Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक बिल गेट्स महाकुंभाला उपस्थित होते.
Fact
व्हायरल दावा खोटा आहे.
मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि अब्जाधीश बिल गेट्स यांनी महाकुंभात भाग घेतल्याचा दावा करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
तथापि, आमच्या तपासात आम्हाला आढळले की हा व्हिडिओ महाकुंभाचा नसून बनारसमधील मणिकर्णिका घाटाचा आहे. याशिवाय, अलिकडच्या काळात बिल गेट्सच्या बनारस भेटीचा कोणताही पुरावा नाही.
व्हायरल झालेला व्हिडिओ २० सेकंदांचा आहे, ज्यामध्ये परदेशी पर्यटकांचा एक गट बाल्कनीत उभा राहून खाली जळत्या मृतदेहांकडे पाहत असल्याचे दिसून येते. दरम्यान, व्हिडिओच्या पार्श्वभूमीत असलेल्या ऑडिओमध्ये, एका व्यक्तीची ओळख बिल गेट्स म्हणून केली जात आहे, ज्याने सनग्लासेस, शर्ट आणि पॅन्ट घातले आहे.
व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर, एक माणूस असे म्हणत असल्याचे ऐकू येते की, “आता मी तुम्हाला काहीतरी दाखवत आहे, कृपया तो कोण आहे ते ओळखा. तो बिल गेट्स आहे.” तो इथे काशी विश्वनाथला आला आहे”.
हा व्हिडिओ X वर इंग्रजी आणि मराठी कॅप्शनसह शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये तो महाकुंभमेळ्याचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सचा रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर आम्हाला हा व्हिडिओ २४ डिसेंबर २०२४ रोजी Gullack नावाच्या युट्यूब अकाउंटने अपलोड केलेला आढळला. या व्हिडिओचे शीर्षक इंग्रजीत होते, ज्याचे मराठीत भाषांतर “बिल गेस्टसारखा दिसणारा माणूस” असे आहे.
बिल गेट्स असल्याचा दावा केला जात असलेल्या व्यक्तीच्या मागे कोणताही सुरक्षा कर्मचारी दिसत नसल्याने आम्हाला संशय आला. कारण, बिल गेट्स भारतातील गर्दीच्या ठिकाणी कोणत्याही सुरक्षेशिवाय जातील असे सहसा घडत नाही.
तपास केल्यावर असे आढळून आले की व्हिडिओमध्ये दिसणारा परिसर बनारसमधील मणिकर्णिका घाटाचा आहे.
आम्हाला Gullack यूट्यूब अकाउंटवर व्हायरल व्हिडिओशी संबंधित आणखी एक व्हिडिओ सापडला. वेगळ्या अँगल मधून घेतलेल्या या व्हिडिओमध्ये ती व्यक्ती देखील दिसू शकते, ज्याला बिल गेट्स असल्याचे म्हटले जात आहे. तथापि, व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर, त्या व्यक्तीला विनोदाने बनावट बिल गेट्स म्हटले जात आहे.
आमचा तपास पुढे नेत, आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की बिल गेट्स यांनी अलीकडेच बनारस किंवा प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभाला भेट दिली होती का? या काळात आम्हाला कोणताही विश्वासार्ह वृत्तांत सापडला नाही.
बिल गेट्सच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिलेल्या माहितीनुसार, ते गेल्या वर्षी मार्चमध्ये भारताला भेट देऊन गेले होते. यानंतर, त्यांच्या भारत भेटीबद्दल कोणतीही माहिती माध्यमांमध्ये उपलब्ध नाही.
तपासादरम्यान, आम्ही बिल गेट्स यांच्या नेतृत्वाखालील गेट्स फाउंडेशनशी संपर्क साधला. त्यांनी व्हायरल दाव्याचे खंडन केले आणि म्हटले की व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती बिल गेट्स नाही आणि त्यांनी अलीकडे प्रयागराज किंवा बनारसला भेट दिलेली नाही.
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की बिल गेट्सचा महाकुंभात सहभाग असल्याचा दावा खोटा आहे.
Our Sources
Videos Available on Gullack Youtube account
Response from Gates Foundation
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी रुंजय कुमार यांनी केले असून येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad Prabhu
February 12, 2025
Prasad Prabhu
February 8, 2025
Prasad Prabhu
February 4, 2025