Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
व्हायरल पोस्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की ब्राझिलची हेअरस्टायलिस्ट लॅरिसा नेरी हिने राहुल गांधींची थट्टा केली आणि त्यांना “अपयशी राजकारणी” म्हटले. हा दावा तिच्या त्या व्हिडिओच्या कथित अनुवादावर आधारित आहे, ज्यात ती हरियाणामध्ये मतदार फसवणुकीसाठी आपला फोटो वापरल्याबद्दल प्रतिक्रिया देताना दिसते.
सोशल मीडियावर फिरणारा हा इंग्रजी “अनुवाद” पूर्णपणे खोटा आहे. लॅरिसा नेरी हिने तिच्या मूळ पोर्तुगीज व्हिडिओमध्ये राहुल गांधी किंवा भारतीय राजकारणाचा कुठेही उल्लेख केलेला नाही.
ब्राझिलच्या हेअरस्टायलिस्ट लॅरिसा नेरी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओसोबत युजर्स असा दावा करत आहेत की, तिने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची थट्टा केली आणि त्यांना “अपयशी राजकारणी” म्हटले. ५ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत हरियाणामधील मतदार फसवणुकीच्या प्रकरणात एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरला गेला असल्याचा आरोप करताना लॅरिसा नेरीचा फोटो दाखवला होता. त्यानंतरच हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला.

“भारतामध्ये एक अपयशी राजकारणी आहे ज्याने जवळजवळ 100 निवडणुका हरल्या आहेत. तो माझे जुने फोटो वापरून सत्ताधारी पक्षाविरोधात खोटं आणि प्रचार पसरवत आहे. त्याच्या पक्षाचे सदस्य माझ्यावर इतके वेडे झाले आहेत की ते मला डीएममध्ये लग्नाची मागणी करत आहेत. छे!” असा या व्हायरल व्हिडिओचा कथित अनुवाद सोशल मीडियावर शेअर केला गेला.
तथापि, बारकाईने पाहिल्यावर न्यूजचेकरला आढळले की हा दावा पूर्णपणे बनावट आणि चुकीचा अनुवाद आहे. लॅरिसा नेरीने आपल्या मूळ पोर्तुगीज व्हिडिओमध्ये फक्त एवढंच स्पष्ट केलं होतं की तिचा जुना फोटो भारतात चुकीच्या पद्धतीने वापरला गेला आहे आणि तिला भारतीय मतदार म्हणून दाखवलं जात असल्याने ती आश्चर्यचकित आहे. तिने राहुल गांधी किंवा कोणत्याही भारतीय राजकीय पक्षाचा उल्लेख केलेला नाही.
न्यूजचेकरने सर्वप्रथम “Larissa Nery Rahul Gandhi” या कीवर्ड्ससह शोध घेतला, ज्यातून आम्हाला 6 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकाशित झालेला NDTV चा एक रिपोर्ट सापडला.
त्या व्हिडिओमध्ये ती महिला म्हणताना दिसते, “लोकांनो, ते माझा एक जुना फोटो वापरत आहेत. तो खूप जुना फोटो आहे, ठीक आहे? मी त्या वेळी सुमारे 18 किंवा 20 वर्षांची होते. मला माहीत नाही हे निवडणुकीसाठी आहे का किंवा मतदानाशी संबंधित काही आहे का… आणि भारतात! अहा! त्यांनी मला भारतीय म्हणून दाखवले आहे लोकांना फसवण्यासाठी, लोकांनो. हे काय वेडेपण आहे! आपण कोणत्या जगात राहतो?” ती पुढे म्हणते की, तिचा फोटो व्हायरल झाल्यानंतर माध्यमांनी तिच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. “एक रिपोर्टरने मला कॉल केला, या सगळ्या गोष्टीबद्दल विचारण्यासाठी, सलूनबद्दल, माझ्या नोकरीबद्दल, मुलाखतीसाठी बोलायचं आहे असं सांगितलं, पण मी उत्तर दिलं नाही. त्या व्यक्तीने मला इंस्टाग्रामवर शोधलं आणि तेथे कॉल केला. आता, आणखी एक व्यक्ती, ज्याचा या गोष्टीशी काही संबंध नाही, माझ्या शहरातील मित्राने मला एक फोटो पाठवला. तुम्ही विश्वास ठेवणार नाही… अरे देवा,” ती पोर्तुगीज भाषेत म्हणते.
The Print ने 6 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, नेरीने आपल्या सुमारे 5,400 इंस्टाग्राम फॉलोअर्ससाठी एक स्टोरी पोस्ट केली, ज्यात ती म्हणाली की तिचा फोटो भारतातील मतदानासाठी वापरला जात असल्याने ती धक्कादायक अवस्थेत आहे. “‘त्यांनी माझा फोटो असा वापरला आहे जणू मी भारतीय आहे आणि मतदारांना फसवण्यासाठी तो वापरला आहे. तुम्ही विश्वास ठेवू शकता का? आपण कोणत्या वेडेपणाच्या काळात जगतो आहोत?’ नेरीने पोर्तुगीजमध्ये म्हटले. या वादाबद्दल तिने नंतर अनेक व्हिडिओ क्लिप्स पोस्ट केल्या. एका दुसऱ्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये तिने राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेतून एक क्लिप शेअर केली आणि त्यावर पोर्तुगीज कॅप्शन लिहिले होते: “लोकांनो, किती वेडेपण आहे — मी भारतात ‘गूढ ब्राझिलियन मॉडेल’ म्हणून प्रसिद्ध झाले आहे.” असे त्या रिपोर्टमध्ये नमूद केले आहे आणि त्यात व्हायरल व्हिडिओचा एक स्क्रीनग्रॅब देखील दिला आहे.

The News Minute आणि Hindustan Times मध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यांनुसार (येथे आणि येथे पाहता येतील) लॅरिसा नेरी यांनी स्पष्ट सांगितले की, त्यांचा भारतीय राजकारणाशी काहीही संबंध नाही, आणि त्यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेक भारतीय पत्रकारांनी त्यांच्याशी मुलाखतीसाठी संपर्क साधला.
तसेच आम्हाला India Today मध्ये प्रकाशित झालेला आणखी एक रिपोर्टही मिळाला. त्यानुसार, लॅरिसा नेरी यांनी आणखी एका व्हिडिओमध्ये सांगितले की, त्यांचा फोटो राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेनंतर व्हायरल झाल्यानंतर, त्यांचा इन्स्टाग्राम भारतीय फॉलोअर्सच्या कमेंट्सने भरून गेला. त्या म्हणाल्या, “Welcome, my Indian followers, to my Instagram! असं दिसतंय की आता माझे खूप भारतीय फॉलोअर्स झाले आहेत. लोक माझ्या फोटोंवर अशा प्रकारे कमेंट करत होते जणू मी निवडून आले आहे! पण स्पष्ट सांगायचं झालं तर, ती मी नाही — तो फक्त माझा फोटो होता.” त्या पुढे म्हणाल्या, “भारतीय लोकांनी दाखवलेली आपुलकी आणि दयाळूपण मी मनापासून कौतुक करते. अनेकांनी माझ्या स्टोरीज पाहिल्या, त्या भारतीय मीडियासोबत शेअर केल्या आणि त्यांचा अनुवाद केला. मला तुमची भाषा कळत नाही, पण मी त्याबद्दल खरंच आभारी आहे.”
Newschecker ने ५८ सेकंदांचा व्हायरल व्हिडिओ Turboscribe या ट्रान्सक्रायबिंग टूलच्या मदतीने तपासला आणि त्यातील पोर्तुगीज भाषेतील मजकूर अनुवादित केला. त्या अनुवादानुसार लॅरिसा नेरी म्हणाल्या: “लोकांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते… माझा जुना फोटो ते वापरत आहेत. माझा फोटो खूप जुना आहे, नाही का? मी त्या फोटोमध्ये १८-२० वर्षांची असेन. ते माझा फोटो वापरत आहेत काहीतरी मतदानासंबंधी गोष्टीसाठी… भारतात! मला भारतीय महिला दाखवत आहेत लोकांना फसवण्यासाठी. हे किती वेड्यासारखं आहे! कुठल्या जगात मी राहते आहे? मग एक रिपोर्टर मला कॉल केला, या गोष्टीबद्दल विचारण्यासाठी. त्याने मी ज्या सॅलॉनमध्ये काम करते तिथे फोन केला मुलाखतीसाठी. मी उत्तर दिलं नाही आणि माझ्या वडिलांना सांगितलं की माझा नंबर देऊ नका. नंतर त्या व्यक्तीने माझा इन्स्टाग्राम शोधला आणि तिथून संपर्क केला. आता दुसऱ्या शहरातील माझ्या एका मैत्रिणीने मला तो फोटो पाठवला…”
यानंतर हा ऑडिओ Happy Scribe या दुसऱ्या अनुवादक टूलमधूनही चालवण्यात आला. त्यातही अगदी हाच आशय मिळाला: “Guys, I’m going to tell you some gossip, you’re going to laugh so hard. No, I’m going to tell you the gossip. Guys, they’re using an old photo of me. My photo is old, okay? Look, I was very young in the photo, I must have been about 20 or 18 years old. They’re using a photo of me to do, I don’t know if it’s for an election, something about voting, that you have to vote. And… in India! They’re putting me up as an Indian woman to scam people, guys. Look at this madness! What kind of craziness is this? What world am I living in? Then a reporter called me, wanting to know about this thing. He called the salon where I work, wanting to talk to me for an interview. So I didn’t answer. I told Tatá not to give out my number and stuff. Then the guy found my Instagram, contacted me on Instagram. Now another person who has nothing to do with the matter, a friend of mine from another city, sends me a photo.” ती सांगते की तिचा जुना फोटो भारतात निवडणुकीच्या संदर्भात वापरला जात आहे आणि ती यामुळे अचंबित आहे.
दोन्ही प्रमाणित अनुवाद आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तांमध्ये पूर्णपणे एकसारखी माहिती आढळली. कोठेही लॅरिसा नेरी यांनी भारतीय राजकारण्यांचा उल्लेख केलेला नाही किंवा त्यांची खिल्ली उडवलेली नाही. त्यामुळे हे स्पष्ट होते की, व्हायरल व्हिडिओमधील “राहुल गांधींची खिल्ली उडवली” असा दावा पूर्णपणे बनावट अनुवादावर आधारित आहे.
ब्राझिलियन मॉडेल लॅरिसा नेरी यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली, असा दावा करणारा व्हिडिओ चुकीचा अनुवाद आहे. त्यांच्या मूळ व्हिडिओमध्ये त्या फक्त एवढंच स्पष्ट करतात की, त्यांचा एक जुना फोटो भारताच्या निवडणूक संदर्भात चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आला आहे. त्या क्लिपमध्ये कोणत्याही भारतीय राजकीय नेत्याचा उल्लेख किंवा उपहास नाही.
लॅरिसा नेरी कोण आहेत?
लॅरिसा नेरी या ब्राझीलमधील मिनास गेरैस (Minas Gerais) प्रांतातील हेअरड्रेसिंग व्यावसायिक आणि मॉडेल आहेत.
त्यांचा एक जुना फोटो भारतात व्हायरल झाला, जेव्हा राहुल गांधी यांनी मतदार फसवणुकीच्या आरोपांबाबतच्या पत्रकार परिषदेत तो दाखवला होता.
लॅरिसा नेरी यांनी राहुल गांधींबद्दल काही वक्तव्य केले का?
नाही. प्रमाणित अनुवादानुसार त्यांनी राहुल गांधींचा उल्लेख किंवा त्यांची खिल्ली उडवलेली नाही. व्हायरल दावा पूर्णपणे बनावट आणि चुकीचा अनुवाद आहे.
लॅरिसा नेरी यांनी त्यांच्या स्पष्टीकरणाच्या व्हिडिओमध्ये काय म्हटलं?
त्या म्हणाल्या की, त्यांचा तरुणपणी घेतलेला फोटो भारतात चुकीच्या पद्धतीने वापरला जात आहे, आणि त्यांना भारतीय मतदार म्हणून दाखवण्यात आलं हे पाहून धक्का बसला.
Sources
NDTV report, November 6, 2025
The Print report, November 6, 2025
The NewsMinute report, November 6, 2025
Hindustan Times report, November 6, 2025
India Today report, November 6, 2025
Turboscribe & Happy Scribe verified transcripts, November 2025
JP Tripathi
November 25, 2025
Salman
November 18, 2025
Runjay Kumar
November 17, 2025