Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
भाजपच्या जाहिरातीत महाराष्ट्रातील मतदारांना गुजरातच्या प्रगतीसाठी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन.
Fact
महाराष्ट्राच्या या ठिकाणी गुजरात असे लिहून हा दिशाभूल करणारा दावा केला जात आहे.
महाराष्ट्र विधानसभेसासाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यासाठी सर्वच पक्षांच्या जाहिराती झळकू लागल्या आहेत. अशातच भाजपच्या जाहिरातीत मतदारांना गुजरातच्या प्रगतीसाठी महायुतीला मतदान करा, असे लिहिण्यात आल्याचा दावा व्हायरल झाला आहे.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
महायुतीमध्ये भाजप हा मोठा पक्ष आहे. याचबरोबरीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश आहे.
व्हायरल दाव्यात दाखविण्यात आलेली जाहिरात भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्रची आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक सुरु असताना गुजरातच्या प्रगतीचा उल्लेख आढळल्याने आश्चर्य निर्माण होत आहे. यासाठी न्यूजचेकर मराठीने या दाव्याचा तपास करण्याचा निर्णय घेतला.
प्राथमिक तपासात व्हायरल इमेज जवळून आणि काळजीपूर्वक पाहिल्यावर, हे स्पष्ट झाले की व्हायरल दावा करण्यासाठी “गुजरातची” हा शब्द पोस्टरवर मॉर्फ करण्यात आला आहे.

दरम्यान अधिक तपासासाठी आम्ही व्हायरल इमेजला रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला 3 नोव्हेंबर 2024 रोजी @BjpPravin1 नावाच्या X हँडलद्वारे अपलोड केलेली समान इमेज सापडली.

“भाजप-महायुती आहे तर गती आहे महाराष्ट्राची प्रगती आहे” असे त्या पोस्टमध्ये लिहिलेले आम्हाला आढळले. संबंधित पोस्ट करणाऱ्या व्यक्तीची माहिती शोधली असता त्याचे नाव प्रवीण भानुशाली असे असून मुंबई येथील भारतीय युवामोर्चाचे ते जनरल सेक्रेटरी असल्याचे समजले.
मूळ जाहिरात बॅनरवर महाराष्ट्राची या ठिकाणी गुजरातची असे करण्यात आले असल्याचे तुलनात्मक परीक्षणात आमच्या निदर्शनास आले. ते खाली पाहता येईल.


भाजप नेते “भाजप-महायुती आहे तर गती आहे महाराष्ट्राची प्रगती आहे” हेच स्लोगन यावेळच्या निवडणुकीसाठी वापरत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या Instagram खात्यावरून हेच स्लोगन 6 नोव्हेंबर 2024 रोजी आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आपल्या फेसबुक रिलमध्ये शेयर केले असल्याचे आमच्या निदर्शनास आले.


अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात भाजपच्या जाहिरातीचा बॅनर एडिट करून महाराष्ट्राची असलेल्या ठिकाणी गुजरातची असा उल्लेख करीत दिशाभूल करणारा दावा करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले.
Our Sources
Self Analysis
X post made by Pravin Bhanushali on November 3, 2024
Instagram post made by BJP Leader Devendra Fadnavis on November 6, 2024
Facebook reel shared by BJP Leader Chandrashekhar Bavankule
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
December 6, 2024
Prasad S Prabhu
November 30, 2024
Prasad S Prabhu
November 29, 2024