Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
बालासोर रेल्वे अपघातास जबाबदार आरोपी स्टेशन मास्टर शरीफ पश्चिम बंगालच्या मदरशात लपला होता, त्याला सीबीआय ने पकडले असून त्याची धुलाई सुरु आहे.
Fact
बालासोर रेल्वे अपघाताशी कोणत्याही स्टेशन मास्टर शरीफ चा संबंध नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. दरम्यान जुना व्हिडीओ शेयर करून खोटा दावा केला जात आहे.
बालासोर रेल्वे अपघात झाल्यानंतर अनेक दावे व्हायरल झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर या रेल्वे अपघाताचा प्रमुख जबाबदार आरोपी स्टेशन मास्टर शरीफ याला सीबीआय ने पकडले असून त्याची धुलाई सुरु असल्याचा दावा केला जात आहे.
या दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
ट्विटर च्या माध्यमातूनही असे समान दावे आम्हाला पाहायला मिळाले.
व्हाट्सअप च्या माध्यमातूनही हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.
बालासोर रेल्वे अपघाताला जबाबदार असलेला स्टेशन मास्टर शरीफ बेपत्ता झाला असून त्याचा शोध सुरु आहे, असा दावा यापूर्वी झाला होता. न्यूजचेकरने ७ जून २०२३ रोजी यासंदर्भात तथ्यतपासणी करून या अपघाताशी शरीफ नावाचा स्टेशन मास्टर संबंधित नाही. हे स्पष्ट केले होते.
उल्लेखनीय म्हणजे, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितल्याप्रमाणे, “इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाला.”
“फरार” स्टेशन मास्टर दर्शविण्यासाठी शेअर केलेली व्हायरल प्रतिमा “कोट्टावलासा किरंदुल केके लाइन” या ब्लॉगमध्ये २००४ मध्ये वापरली गेल्याचेही आम्हाला दिसून आले आहे.
न्यूजचेकरने सीपीआरओ आदित्य कुमार चौधरी यांच्याशीही संपर्क साधला ज्यांनी बहनगा बाजार स्टेशन मास्टरबद्दलचा व्हायरल दावा फेटाळून लावला. ते म्हणाले की, स्टेशनवर शरीफ नावाचा एकही कर्मचारी किंवा स्टेशन मास्टर तैनात नव्हता. चौधरी पुढे म्हणाले, “कोणताही कर्मचारी कर्तव्यावरून फरार नाही. ते तपासाचा भाग आहेत. ते सर्व तपासात सहकार्य करत आहेत.”
असे असताना पुन्हा स्टेशन मास्टर शरीफ सीबीआय च्या ताब्यात सापडला आहे, असा दावा करण्यात आल्याने आम्ही सीबीआय च्या अधिकृत ट्विटर हँडलची पाहणी केली. याप्रकारच्या कोणत्या व्यक्तीला पकडण्यात आले आहे का? यादृष्टीने आम्ही पाहणी केली असता, आम्हाला काहीच हाती लागले नाही.
व्हायरल दाव्यामध्ये म्हटल्याप्रमाणे ‘स्टेशन मास्टर शरीफ याला सीबीआय ने पकडले’ या किवर्ड च्या माध्यमातून आम्ही शोध घेतला. मात्र तसे कोणतेही मीडिया रिपोर्ट्स उपलब्ध झाले नाहीत.
दरम्यान आम्ही व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स काढून शोध घेऊन त्याचा मूळ स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला krudplug.net वर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी अपलोड केलेली व्हायरल व्हिडिओची एक आवृत्ती सापडली.’दरम्यान आम्ही व्हायरल व्हिडीओच्या की फ्रेम्स काढून शोध घेऊन त्याचा मूळ स्रोत शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला krudplug.net वर ३ नोव्हेंबर २०२२ रोजी अपलोड केलेली व्हायरल व्हिडिओची एक आवृत्ती सापडली.
“एका कार्टेल ने एक व्यक्तीस नग्न करून त्याचे हात बांधून लाकडी वस्तूने त्यास मारहाण केली.” अशा कॅप्शनखाली आम्हाला हा व्हिडीओ आढळला. या व्हिडीओचे की फ्रेम्स काढून शिधले असता, आम्हाला reddit वर ३० ऑक्टोबर २०२१ रोजी हाच व्हिडीओ अपलोड करण्यात आल्याचे पाहण्यात आले. “Thief beaten with paddle for stealing from cartel. I don’t know what organization the torturers or the handcuffed man belong to.” अशी कॅप्शन आम्हाला पाहायला मिळाली.
व्हायरल व्हिडीओ यापूर्वीही अपलोड झालेला आहे हे दर्शविणारे काही पुरावे येथे आणि येथे पाहता येतील.
यावरून व्हायरल व्हिडीओ जुना असून इंटरनेटवर दोन वर्षांपासून उपलब्ध असल्याचे पाहायला मिळाले. बालासोर येथे झालेली रेल्वे अपघाताची घटना २ जून २०२३ रोजीची असून या व्हायरल व्हिडिओचा या घटनेशी संबंधित कोणत्याही घटनेशी संबंध नसल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान व्हायरल व्हिडीओचा नेमका संबंध कोणत्या घटनेशी आहे, हे आम्ही स्वतंत्रपणे शोधू शकलो नाही.
बालासोर रेल्वे अपघाताशी कोणत्याही स्टेशन मास्टर शरीफ चा संबंध नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. दरम्यान जुना व्हिडीओ शेयर करून खोटा दावा केला जात आहे. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Video uploaded by krudplug.net on November 3, 2022
Video uploaded on Reddit on October 30, 2021
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in