Authors
Claim
इराणच्या एका न्यायालयाने पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला “अविवाहित महिलेला मिठी मारल्याबद्दल” व्यभिचार केल्याबद्दल 99 फटक्यांची शिक्षा सुनावली.
Fact
असा कोणताही आदेश कोणत्याही न्यायालयाने दिलेला नाही; इराणच्या दूतावासाने या दाव्याचे खंडन केले आहे.
अनेक सोशल मीडिया युजर्स असा दावा करत आहेत की इराणने पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला व्यभिचाराबद्दल 99 फटके मारण्याची शिक्षा दिली आहे. दाव्यांनुसार, फुटबॉलपटू त्याची चाहती, चित्रकार आणि दिव्यांग महिला फातिमा हमामी या महिलेसोबत हस्तांदोलन आणि आलिंगन देताना दिसल्यानंतर न्यायालयाने हा आदेश दिला आहे.
युजर्स या भेटीचा एक व्हिडिओ शेअर करीत आहेत, ज्यामध्ये हमामीने फुटबॉलपटू रोनाल्डोला त्याचे एक पोर्ट्रेट भेट देते त्यानंतर तिला तो Al-Nasr jersey भेट देतो. त्यानंतर तो तिच्याशी हस्तांदोलन करून आलिंगन देतो. तसेच छायाचित्रासाठी पोझ देतो.
ट्विटची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.
क्रिस्टियानो रोनाल्डो इराणमध्ये का होता?
38 वर्षीय फुटबॉलपटू गेल्या महिन्यात 19 सप्टेंबर रोजी पर्सेपोलिस विरुद्ध अल-नासरच्या आशियाई चॅम्पियन्स लीग सामन्यासाठी इराणमध्ये होता. सामन्यापूर्वी, त्याचे चाहत्यांनी स्वागत केले आणि भेटवस्तूंचा वर्षाव केला ज्यामध्ये हमामीच्या पेंटिंगचाही समावेश होता.
Fact check
Newschecker ने प्रथम “Cristiano Ronaldo 99 lashes” साठी कीवर्ड शोध लावला, ज्यामुळे आम्हाला अनेक बातम्यांचे रिपोर्ट मिळाले. ते येथे, येथे आणि येथे पाहता येतील. त्यातून अशी माहिती मिळाली की रोनाल्डोच्या वागण्यामुळे अनेक वकिलांमध्ये खळबळ उडाली असली तरी, इराण ने स्पष्टीकरण दिले होते. इराणच्या माद्रिदमधील दूतावासाने X वर सांगितले की रोनाल्डोला हमामीला मिठी मारल्याबद्दल 99 फटके मारण्याची शिक्षा देण्यात आली नाही आणि फुटबॉलपटूची कट्टर चाहता असलेल्या कलाकारासोबतची त्याची भेट देशातील प्रत्येकाने स्वीकारली.
“We strongly deny the issuance of any sentence against any international athlete in Iran. It is a matter of concern that the publication of such unfounded news could overshadow crimes against humanity and war crimes against the oppressed Palestinian nation. It should be noted that Cristiano Ronaldo travelled to Iran on September 18 and 19 to play in an official soccer match and was very well received by the people and the authorities. His sincere and humane meeting with Fatemeh Hamami was also praised and admired by both the people and the country’s sports authorities,” ज्याचा मराठी अर्थ “आम्ही इराणमध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय खेळाडूविरुद्ध कोणतीही शिक्षा देण्याबद्दलच्या वृत्ताचा ठामपणे इन्कार करतो. ही चिंतेची बाब आहे की अशा निराधार बातम्यांच्या प्रकाशनामुळे मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि अत्याचारित पॅलेस्टिनी राष्ट्राविरुद्ध युद्ध गुन्ह्यांच्या प्रकरणांवर सावली पडू शकते. हे नोंद घ्यावे की क्रिस्टियानो रोनाल्डोने 18 आणि 19 सप्टेंबर रोजी अधिकृत सॉकर सामना खेळण्यासाठी इराणला प्रवास केला होता. नागरिक आणि अधिकाऱ्यांनी त्याचे खूप चांगले स्वागत केले होते. फतेमेह हमामी यांच्याशी झालेल्या त्यांच्या प्रामाणिक आणि मानवी भेटीचे नागरिक आणि देशाच्या क्रीडा अधिकाऱ्यांनीही कौतुकच केले,” असे निवेदनात लिहिलेले आहे.
त्यानंतर आम्ही Factnameh या इराणमधील फेक माहितीचा सामना करणार्या व्यासपीठाशी संपर्क साधला, आम्हाला व्हायरल दावे खोटे आहेत सांगण्यात आले कि, “इराणमधील कोणत्याही न्यायालयाने रोनाल्डोला ९९ फटके मारण्याची शिक्षा दिली नाही.” Factnameh ने इराण इंटरनॅशनल टीव्हीवरील एक बातमी देखील शेअर केली आहे, ज्यात असे म्हटले आहे की व्हायरल दावा वकिलाच्या प्रसिद्धी स्टंटचा भाग होता. या रिपोर्टमध्ये हमामीचाही हवाला दिला आहे, जिने म्हटले आहे की, “मला तुम्हाला सांगायचे आहे की माझ्या कुटुंबाची आणि माझी या प्रकरणाबद्दल कोणतीही तक्रार नाही आणि रोनाल्डोने मला परोपकार आणि प्रामाणिकपणाच्या भावनेने मिठी मारली आणि हे प्रेमाचे, त्याचा सन्मान आणि मानवतेचे लक्षण आहे.”
Conclusion
आमच्या तपासात हे स्पष्ट झाले आहे की, इराणच्या न्यायालयाने पोर्तुगीज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोला व्यभिचारासाठी 99 फटक्यांची शिक्षा ठोठावल्याचा व्हायरल दावा खोटा आहे.
Result: False
Sources
Tweet, @IraninSpain, October 13, 2023
Email from Factnameh
Report, Iran International TV
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in
फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा