Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
हा व्हिडिओ राहुल गांधी यांना ड्रग्ज प्रकरणात अटकेतून सुटल्यानंतर अमेरिकेतून परत आल्यावर, प्रियांका गांधी यांनी त्यांचे स्वागत केल्याचे दाखवतो.
हा दावा खोटा आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी कोणत्याही ‘ड्रग्ज संबंधित प्रकरणानंतर’ अमेरिकेतून परतताना दाखवलेले नाहीत. हा व्हिडिओ प्रत्यक्षात मे 1991 मधील आहे, जेव्हा त्यांचे वडिल आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर राहुल गांधी भारतात परतले होते.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये असा दावा केला जात आहे की काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अमेरिकेत ‘ड्रग्ज प्रकरणात’ अटकेतून सुटल्यानंतर ते भारतात परतताना दाखवले गेले आहे. दाव्यानुसार, तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्तक्षेपानंतर राहुल गांधी यांची सुटका करण्यात आली आणि त्यांना परत आणण्यासाठी अमिताभ बच्चन अमेरिकेला गेले होते. तसेच, व्हिडिओमध्ये प्रियांका गांधी विमानतळावर त्यांचे स्वागत करताना दिसतात.

कीवर्ड्स जसे की “Rahul Gandhi”, “drugs” आणि “US” यांच्या संयोजनासह सर्च केल्यानंतर, अशा प्रकारच्या कोणत्याही घटनेचा उल्लेख करणाऱ्या विश्वासार्ह बातम्या किंवा अधिकृत नोंदी आढळून आल्या नाहीत. यामुळे व्हायरल दाव्याबद्दल शंका निर्माण होते.
व्हायरल व्हिडिओतील कीफ्रेम्सचे रिव्हर्स इमेज सर्च घेतल्यावर तो Getty Images वरील एका लिस्टिंगकडे निर्देशित करतो, ज्यामध्ये कॅप्शन देण्यात आले आहे:
“Rajiv Gandhi funeral / New Delhi GVs; INDIA: New Delhi: EXT GVs City INT CMS Priyanka Gandhi seated talking to friends in airport terminal CMS Priyanka greeting brother Rahul Unknown Airport: INT SEQ Rahul and Priyanka Gandhi into room where their fathers coffin is lying in state…”
या क्लिपच्या संपूर्ण आवृत्तीत राजीव गांधी यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित दृश्ये स्पष्टपणे दिसतात.
Getty Images वरील आणखी एका व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये त्याच व्यक्ती एकसारख्या पोशाखात दिसतात, असे कॅप्शन आहे:
“Rajiv Gandhi funeral / New Delhi GVs; INDIA: INT SEQ Rahul and Priyanka Gandhi into room where their fathers coffin is lying in state MS Sonia Gandhi sits on floor with children.”
या वर्णनानुसार, हे दृश्य 24 मे 1991 रोजी तयार करण्यात आले होते.
TimesContent.com यांनी प्रकाशित केलेल्या एका छायाचित्रात, ज्यात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांना त्याच कपड्यांमध्ये दाखवले आहे, कॅप्शन आहे:
“Priyanka Gandhi receiving Rahul Gandhi at Delhi Airport who arrived from London after hearing the news of the assassination of Rajiv Gandhi, in New Delhi on May 24, 1991.”
याच घटनेतील आणखी एका व्हिडिओमध्ये (WildFilmsIndia द्वारा प्रकाशित) त्याच पोशाखात असलेले राहुल आणि प्रियांका गांधी दिसतात. या व्हिडिओमध्ये असेही सांगितले आहे की राजीव गांधी यांच्या हत्येनंतरच्या गोंधळात राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि अमिताभ बच्चन दिसतात. अत्यंत लहान वयातील राहुल आणि प्रियांका यांना त्वरीत सुरक्षित ठिकाणी नेले जाते. वरिष्ठ बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन संरक्षक आणि जवळजवळ पितृतुल्य भूमिकेत त्यांच्यासोबत कारपर्यंत जाताना दिसतात आणि स्वतः दुसऱ्या वाहनातून मागोमाग येण्याची खात्री देतात.

यापूर्वी देखील एका बनावट बातमी (क्लीपिंग) व्हायरल होऊन चुकीची माहिती पसरवली होती. ऑनलाइन टूल वापरून तयार करण्यात आलेल्या त्या फेक क्लीपिंगमध्ये असा दावा केला गेला होता की राहुल गांधींना 2001 मध्ये ड्रग्ज बाळगल्यामुळे बोस्टन विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. या दाव्याचे आमचे संपूर्ण फॅक्ट चेक तुम्ही येथे पाहू शकता.
व्हायरल व्हिडिओ राहुल गांधी यांना ड्रग्ज प्रकरणातून सुटल्यानंतर अमेरिकेतून परतताना दाखवत नाही. हा प्रत्यक्षात 1991 मधील संग्रहित व्हिडिओ आहे, जो राजीव गांधी यांच्या अंत्यसंस्काराच्या काळात आणि त्यांच्या परिवाराच्या भारतात परतण्याच्या वेळी चित्रित करण्यात आला होता.
हा व्हायरल व्हिडिओ राहुल गांधी अमेरिकेतल्या ड्रग्ज प्रकरणातून सुटल्यानंतर परतताना दाखवतो का?
नाही. हा दावा बनावट आहे.
हा व्हिडिओ प्रत्यक्षात कुठे चित्रित करण्यात आला होता?
हा व्हिडिओ अमेरिकेतला नसून, तो नवी दिल्लीतील राजीव गांधी यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी चित्रित करण्यात आला होता.
राहुल गांधींबद्दल यापूर्वीही अशा प्रकारची चुकीची माहिती पसरवली गेली आहे का?
होय. यापूर्वीही एक खोटे न्यूज क्लीपिंग व्हायरल झाले होते, ज्यात दावा करण्यात आला होता की राहुल गांधींना बोस्टन विमानतळावर ताब्यात घेण्यात आले होते. नंतर तो दावा खोटा ठरला.
Sources
Getty Images Website
TimesContent Website
YouTube Video By @WildFilmsIndia, Dated July 28, 2020
Prasad S Prabhu
November 29, 2025
JP Tripathi
November 25, 2025
Runjay Kumar
November 17, 2025