नवीन वर्षात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही अनेक फेक दावे व्हायरल झाले. एक फोटो शेयर करीत महाकुंभ मेळ्यात पकडलेल्या दहशतवादी अयुबचा आहे, असा दावा करण्यात आला. ‘महावाचन उत्सव’ च्या प्रशस्तिपत्रकात असंख्य चुका आहेत, असा दावा करण्यात आला. अमृतसर येथे वकील आणि स्थानिक लोकांनी आंबेडकरांचा पुतळा तोडणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली, असा दावा करण्यात आला. जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती असल्याने फिल्टर न करता येणारे पाणी गरम करून प्या असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्यांचे फॅक्ट चेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

हा फोटो महाकुंभात पकडल्या गेलेल्या दहशतवाद्याचा?
एक फोटो शेयर करीत महाकुंभ मेळ्यात पकडलेल्या दहशतवादी अयुबचा आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

हे ‘महावाचन उत्सव’ चे खरे प्रशस्तिपत्रक आहे?
‘महावाचन उत्सव’ च्या प्रशस्तिपत्रकात असंख्य चुका आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

हा व्हिडिओ आंबेडकरांचा पुतळा फोडणाऱ्याला झालेल्या मारहाणीचा नाही
अमृतसर येथे वकील आणि स्थानिक लोकांनी आंबेडकरांचा पुतळा तोडणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.

फिल्टर न करता येणारे पाणी गरम करून प्या असे आवाहन केलेले नाही
जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती असल्याने फिल्टर न करता येणारे पाणी गरम करून प्या असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा