातील पुढील अर्थसंकल्पातील निधी वाटपावरून उपस्थित एका प्रश्नावरील चर्चेला उत्तर देत होते.
२२ मार्च २०२२ रोजीच्या द हिंदू मधील वृत्तानुसार, “केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी लोकसभेत घोषणा केली की राष्ट्रीय महामार्गांवर ६० किमी अंतरासाठी एकच टोल प्लाझा असेल आणि एकापेक्षा जास्त असेल तर असे टोल प्लाझा येत्या तीन महिन्यांत बंद होतील.”
आम्ही २२ मार्च २०२२ रोजी ANI द्वारे ट्विट केलेली अशीच पोस्ट देखील पाहिली. “आम्ही टोल प्लाझाजवळ राहणाऱ्या स्थानिकांना आधार कार्डद्वारे पास देऊ. शिवाय, ६० किमीच्या परिघात एकच टोल प्लाझा असल्याची खात्री केली जाईल. जर तेथे दुसरा टोल प्लाझा असेल तर तो पुढील ३ महिन्यांत बंद होईल: केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी लोकसभेत.” असे त्यामध्ये लिहिलेले आहे.
तत्सम रिपोर्ट येथे, येथे, येथे पाहिले जाऊ शकतात.
Conclusion
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्षात त्यांनी ६० किमीच्या आत दुसरा टोलनाका असणे गैर असून असे असल्यास तो बंद केला जाईल. असे विधान केले आहे.
Result: Missing Context
Our Sources
Report By Deccan Herald, Dated: March 22, 2022
Report By The Hindu, Dated: March 22, 2022
Tweet By ANI, Dated: March 22, 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा