Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
वीजेच्या ट्रांसफार्मरला कवटाळून आत्महत्या करणारा इसम शेतकरी असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात एक इसम ट्रांस्फार्मरवर चढलेला दिसत आहे तर खालून काही लोक त्याला आवाज देत आहेत. पण तो कुणाचेच एेकत नाही, तो ट्रांसफार्मरचा खटका हाताने ओढतो त्यावेळी जाळ निर्माण होतो आणि इसम खाली फेकला जातो.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा व्हिडिओ इतका शेअर करा की, मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचले आणि आम्हा शेतकरी बांधवांना न्याय मिळेल..आपला एक आशावादी शेतकरी… शेतकरी वाचला तरच सरकार वाचेल.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रत्न केला. काही किवर्डसच्या आधारे गूगमध्ये शोध घेतला मात्र शेतक-याने ट्रांसफार्मरला कवाटळून आत्महत्या केल्याची बातमी आढळून आली नाही. त्यामुळे आम्ही या व्हिडिओबाबत अधिक शोध घेण्यासाठी Google Reverse Image च्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला हा व्हिडिओI Love My Pakistan नावाच्या फेसबुक पेजवर आढळून आला मात्र यात हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती देण्यात आलेली नाही.

या व्हिडिओबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्ही पुढे शोध सुरु ठेवला असता आम्हाला एका रशियन वेबसाईटवर हा व्हिडिओ आढळून आला. यात हा व्हिडिओ भारतातील असल्याचे म्हटले आहे मात्र या वेबसाईटवर देखील पूर्ण माहिती देण्यात आलेली नाही.

आम्ही पुन्हा नव्याने काही किवर्डसच्या साहाय्याने शोध घेतला असता युट्यूबमध्ये Dinamalar नावाच्या चॅनलवर हा व्हिडिओ मागील वर्षी अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले. तमिळ भाषेतील डिस्क्रिप्शनचा आम्ही अनुवाद केला असता हा व्हिडिओ एका चौकशी सुरु असलेल्या आर्मी जवानाचा असल्याची माहिती मिळाली. हा जवान मदुराई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच्या ट्रांसफार्मरवर चढला आणि त्याने खटका ओढून आत्महत्येचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या जवानाला हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. या जवानाच्या पत्नीचे नुकतेच निधन झाल्याचा उल्लेख देखील या व्हिडिओत करण्यात आला आहे.
याबाबत अधिक तपास केला असता आम्हाला टाईम्स ाॅफ इंडियाची 8 जानेवारी 2020 रोजीची बातमी आढळून आली. ज्यात म्हटले आहे की, राजस्थानमध्ये पोस्टिंग असलेल्या जवान पी मुथ्थू वय 25 याने मदुराई जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळच्या ट्रांसफार्मरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. ट्रांसफार्मरच्या झटक्याने तो 10 फूट उंचीवरुन फेकला गेला. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार तो 20 टक्के भाजला असून त्याच्या हाताला मार लागला आहे. सध्या हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने घरगुती कारणावरु विष घेतले होते तिचा हाॅस्पिटलमध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला होता अशी महिती या बातमीत देण्यात आली आहे.

Times of India- https://timesofindia.indiatimes.com/city/madurai/army-man-under-inquiry-attempts-suicide/articleshow/73146830.cms
Dinamalar- https://www.youtube.com/watch?v=oyESN5ChoFs
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.