Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
मुंबईत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवत आहेत.
Fact
व्हायरल व्हिडिओ भारतातील नाही. पोप फ्रान्सिस यांच्या पूर्व तिमोर भेटीदरम्यान सामूहिक प्रार्थना समारंभासाठी जमलेल्या गर्दीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने शेयर केला जात आहे.
मुंबईत मुस्लिमांच्या शक्तिप्रदर्शनाच्या दाव्यासह एक व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल केला जात आहे. विशेष म्हणजे सोशल मीडिया यूजर्सच्या बरोबरीनेच काही अधिकृत माध्यमांनीही हा व्हिडीओ शेयर केला आहे.


दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
जनसत्ता आणि अमर उजाला या माध्यमांनीही आपापल्या युट्युब चॅनेलवरून हे व्हिडीओ प्रसारित केल्याचे आमच्या निदर्शनास आले.


महत्वाचे म्हणजे 23 सप्टेंबर रोजी मुंबईतील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) च्या नेत्यांनी छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी संविधान रॅली काढली होती. माजी खासदार इम्तियाज जलील आणि वारिस पठाण या रॅलीचे नेतृत्व करत होते. यादरम्यान अल्पसंख्याकांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल भाजप आमदार नितीश राणे आणि हिंदू संत रामगिरी महाराज यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. या रॅलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याच पार्श्वभूमीवर हा व्हिडिओ शेअर करण्यात येत आहे.
Newschecker ने व्हायरल दाव्याच्या पडताळणीसाठी व्हायरल व्हिडिओच्या काही किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला Nigerian Catholics नामक फेसबुक पेजने 12 सप्टेंबर 2024 रोजी केलेल्या पोस्टमध्ये हाच व्हिडीओ आढळला. पोस्टचे कॅप्शन पुढीलप्रमाणे आहे, “Pope Francis Welcome historic visit to Timoleste a Country with 100% Catholic root”
“100% कॅथोलिक मूळ असलेल्या तिमोर देशाला पोप फ्रान्सिस यांच्या ऐतिहासिक भेटी दरम्यान त्यांचे असे स्वागत करण्यात आले.” असे या मूळ इंग्रजी कॅप्शनचे भाषांतरण आम्हाला मिळाले. यावरून हा व्हिडीओ भारतातील किंवा मुंबईतील नसून तिमोर या देशातील असल्याची खात्री आम्हाला पटली.
यासंदर्भातील संकेत घेऊन आम्ही किवर्डसच्या साहाय्याने गुगलवर शोध घेतला असता, या भेटीची पुष्टी करणारे मीडिया रिपोर्ट्स आम्हाला प्राप्त झाले.
CNN च्या 10 सप्टेंबर 2024 च्या बातमीत आम्हाला याबद्दल विस्तृत माहिती मिळाली. “दक्षिण-पूर्व आशियातील एक छोटासा देश असलेल्या पूर्व तिमोरमध्ये पोप फ्रान्सिस यांचे भव्य स्वागत करण्यात आले. पूर्व तिमोर हा जगातील सर्वाधिक कॅथोलिक लोक असलेल्या देशांपैकी एक आहे. 9 सप्टेंबर 2024 रोजी पोपच्या सामूहिक प्रार्थना समारंभात सुमारे 6 लाख लोकांचा जमाव जमला होता.” असे बातमीत लिहिलेले आहे.

reuters ने सुद्धा 10 सप्टेंबर 2024 रोजी प्रकाशित केलेल्या बातमीत पोपच्या भेटीवेळी झालेली गर्दी आणि त्यासंदर्भात केलेला व्हिडीओ रिपोर्ट पाहता येईल.

वृत्तसंस्था असोसिएटेड प्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, “पूर्व तिमोरमधील जवळपास निम्मी लोकसंख्या या प्रार्थना समारंभात सहभागी झाली होती. 35 वर्षांपूर्वी इंडोनेशियापासून देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात तत्कालीन पोप जॉन पॉल II यांनी प्रार्थना केली होती त्याच मैदानावर हा प्रार्थना समारंभ आयोजित करण्यात आला होता.”

UN मधील पूर्व तिमोरचे माजी स्थायी प्रतिनिधी कार्लिटो नुनेस यांनीही आपल्या X हँडलवर सोहळ्याची काही चित्रे आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यातील एक छायाचित्र व्हायरल व्हिडिओच्या मुख्य फ्रेमचे आहे.
Sky News Australia ने 11 सप्टेंबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ न्यूजमध्येही व्हायरल व्हिडिओतील दृश्ये समाविष्ट आहेत.
शोध केल्यावर, आम्हाला हा व्हिडिओ मोरोक्को न्यूजच्या अधिकृत X हँडलवर 16 सप्टेंबर रोजी केलेल्या X पोस्ट (संग्रहण) मध्ये देखील सापडला. पोस्टच्या कॅप्शनमध्ये पोप फ्रान्सिस यांनी तिमोर-लेस्टेला दिलेली भेट असे देखील वर्णन केले आहे.
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात मुंबईत मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवत आहेत असे सांगणारा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हायरल व्हिडिओ भारतातील नाही. पोप फ्रान्सिस यांच्या पूर्व तिमोर भेटीदरम्यान सामूहिक प्रार्थना समारंभासाठी जमलेल्या गर्दीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने शेयर केला जात आहे.
Our Sources
Facebook post made by Nigerian Catholics on September 12, 2024
News published by CNN on September 10, 2024
News published by Reuters on September 10, 2024
News published by AP on September 10, 2024
Tweet made by Karlito Nunes on September 11, 2024
News published by Sky News Australia on September 11, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
October 30, 2025
Raushan Thakur
October 10, 2025
Tanujit Das
September 29, 2025