Friday, March 29, 2024
Friday, March 29, 2024

HomeFact Checkपेट्रोल पंपावर मोटारसायकलला आग लागल्याचा व्हिडिओ पुण्यातील आहे?

पेट्रोल पंपावर मोटारसायकलला आग लागल्याचा व्हिडिओ पुण्यातील आहे?

Authors

सोशल मीडियात एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. यात एक मोटारसायकलस्वार पेट्रोल पंपावर मोबाईलवर बोलत थांबला असताना अचानक मोटारसायकलच्या टाकीला आग लागते. तो आग फुंकून विझवण्याचा प्रयत्न करतो पण आग भडकते आणि तो मोटारसायकलस्वार दावा करण्यात येत आहे की हा व्हिडिओ पुण्यातील पेट्रोलपंपारवरील आहे.

याबाबत अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत या पोस्टमध्ये म्हटले आहे की,आजची घटना पुणे येथे झालेली पेट्रोल भरताना फोनवर बोलणे टाळा.

Fact Check/Verification

पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबलेल्या युवकाच्या मोटारसायकलला मोबाईलल वर बोलत असताना अचानक आग लगाल्याचा व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पोस्टमध्ये हा व्हिडिओ पुण्यातील असल्याचा दावा करण्यात आला असल्याने आम्ही काही किवर्डसच्या मदतीने शोध घेतला मात्र हा या संदर्भात एक बातमी आढळून आली नाही.

यानंतर आम्ही पुण्यातील स्थानिक वर्तमानपत्रांच्या पत्रकारांना तसेच काही पेट्रोल पंप चालकांना या व्हिडिओबाबत विचारणा केली असता सगळ्यांनीच हा प्रकार पुण्यात घडला नसल्याचे म्हटले आहे.

यानंतर आम्ही व्हायरल व्हिडिओतील काही किफ्रेम्स काढून गूगल रिवर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला
Fun Chai या युट्यूब चॅनलवर व्हायरल व्हिडिओ आढळून आला.

https://www.youtube.com/watch?v=Y4LyQp8MIac

पण हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची माहिती देण्यात आली नसल्याने आम्ही पुढे शोध सुरुच ठेवला असता आम्हाल इंस्टाग्रामवरील एक पोस्टमध्ये आढळून आला. ही पोस्ट तीन महिन्यांपुर्वीची आहे. मोबाईल फोन रामहोर्मोज गॅस स्टेशनला आगीचे कारण असे म्हटले आहे. त्यामुळे हा व्हिडिओ जुना असल्याचे आढळून आले.

याबाबत अधिक शोध घेतला असता one take pakistan नावाच्या वेबसाईटवर 12 जुलै 2021 रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आल्याचे आढळून आले.

Conclusion

आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की, सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडिओ पुण्यातील नाही. तसेच तीन महिन्यांपुर्वी हा व्हिडिओ पाकिस्तानमधील असल्याच्या दाव्याने व्हायरल झाला होता पण याची अधिकृत माहिती मिळालेली नाही.

Result: Misleading

Our Sources

one take pakistan


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular