Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
केंद्र सरकारने केलेल्या नवीन कृषि कायद्यांविरोधात दिल्ली सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे शेतकरी नेते राकेश टिकेत हे देशभरातील शेतकरी महापंचायतींमध्ये सामील होत आहेत. दरम्यान सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, यात असा दावा केला जात आहे की ओडिशामध्ये राकेश टिकेत यांना मारहाण केली गेली. टिकेत महापंचायतीत सहभागी होण्यासाठी ओडिशा येथे गेले होते.
हिंदीमध्ये व्हायरल होत असलेल्या या पोस्ट म्हटले आहे की, “खबर है कि राकेश टिकैत को उड़ीसा में दो-चार थप्पड़ पड़े है!! पड़े हैं या पड़वायें गए हैं??ये टिकैत केजरीवाल का ही चेला है, मीडिया का कैमरा अपने आप पर से हटते ही यही फॉर्म्युला केजरीवाल कई बार अपना चुका है। अपने गुरु के सभी गुण ये चेला सीख चुका है यानी अब ऐसी खबरें आती ही रहेंगी।
मराठी अनुवाद- बातमी येतेय की राकेश टिकेतला उडीसात दोन-चार थपडा मारल्या गेल्या, मारल्या की मारायला लावल्या. हा टिकेत केजरवालचा चेला आहे, मीडियाचा कॅमेरा त्यांच्यावरुन थोडा हटला की हाच फाॅर्म्युला केजरीवाल देखील अनेक वेळा वापरला आहे. आपल्या गुरुचे सगळे गुण हा चेला शिकलेला आहे. म्हणजे आता अशा बातम्या येत राहतील.
शेतकरी नेते राकेश टिकेत यांना ओडिशात थप्पड लगवाल्याची घटना खरी आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला., सर्वात आधी कीवर्डच्या मदतीने इंटरनेटवर या घटनेचा शोध घेतला. जर अशी एखादी घटना घडली असती तर ती माध्यमांमध्ये नक्कीच प्रसिद्ध झाली असती मात्र अशी कोणतीही बातमी आढळून आली नाही.
दरम्यान आम्हाला एक बातमी आढळून आली. 19 मार्च रोजी प्रसिद्ध झालेल्या या वृत्तानुसार, टिकेत ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील चांदीखोल येथील महापंचायतीला संबोधित करण्यासाठी जात होते, त्यावेळी कटक गुरुद्वारा समोर टिकेत आणि त्यांच्या समर्थकांवर करण्याचा प्रयत्न केला गेला. मीडिया रिपोर्टनुसार, हे हल्लेखोर देवसेनेचे कार्यकर्ते असल्याचे समजते, घटनेत टिकेत आणि त्यांच्या समर्थकांना मारहाण झालेली नाही.
याशिवाय दैनिक जागरणच्या बातमीत देखील हीच माहिती देण्यात आलेली आहे. यात म्हटले आहे की, ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातील चांदीखोल येथे किसान महापंचायतीला संबोधित करून परतत असताना शुक्रवारी कटक गुरुद्वारासमोर शेतकरी नेते राकेश टिकेत आणि त्यांच्या समर्थकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हल्लेखोर हे देव सेनेचे कार्यकर्ते म्हणून ओळखले गेले आहेत. या हल्ल्यात शेतकरी नेते राकेश टिकैत यांना काहीही झाले नाही, परंतु सुमारे अर्धा तास गुरुद्वारासमोर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. देव सेनेच्या कार्यकर्त्यांनी टिकैत यांच्याविरोधात घोषणाबाजी केली तसेच त्यांच्या गाडीवर दगडफेक केली.
याबाबत कटकचे डीसीपी प्रितीक सिंग यांनी व्हायरल होत असलेल्या दाव्यासदंर्भात माहिती देताना माध्यमांना सांगितले की. व्हायरल पोस्टमध्ये केलेला दावा खोटा आहे. शेतकरी महापंचायत संपल्यांतर टिकेत गुरुद्वारा मंदिरात आले होते. ते तिथून निघून गेल्यावर देव सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पोस्टर फाडले यावरुन त्यांच्या समर्थकांत आणि कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक झाली या सर्सव गोंधळात टिकेत घटनास्थळी नव्हते तर ते आधीच तिथून निघून गेले होते.
आमच्या पडताळणीतून स्पष्ट झाले की, शेतकरी नेते राकेश टिकेत यांना मारहाण झालेली नाही किंवा त्यांना थप्पड लगावण्यात आलेली नाही. देव सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला तेव्हा टिकेत त्याठिकाणी उपस्थित नव्हते.
Dainik Jagaran- https://www.jagran.com/odisha/bhubaneshwar-attempt-to-attack-on-rakesh-tikait-and-his-supporters-in-odisha-21479490.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
October 22, 2024
Runjay Kumar
August 6, 2024
Komal Singh
July 29, 2024