Fact Check
Weekly Wrap: महिलांना बसचे दुप्पट तिकीट, मोदींना प्लेटमध्ये बिर्याणी वाढली ते पाकिस्तानात जुने पाचशे रुपये पर्यंतच्या दाव्यांचे फॅक्ट चेक
सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या आठवड्यातही सोशल मीडियावर फेक बातम्यांचा पाऊस पडतच राहिला. परिवहनच्या नव्या नियमानुसार महिलांना बसचे दुप्पट तिकीट लागेल, असा दावा करण्यात आला. पाकिस्तानी मुले रद्द केलेल्या भारतीय नोटांचे गठ्ठे एका गाडीवर फिरवत आहेत, असा दावा करण्यात आला. पंतप्रधान मोदी मांसाहारी आहेत आणि त्यांना एका प्लेटमध्ये बिर्याणी वाढण्यात आली, असा दावा करण्यात आला. गटाराचे झाकण काढल्याबद्दल मुंबई पोलिसांनी बांगलादेशी शेख नजरुलला अटक केली, असा दावा करण्यात आला. २५ सप्टेंबर २०२५ रोजी राजस्थानातील बांसवाडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान लोकांची मोठी गर्दी, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

महिलांना बसचे दुप्पट तिकीट?
परिवहनच्या नव्या नियमानुसार महिलांना बसचे दुप्पट तिकीट लागेल, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.

भारतीय रुपये गाडीवर फिरवणाऱ्या मुलांचा हा व्हिडिओ पाकिस्तानचा नाही
पाकिस्तानी मुले रद्द केलेल्या भारतीय नोटांचे गठ्ठे एका गाडीवर फिरवत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

मोदींना प्लेटमध्ये बिर्याणी वाढली?
पंतप्रधान मोदी मांसाहारी आहेत आणि त्यांना एका प्लेटमध्ये बिर्याणी वाढण्यात आली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे उघड झाले.

मुंबई पोलिसांनी बांगलादेशी शेख नजरुलला अटक केली?
गटाराचे झाकण काढल्याबद्दल मुंबई पोलिसांनी बांगलादेशी शेख नजरुलला अटक केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

हा व्हिडीओ पंतप्रधान मोदींच्या रॅलीचा नाही
२५ सप्टेंबर २०२५ रोजी राजस्थानातील बांसवाडा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणादरम्यान लोकांची मोठी गर्दी, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.