Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
गांधी कुटुंबावर आरोप करणारा अमूलचा जाहिरात फलक.
सदर पोस्ट येथे पाहता येईल.
व्हायरल फोटोमध्ये दिसणाऱ्या जाहिरात फलकावर Google लेन्स शोधामुळे आम्हाला @Amul_Coop च्या 24 जानेवारी, 2019 च्या X पोस्टकडे नेले. त्यात प्रियंका आणि राहुल गांधी यांचे कॅरिकेचर असून त्यावर इंग्रजीत “Family Stree! Amul of Bhais and Behens.” असे लिहिलेले आहे.
हेच चित्र अमूलच्या अधिकृत वेबसाइटवर देखील उपलब्ध असून, “प्रियांका गांधी राजकारणात सामील!” असा मजकूर दिसतो. 24 जानेवारी 2019 रोजीच्या इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात, उत्तर प्रदेश पूर्वेतील AICC सरचिटणीस म्हणून प्रियांका गांधींच्या राजकारणात प्रवेशाची नोंद घेणाऱ्या अमूलच्या व्यंगचित्रावर तपशीलवार लिहिण्यात आले आहे.
आम्हाला “इव्हेंट मीडिया आणि प्रमोशन” या वेबसाइटवर सूचीबद्ध केलेल्या व्हायरल प्रतिमेसारखा एक फोटो देखील सापडला. दोन्ही प्रतिमांची तुलना केल्यावर, आम्हाला बोर्डवर प्रदर्शित केलेल्या जाहिरातीशिवाय त्या एकसारख्या असल्याचे आढळले.
शिवाय, व्हायरल फोटोमध्ये दिसत असलेल्या फलकावर “Ratnesh” (रतनेश) चे वॉटरमार्क असल्याचे आमच्या लक्षात आले, जे कदाचित त्याच नावाच्या एखाद्या व्यक्तीने एडिट केले असावे.
त्यामुळे, गांधी कुटुंबावर आरोप करणारा अमूलचा जाहिरात फलक दाखविणारा व्हायरल फोटो एडिटेड असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.
Sources
X Post By @Amul_Coop, Dated January 24, 2019
Report By Indian Express, Dated January 24, 2019
Event Media & Promotion Website
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम वसुधा बेरी यांनी केले असून ते येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 8, 2025
Ishwarachandra B G
February 8, 2025
Prasad Prabhu
January 18, 2025