Authors
Claim
काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत कोअर ग्रुप ऐवजी चोर ग्रुप असे बॅनर लावले आहे.
Fact
हा दावा दिशाभूल करणारा असून जुन्या बैठकीचा फोटो एडिट करून व्हायरल करण्यात आला आहे.
‘चोर ग्रुप मीटिंग’ असे बॅनर असलेले काँग्रेसच्या सभेचे छायाचित्र व्हायरल होत आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल, माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि ए के अँटोनी हे छायाचित्रात दिसत आहेत. सोशल मीडिया युजर्स दावा करीत आहेत की कोअर ग्रुप असे लिहिण्याऐवजी चोर ग्रुप झाले. पण एकाही विद्वानाला ही घोडचूक लक्षात आली नाही.
“जे खरं आहे तेच लिहिलंय” असे सांगत ही पोस्ट करण्यात येत आहे. फेसबुकवरही अशा प्रकारच्या पोस्ट आम्हाला पाहायला मिळाल्या आहेत.
न्यूजचेकरला तथ्य तपासण्यासाठी आमच्या WhatsApp टिपलाइनवर (+91-9999499044) समान दावा प्राप्त झाला.
Fact Check/ Verification
हे चित्र एक व्यंग्यात्मक विनोदी चित्र आहे असे म्हणता येईल. तथापि, अशी काही परिस्थिती आहे जिथे अशी शंका येऊ शकते की वापरलेली प्रतिमा फोटोशॉप वापरून एडिट केली गेली आहे. तसेच त्यासोबत वापरलेल्या कॅप्शन दिशाभूल करणाऱ्या आहेत. म्हणूनच आम्ही त्याची सत्यता तपासणी करण्याचे ठरवले.
Google Keyword Search वापरून केलेल्या शोधात आम्हाला कळले की फेसबुकवर अशा अनेक पोस्ट फिरत आहेत. या प्रकारच्या शोधातून आम्ही मूळ प्रतिमांपर्यंत पोहोचलो.
अशा शोधामुळे हे समजण्यास मदत झाली की 2019 मध्ये झालेल्या CWC बैठकीच्या चित्रांना कृत्रिम मार्ग वापरून एडिट करीत ही प्रतिमा तयार केली गेली.
संपादनापूर्वीची ही खरी प्रतिमा आहे. झी टीव्ही आणि विऑन न्यूज यांसारख्या संकेतस्थळांनी ती प्रकाशित केलेली आहे. हे आमच्या लक्षात आले.
काँग्रेस बैठकीचा हा एकच फोटो नव्हे तर असेच समान फोटो एएनआयच्या ट्विटर हँडलवरही पाहायला मिळतात. त्यापैकी एकाही फोटोत व्हायरल फोटो प्रमाणे आक्षेपार्ह बॅनर वापरला गेल्याचे दिसत नाही.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात व्यंगात्मक दृष्टीने तयार करण्यात आलेली व्हायरल प्रतिमा जुन्या बैठकीची असून कृत्रिमरित्या चोर ग्रुप मीटिंग असे लिहिलेली असल्याचे आढळून आले. शिवाय दिलेली वर्णनेही दिशाभूल करणारी आहेत.
Result: Altered Photo/ Video
Our Sources
News published by Zee News on August 10, 2019
News published by WION on May 25, 2019
Tweet made by ANI on August 6, 2019
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in