Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांत सिंगची हत्या झाली होती असा धक्कादायक खुलासा विधानपरिषदेत केला असल्याचा दावा एका सोशल मीडिया पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सुशांतसिंग राजपुतच्या मृत्यू प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत सांगितले की सुशांत सिंगची हत्या झाली होती.
फेसबुकवर व्हायरल होत असलेल्या या दाव्याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही तपासणी सुरू केली. सर्व प्रथम आम्ही व्हायरल दाव्याशी संबंधित काही कीवर्डच्या मदतीने Google वर शोध घेतला असता आम्हाला झी न्यूजची 27 डिसेंबर 2020 रोजीची बातमी आढळली यात म्हटले आहे की, अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी महाराष्ट्रातील गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदे दरम्यान सीबीआयला विनंती केली की सुशांतसिंग राजपूत यांची हत्या झाली की आत्महत्या केली की नाही हे लवकरच उघड करावे.
अनिल देशमुख म्हणाले की सुशांतसिंग राजपूत प्रकरणाच्या चौकशी अहवालाचा निष्कर्ष लवकरात लवकर जाहीर करावा. ते म्हणाले, “तपास सुरू होऊन 5 महिन्यांहून अधिक जास्त दिवस झाले आहेत, पण अभिनेता सुशांतसिंग राजपूतची हत्या झाली की की त्याने आत्महत्या केली हे सीबीआयने याचा तपास सीबीआयने अजून तरी लावलेला नाही.
यानंतर आम्ही गूगलमध्ये अनिल देशमुख यांनी सुशांतसिंग राजपूतविषयी नुकतेच एखादे वक्तव् केले आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला या शोधादरम्यान आम्हाला Abp Live या वेबसाईटवर एक बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्कॉर्पिओ कारची आता एनआयए (राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा) चौकशी करणार आहे. यापूर्वी एटीएसने (अँटी टेररिझम स्कॉड) या प्रकरणाची चौकशी केली होती. एनआयएच्या तपासावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका केली आहे. त्यांनी अभिनेता सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणाचा संदर्भ दिला. देशमुख म्हणाले की यापूर्वी सीबीआयने सुशांत सिंग प्रकरण मुंबई पोलिसांकडून हाती घेतले पण सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली हे सीबीआय अद्याप सांगू शकलेेले नाही.
याशिवाय India TV च्या वेबसाईटवर सुशांत प्रकरणी अनिल देशमुख यांनी केलेले वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे. सुशांतसिंग राजपूतची ही हत्या झाली असल्याचा उल्लेख देखील यात त्यांनी केलेला नाही. एंटिलिया स्फोटक कार विषयी बोलताना त्यांनी सांगितले की हा तपास करण्यास मुंबई पोलिस आणि एटीएस सक्षम आहेत. मात्र केंद्राने घाईघाईने हे प्रकरण एनआयए कडे सोपवले. सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या बाबतीत देखील हेच झाले. मुंबई पोलिस त्या प्रकरणाचा देखील सक्षमपणे तपास करत होते पण हा तपास सीबीआयकडे सोपविला मात्र आठ महिन्यांचा काळ उलटूनही सीबीआय सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली हे उघड करु शकलेले नाही.
यानंतर आम्ही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ट्विटर हँडलला आणि फेसबुक अकाउंटला देखील भेट दिली, पण इथे आम्हाला त्यांनी सुशांत सिंग राजपूतची हत्या झाल्याची पोस्ट शेअर केल्याचे किंवा ट्विट केल्याचे आढळून आले नाही.
याशिवाय आम्हाला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांतसिंग राजपूतची हत्या झाल्याचा उल्लेख केल्याचा किंवा माहिती दिल्याची बातमी आढळून आली नाही.
आमच्या पडताळणीतून हे स्पष्ट झाले की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुशांतसिंग राजपूतची हत्या झाल्याचा दावा केलेला नाही. माध्यमांशी बोलताना त्यांनी निदर्शनास आणून दिले होते की सुशांतसिंग राजपूतची हत्या झाली आहे की त्याने आत्महत्या केली हे सीबीआयने अजून उघड केलेले नाही.
Zee News- https://zeenews.india.com/hindi/entertainment/bollywood/anil-deshmukh-cbi-not-revealed-if-actor-sushant-singh-rajput-was-murdered-or-he-died-by-suicide/816108
Abp Live- https://www.abplive.com/news/india/antilia-case-nia-will-probe-case-maharashtra-home-minister-anil-deshmukh-reaction-on-it-1807035
India TV- https://www.indiatv.in/maharashtra/anil-deshmukh-on-mukesh-ambani-house-bomb-scare-case-investigation-handed-over-to-nia-776948
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Vasudha Beri
May 27, 2024
Saurabh Pandey
January 9, 2024
Prasad S Prabhu
June 23, 2023