Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckFact Check: पंजाबमध्ये भाजपचे झेंडे जाळले जाताहेत असे सांगत व्हायरल व्हिडीओ जुना...

Fact Check: पंजाबमध्ये भाजपचे झेंडे जाळले जाताहेत असे सांगत व्हायरल व्हिडीओ जुना आणि हरियाणाचा आहे

Authors

Shaminder started off his career as a freelance journalist for a consulting and research firm. He has been a Political Strategist and Media Manager. Before joining Newschecker, he worked with various reputed media agencies like Daily Post India, PTC News.

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
पंजाबमध्ये वाहने अडवून भाजपचे झेंडे जाळण्यात येत आहेत.

Fact
व्हायरल व्हिडीओ 2021 मधील असून पंजाबचा नाही तर हरियाणाचा आहे.

पंजाबमध्ये भाजपचे झेंडे जाळले जाताहेत असे सांगत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Fact Check: पंजाबमध्ये भाजपचे झेंडे जाळले जाताहेत असे सांगत व्हायरल व्हिडीओ जुना आणि हरियाणाचा आहे
Courtesy: Facebook/ Chhaya Thorat

पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.

“भाजपा विरोधात पंजाबमध्ये लोक रस्त्यावर उतरलेत.. गाडया तपासल्या जात आहेत.. एका गाडीत भाजपाचे झेंडे मिळालेत.. हे झेंडे जमा करून जाळले गेलेत.. देशात #नवी_स्वातंत्र्य_चळवळ सुरु झाली आहे…याची सुरुवात” असे सांगत हा दावा व्हायरल केला जात आहे.

Fact Check/ Verification

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. प्रत्येक पक्षाने प्रचारात आघाडी घेतली आहे. पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सोशल मीडियावर फोटो, व्हिडिओ आणि संदेश शेअर करत आहेत. मात्र, यादरम्यान अनेक दिशाभूल करणारे फोटो आणि व्हिडिओही शेअर केले जात आहेत. याआधीही अनेक फेक स्टेटमेंट, मेसेज, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या दाव्याची आम्ही चौकशी सुरू केली. आम्ही प्रथम या व्हिडिओच्या INVID टूलद्वारे काही कीफ्रेम काढल्या. यानंतर, आम्ही Google रिव्हर्स इमेज सर्चच्या मदतीने शोधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आम्हाला या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ सापडले आहेत.

आम्हाला 12 ऑक्टोबर 2021 रोजी फेसबुक युजर मोहित गुप्ता यांनी शेअर केलेला व्हिडिओ सापडला. मोहित गुप्ता यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले, “किसानों का रोष, By-election से पहले भाजपा के झंडो में लगाई आग (ऐलनाबाद हरयाणा)…” याचा मराठी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे. “शेतकऱ्यांचा संताप, पोटनिवडणुकीपूर्वी (एलेनाबाद, हरियाणा) भाजपचे झेंडे पेटवले.”

पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.

व्हायरल व्हिडिओबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्ही आमचा तपास सुरू ठेवला. आम्ही काही कीवर्ड वापरून Google वर शोधले. आम्हाला Youtube खाते Khas Haryana द्वारे 7 ऑक्टोबर 2021 रोजी अपलोड केलेला व्हिडीओ रिपोर्ट प्राप्त झाला. 2021 च्या एलेनाबाद पोटनिवडणुकीत शेतकऱ्यांनी भाजपचे झेंडे जाळले होते. असे हा रिपोर्ट सांगतो.

Fact Check: पंजाबमध्ये भाजपचे झेंडे जाळले जाताहेत असे सांगत व्हायरल व्हिडीओ जुना आणि हरियाणाचा आहे
Courtesy: Youtube@KhasHaryana

पोस्टचे संग्रहण येथे पाहता येईल.

Conclusion

आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, पंजाबमध्ये वाहने अडवून भाजपचे झेंडे जाळण्यात येत आहेत हा दावा चुकीचे संदर्भ देऊन करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडीओ 2021 मधील असून पंजाबचा नाही तर हरियाणाचा आहे. 2021 मध्ये हरियाणाच्या एलनाबाद येथे झालेल्या पोटनिवडणुकीवेळी शेतकऱ्यांनी भाजपचे झेंडे पेटवले होते.

Result: Missing Context

Our Sources
Media report published by Khas Haryana on October 7, 2021
Facebook video uploaded by Mohit Gupta on October 7, 2021

(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर पंजाबीसाठी शमिंदर सिंग यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular