Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeFact Checkमोदींनी काँग्रेसची स्तुती केली नाही,खोटा दावा करून व्हिडिओ होतोय व्हायरल

मोदींनी काँग्रेसची स्तुती केली नाही,खोटा दावा करून व्हिडिओ होतोय व्हायरल

खोटा दावा करून व्हिडिओ व्हायरल

(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी साठी सर्वप्रथम शुभम सिंग यांनी केले आहे.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.व्हिडीओमध्ये मोदी म्हणत आहेत की, ‘तोडा आणि राज्य करा,ही आमची परंपरा आहे,जोडा आणि विकास करा,ही काँग्रेसची परंपरा आहे.हा व्हिडिओ शेअर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच खरे बोलले असल्याचा दावा केला जात आहे.व्हिडीओ शेअर करत ट्विटरवर अनेक यूजर्सनी दावा केला की,पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच खरे बोलले आहेत.

Courtesy: Twitter@SA67211021

(आर्काइव लिंक)

अनेक फेसबुक युजर्सनीही ही पोस्ट शेयर केली आहे.
Courtesy: Facebook/salim.khileri.75

Fact Check/Verification

दाव्याची सत्यता तपासण्यासाठी,आम्ही इनव्हिड टूलच्या मदतीने व्हायरल व्हिडिओला काही कीफ्रेममध्ये रूपांतरित केले.यानंतर यांडेक्स रिव्हर्स कीफ्रेम शोध घेतला.आम्हाला 3 एप्रिल 2014 रोजी एएनआयने केलेले ट्विट सापडले.ट्विटमध्ये उपस्थित असलेल्या फोटोमध्ये,व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या नरेंद्र मोदींचे कपडे आणि पार्श्वभूमी सारखीच आहे.ट्विटच्या कॅप्शनमध्ये नरेंद्र मोदी म्हणाले की,”काँग्रेसची धर्मनिरपेक्षता म्हणजे फूट पाडा आणि राज्य करा.संघटित होणे आणि राष्ट्रासाठी कार्य करणे ही आमची विचारधारा आहे.”

आमच्या तपासणीदरम्यान,आम्हाला एप्रिल 2014 मध्ये इकॉनॉमिक टाइम्सने प्रकाशित केलेला रिपोर्ट सापडला.वृत्तानुसार,भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका सभेत बोलताना काँग्रेसवर जोरदार टीका केली.यावेळी ते म्हणाले की,काँग्रेसची धर्मनिरपेक्षता म्हणजे फूट पाडा आणि राज्य करा,तर आम्ही म्हणतो की संघटित होऊन देशासाठी काम करा.

तपासादरम्यान,आम्हाला 03 एप्रिल 2014 रोजी नरेंद्र मोदींच्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला व्हिडिओ सापडला.त्यात मोदी 13:08 सेकंदाला “तोडा आणि राज्य करा,ही काँग्रेसची परंपरा आहे,जोडा आणि विकास करा,ही आमची परंपरा आहे.”असेच बोलताना आढळून येतात.अशाप्रकारे नरेंद्र मोदींच्या आठ वर्षे जुन्या व्हिडिओशी छेडछाड झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Conclusion

अशाप्रकारे,नरेंद्र मोदींचा आठ वर्षे जुना व्हिडिओ संपादित करून खोटा दावा केला जात असल्याचे आमच्या तपासात सिद्ध झाले आहे.त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते.

Result: Altered Video

Our Sources

Tweet by ANI in April 2014

Report by The Economic Times in April 2014

Video by Narendra Modi Youtube Channel in April 2014

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्तीसाठी किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in

Most Popular