Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
दुसऱ्या प्री वेडिंग मध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट शुद्ध सोन्याच्या पोशाखात दिसत आहेत.
Fact
व्हायरल फोटो AI जनरेटेड असून हा दावा खोटा आहे.
सोन्याच्या पोशाखात चमकणाऱ्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दावा आहे की, “दुसऱ्या प्री वेडिंग मध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट शुद्ध सोन्याच्या पोशाखात दिसत आहेत.”
आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर मिळाला.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
व्हायरल इमेज बद्दल शोधण्यासाठी आम्ही काही किवर्डसचा वापर केला. मात्र कोणत्याच माध्यमाने याबद्दल अधिकृत माहिती दिली नाही. दुसऱ्या प्री वेडिंगसाठी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी सोन्याचा पेहराव परिधान केला असता तर मोठी बातमी झाली असती, मात्र आम्हाला ते आढळले नाही.
दरम्यान आम्ही व्हायरल इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला Anant Ambani या इंस्टाग्राम खात्यावरून हाच फोटो शेयर झाल्याचे पाहावयास मिळाले. “Beauty of AI…..” अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली असल्याचे आम्हाला दिसले. यावरून हा फोटो AI जनरेटेड असल्याचा सुगावा लागला.
आम्ही व्हायरल फोटोची ओरिजिनल आवृत्ती शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र आम्हाला यामध्ये यश आले नाही.
दरम्यान आम्ही the hivemoderation या वेबसाईटवर व्हायरल फोटोचे अनॅलिसिस करण्याचा प्रयत्न केला असता, आम्हाला हा फोटो 99.9% आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्राचा वापर करून तयार करण्यात आला आहे, अशी माहिती मिळाली.
यावरून अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी प्रत्यक्षात सोन्याचा पोशाख घातलेला नसल्याचे स्पष्ट झाले.
दुसऱ्या प्री वेडिंग मध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट शुद्ध सोन्याच्या पोशाखात दिसत आहेत हा दावा खोटा आहे. प्रत्यक्षात व्हायरल फोटो AI जनरेटेड आहे. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Self analysis
Instagram post by ananthambani
Analysis done on hivemoderation.com
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
July 20, 2024
Tanujit Das
July 17, 2024
Kushel Madhusoodan
July 11, 2024