Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
असदुद्दीन ओवैसी यांनी "आय लव्ह मोहम्मद" लिहिलेली फोटो फ्रेम स्वीकारण्यास नकार दिला.
व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे. गुंबद-ए-खजराजवळ त्यांचा फोटो लावण्यात आल्याने ओवैसी नाराज झाले होते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचं ट्विटर) वर एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांचा फक्त चार सेकंदांचा एक व्हिडिओ क्लिप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते काही तरुणांसोबत फोटो काढताना दिसतात आणि आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांशी काहीतरी बोलताना पाहायला मिळतात. हा व्हिडिओ “आय लव्ह मोहम्मद“ या वादाशी जोडून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. पोस्ट शेअर करताना काही युजर्स असा दावा करत आहेत की असदुद्दीन ओवैसी यांनी ‘I Love Muhammad’ लिहिलेला फ्रेम घेण्यास नकार दिला.
एक्सवरील एका पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “कार्यक्रमानंतर काही तरुणांनी असदुद्दीन ओवैसी यांना ‘I Love Muhammad’ असा फोटो फ्रेम भेट दिला. ओवैसींनी तो स्वीकारण्यास नकार देत म्हटलं — ‘मला यात सहभागी करू नका, हे तुम्हीच ठेवा. हे मोठं प्रकरण आहे.’”

असदुद्दीन ओवैसी यांनी ‘I Love Muhammad’ लिहिलेला फोटो फ्रेम स्वीकारण्यास नकार दिल्याचा दावा करणाऱ्या व्हायरल व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही त्या व्हिडिओतील कीफ्रेम्स Google Lens च्या मदतीने शोधल्या. या प्रक्रियेदरम्यान आम्हाला हिंदुस्तान, टीव्ही 9 भारतवर्ष आणि एबीपी न्यूज या वृत्तसंस्थांनी प्रकाशित केलेल्या काही अहवालांचा मागोवा लागला.

या अहवालांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, ओवैसींनी ‘I Love Muhammad’ लिहिलेली फ्रेम त्यामुळे स्वीकारली नाही, कारण त्या फ्रेममध्ये गुंबद-ए-खजरा या पवित्र स्थळासोबत त्यांचा स्वतःचा फोटोही लावलेला होता.
इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, गुंबद-ए-खजरा हे सौदी अरेबियातील मदीना शहरात स्थित एक हिरव्या रंगाचं गुम्बद आहे. हे इस्लाम धर्मातील अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ मानलं जातं. या गुम्बदाखाली पैगंबर मोहम्मद आणि त्यांचे दोन सहकारी — खलीफा अबू बक्र आणि खलीफा उमर — यांच्या कबरी आहेत. ‘खजरा’ हा शब्द अरबी भाषेत हिरवा रंग या अर्थाने वापरला जातो, आणि त्या हिरव्या रंगामुळे या गुम्बदाला ‘गुंबद-ए-खजरा’ असं नाव मिळालं.
व्हायरल दाव्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही असदुद्दीन ओवैसी यांचा अधिकृत X (माजी ट्विटर) हँडल तपासला. तपासादरम्यान लक्षात आलं की ‘Fuzail Farooq’ नावाच्या एका एक्स युजरने त्या व्हायरल दाव्याचे खंडन केलं होतं, आणि तेच खंडन ओवैसींनी स्वतः त्यांच्या खात्यावर रिपोस्ट केलं आहे. या रिपोस्टमध्ये या घटनेचा संपूर्ण संदर्भ स्पष्ट करण्यात आला आहे.

पोस्टमध्ये सांगितलं आहे की ओवैसी यांच्या नाराजीचं मुख्य कारण असं होतं की त्यांच्या समर्थकांनी पवित्र गुंबद-ए-खजरा (मदीनेतील हिरवा गुम्बद) यांच्या शेजारी त्यांचा स्वतःचा फोटो लावला होता. त्यामुळे ओवैसींनी आपला फोटो हाताने झाकून त्या फ्रेमसोबत फोटो काढला, पण तो फोटो फ्रेम सन्मानपूर्वक स्वीकारण्यास नकार दिला.
हैदराबादमधील प्रमुख वृत्तपत्र ‘डेली एत्माद’ यांनीही ३ ऑक्टोबर रोजी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला होता. त्या पोस्टमध्ये हे संपूर्ण दृश्य पाहता येतं. कॅप्शनमध्ये लिहिलं आहे – कुठं गुम्बद-ए-खजरा आणि कुठं मी, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
त्या पोस्टमध्ये पुढे नमूद आहे की काही लोकांनी एआयएमआयएम अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांना एक फ्रेम भेट म्हणून दिली होती, ज्यात हिरवा गुम्बद (गुंबद-ए-खजरा) आणि ‘I Love Muhammad ’ असा मजकूर होता. त्याच्यासोबत ओवैसी यांचा स्वतःचा फोटोही होता. ओवैसींनी जेव्हा ती फ्रेम पाहिली, तेव्हा ते म्हणाले की कुठं गुम्बद-ए-खजरा आणि कुठं मी. हे शब्द त्यांनी आपली प्रतिमा झाकण्यासाठी आणि त्या पवित्र स्थळाचा आदर राखण्यासाठी उच्चारले.
आमच्या तपासणीत मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होतं की, एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांचा व्हिडिओ दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला जात आहे.
Sources
Media Reports by Hindustan, TV9 Bharatvarsh & ABP News
X repost by Asaduddin Owaisi and post by Fuzail farooq
Instagram Reel by Etemaad Daily
Runjay Kumar
July 14, 2025
Prasad S Prabhu
April 4, 2025
Prasad S Prabhu
September 30, 2024