Thursday, April 24, 2025
मराठी

Fact Check

Fact Check: सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी जनतेला सरकारविरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले नाही, बनावट पोस्ट झाली व्हायरल

Written By Saurabh Pandey, Translated By Prasad S Prabhu, Edited By Pankaj Menon
Aug 17, 2023
banner_image

Claim

भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. दावा आहे कि, त्यांनी जनतेला सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.

व्हायरल दावा

Fact

भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या नावाने शेअर करण्यात आलेल्या या दाव्याचा तपास इंग्रजी भाषेत न्यूजचेकरने केला आहे. आमच्या तपासणीनुसार, 14 ऑगस्ट 2023 रोजी सर्वोच्च न्यायालयाने हा दावा खोटा ठरवत एक प्रेस रिलीज जारी केले. त्यानुसार पुढील स्पष्टीकरण देण्यात आले आहे, “It has come to the notice of the Supreme Court of India that a social media post (invoking the public to protest against authorities) using a file photograph and falsely quoting the Chief Justice India is being circulated. The post is fake, ill-intended and mischievous. No such post has been issued by the Chief Justice of India nor has he authorised any such post. Appropriate action is being taken in this regard with the law enforcement authorities.” (मराठी अनुवाद: “सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे की एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली जात आहे ज्यात लोकांना अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्यास प्रवृत्त केले जात आहे, मुख्य न्यायाधीशांच्या छायाचित्राचा वापर करून त्यांच्या नावाने खोटे विधान केले आहे, ही पोस्ट बनावट आहे, दुर्भावनापूर्ण आणि खोडसाळपणाने भरलेली आहे. सरन्यायाधीशांनी असे कोणतेही पोस्ट जारी केलेले नाही किंवा त्यांनी इतर कोणालाही ते वापरण्याचा अधिकार दिलेला नाही. या संदर्भात योग्य ती कायदेशीर कारवाई केली जात आहे.”)

याव्यतिरिक्त, 14 ऑगस्ट 2023 रोजी इंडिया टुडेने प्रकाशित केलेल्या लेखानुसार, सर्वोच्च न्यायालयाचे महासचिव अतुल कुर्‍हेकर आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनीही हा दावा नाकारला आहे.

India Today ने प्रकाशित केलेल्या लेखातील एक उतारा

अशा प्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी जनतेला सरकारच्या विरोधात आंदोलन करण्याचे आवाहन करण्याच्या नावाखाली केलेला दावा खोटा आहे.

Result: False

Our Sources
Supreme Court of India press release, August 14, 2023
India Today report, August 14, 2023


(हे यापूर्वी आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजी आणि हिंदीसाठीही करण्यात आले आहे.)

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

image
जर तुम्हाला एखाद्या दाव्याची सत्यता तपासायची असेल, अभिप्राय द्यायचा असेल किंवा तक्रार नोंदवायची असेल, तर आम्हाला व्हॉट्सअॅप करा +91-9999499044 किंवा आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in​. आपण आमच्याशी संपर्क साधू शकता आणि फॉर्म भरू शकता.
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
Newchecker footer logo
About Us

Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check

Contact Us: checkthis@newschecker.in

17,898

Fact checks done

FOLLOW US
imageimageimageimageimageimageimage
cookie

आमची वेबसाइट कुकीज वापरते

आपली वेबसाइट कुकीज आणि समान तंत्रज्ञाने सामग्री वैयक्तिक करण्यास मदत करतात, विज्ञापन तयार करण्याची आणि मोजण्याची मदत करतात, आणि चांगला अनुभव प्रदान करतात. 'ठीक आहे' या निवडून किव्हा कुकी प्राधान्यात एक पर्याय चालू करून, आपण यावर सहमत आहात, जसं कि आमच्या कुकी धोरणात स्पष्टपणे सांगितले गेले आहे.