Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सध्या सोशल मीडियावर मीडियावर सध्या एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही लोक भांडताना दिसत आहेत.दावा केला जात आहे की, अभिनेता अजय देवगणला शेतकरीपुत्रांनी दिल्ली एअरपोर्टवर मारहाण केली आहे. ब-याच यूजर्सनी व्हिडीओ शेअर करताना म्हटले आहे की, शेतकरी समर्थकांनी अजय देवगणला मारहाण केली
विशेष म्हणजे काही काळापूर्वी अजय देवगणने शेतकरी आंदोलनाला मिळणा-या आंतरराष्ट्रीय पाठिंब्यास विरोध केला. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, आहे की भारत किंवा भारतीय धोरणांविरोधात रचल्या जाणा-या खोट्या प्रचारास पडू नका. त्यानंतर काही आंदोलकारी समर्थकांनी मुंबईतील गोरेगाव येथे आंदोलन करुन अजय देवगणचा निषेध केला होता.
अशातच शेतकरीपुत्रांकडून अजय देवगणला मारहाण झाल्याच्या दाव्याने पोस्ट व्हायरल झाली आहे. यात म्हटले आहे की, “शेतक-याची भूमिका करून कोट्यवधी रूपये मिळवणा-या अजय देवगणने शेतकरी अंदोलनाविषयी सहानुभूती दाखवली नाही…..पण या आंदोलना विरोधात ट्विट करून गरळ ओकली!त्यामुळे शेतकरी पुत्रांनी खरोखरची फायटींग करून अजय देवगणला तुडवला”
हा दावा हिंदी भाषेत देखील जास्त व्हायरल होत आहे.
CrowdTangle वर मिळालेल्या माहितीनुसार, अजय देवगणला मारहाण केल्याचा दावा करत आतापर्यंत शेकडो लोकांनी ट्विटर आणि फेसबुकवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. फेसबुक वर Rangrez Ki Awaz news व्हिडिओ सगळ्यात जास्त पाहिला गेला आहे.
व्हायरल व्हिडिओची सत्यता जाणून घेण्यासाठी त्यातील काही कीफ्रेम्स InVID च्या मदतीने तसेच गूगल रिव्हर्स इमेज सर्च च्या मदतीने शोधले. यावेळी आम्हाला NDTV ची 28 मार्च 2020 रोजीची बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, हा व्हिडिओ सध्याचा नाही तर एक वर्षाचा आहे. या अहवालानुसार व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती अजय देवगन नाही किंवा हा व्हिडिओ दिल्ली एअरपोर्टवर पार्किंगवरून लढणार्या दोन गटांचा आहे.
तपासणी दरम्यान आम्हाला India Today यूट्यूब वाहिनीवर व्हायरल क्लेमशी संबंधित संपूर्ण व्हिडिओ देखील आढळला. हा व्हिडिओ 27 मार्च 2020 रोजी अपलोड करण्यात आले आहेत. या व्हिडिओमध्ये दोन्ही गट भांडताना दिसत आहेत. तसेच या व्हिडिओमध्ये हेही पाहिले जाऊ शकते की पांढ-या शर्टमध्ये दिसणारी व्यक्ती अभिनेता अजय देवगण नाही.
अजय देवगणच्या नावाने मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओतील व्यक्ती ते नाहीत अशी माहिती अजय देवगणच्या प्रवक्त्याने प्रसिद्धीपत्रकात दिली आहे. तानाजी चित्रपट रिलीज झाल्यानंतर जानेवारी 2020 पासून अजय देवगण दिल्लीला गेलेले नाहीत. त्यामुळे अजय देवगण यांनी दिल्लीत मारहाण झाल्याचे वृत्त खोटे आहे. अजय देवगण सध्या मुंबईत विविध चित्रपटांच्या शूटींगमध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे यात म्हटलेले आहे.
आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, अजय देवगणला दिल्ली एअरपोर्टवर मारहाण झालेली नाही. व्हायरल व्हिडिओत पांढरा शर्ट परिधान केलली व्यक्ती अजय देवगण नसून रिअल इस्टेट डीलर नवीन शौकीन आहे. मार्च 2020 मध्ये त्याला दिल्ली विमानतळावर भांडणाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
India Today – https://www.youtube.com/watch?v=Utx6teiJnAE&feature=emb_title
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Rangman Das
December 12, 2023
Prasad S Prabhu
May 18, 2023
Prasad S Prabhu
January 31, 2023