Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: भटकळ येथे काँग्रेसच्या विजयाच्या निमित्ताने पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला होता...

Fact Check: भटकळ येथे काँग्रेसच्या विजयाच्या निमित्ताने पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला होता का? नाही, हा दावा खोटा आहे

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
भटकळच्या काँग्रेस विजय जल्लोषात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला.
Fact
काँग्रेसच्या विजयी कार्यक्रमात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला नाही. हा मुस्लिम धार्मिक ध्वज आहे आणि स्थानिक तन्झीम संघटनेच्या समर्थकांनी तो फडकवला आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळवल्यानंतर लगेचच भटकळमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकल्याचा तथाकथित दावा व्हायरल झाला. भटकळमध्ये पाकिस्तानचा ध्वज फडकतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर खूप खळबळ उडाली. बर्‍याच युजर्सनी भटकळ येथे पाकिस्तानी ध्वज फडकल्याचे सांगितले, तर काहींनी इस्लामिक ध्वज फडकल्याचे पोस्ट केले. त्याची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.

Fact Check: भटकळ येथे काँग्रेसच्या विजयाच्या निमित्ताने पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला होता का? नाही, हा दावा खोटा आहे

असेच अनेक दावे करण्यात आले आहेत.

असे दावे येथे, येथे आणि येथे पाहिले जाऊ शकतात.

न्यूजचेकरने या प्रकरणाशी संबंधित तथ्य शोधणे सुरू केले आणि तो पाकिस्तानचा ध्वज नसल्याचे लक्षात आले.

Fact Check/ Verification

न्यूजचेकरने तथ्य शोधण्यासाठी कीवर्ड शोध घेतला आणि विविध मीडिया रिपोर्ट्स उपलब्ध झाले.

TV9 कन्नड च्या 13 मे 2023 च्या रिपोर्ट नुसार, “कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळाले आणि भटकळमध्येही काँग्रेसचा उमेदवार विजयी झाला. अशा प्रकारे मुस्लिम तरुणांनी केवळ इस्लामचा ध्वज हातात धरून आनंद साजरा केला नाही तर भगव्या ध्वजा शेजारी तो लावला. भटकळ च्या समशुद्दीन सर्कलवर उभे राहून आणि केसरी भवनाशेजारी इस्लाम ध्वज धरून जल्लोष साजरा करण्यात आला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संतापही व्यक्त केला जात आहे.”

वार्ताभारतीच्या 13 मे 2023 च्या रिपोर्ट मध्ये, “भटकळ-होन्नावर मतदारसंघातील काँग्रेस उमेदवाराच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी काँग्रेस समर्थक भटकळ शमशुद्दीन सर्कलजवळ हिरवे आणि भगवे झेंडे घेऊन जमले. या घटनेची छायाचित्रे सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाली, काहींनी दावा केला की काँग्रेस समर्थकांनी ‘मुस्लिम ध्वज’ धरला होता, तर काहींनी असा युक्तिवाद केला की त्यांनी ‘पाकिस्तान ध्वज’ धरला होता. यावर उत्तर कन्नडचे पोलिस अधीक्षक विष्णुवर्धन एन. यांनी स्पष्टीकरण दिले आहे. काँग्रेस समर्थकांनी वापरलेला पाकिस्तानचा ध्वज नव्हता. हा काही व्यक्तींनी दाखवलेला धार्मिक ध्वज असल्याचे सांगण्यात आले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी हा पाकिस्तानी ध्वज नसल्याची पुष्टी केली, त्यामुळे कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाही,” असे म्हटले आहे.

प्रजावाणी च्या 14 मे 2023 रोजीच्या रिपोर्टमध्ये, “विधानसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांच्या विजयानंतर शनिवारी झालेल्या जल्लोषात, जिल्ह्यातील भटकळ आणि शिरसीमध्ये हिरवा झेंडा फडकवल्याने वाद निर्माण झाला आहे. दरम्यान भटकळ शहरातील मंकला वैद्य यांच्या समर्थकांनी हा विजयोत्सव साजरा केला, एका तरुणाने शमशुद्दीन सर्कलवर अर्धा चंद्र आणि तारे असलेला हिरवा झेंडा फडकावला. जवळच भगवा ध्वज आणि निळे झेंडे फडकत होते.” असे म्हटले आहे. याच रिपोर्टमध्ये भटकळ आणि शिरसी येथे फडकवलेले झेंडे पाकिस्तानी झेंडे नसल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस अधीक्षक एन.विष्णुवर्धन यांनी प्रतिक्रिया दिली की “नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये.”

याबाबत अधिक माहितीसाठी भटकळ येथील उदयवाणीचे स्थानिक वार्ताहर आर.के.भट्ट यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या मंकला वैद्य यांना तनजीम या स्थानिक संघटनेचा पाठिंबा मिळाला आणि भटकळ मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून येण्यासाठी त्यांना 1,00,442 मते मिळाली. हजारो हिंदू-मुस्लिम मतदारांनी भटकळ शहरातील शमशुद्दीन सर्कलमध्ये एकत्र विजय साजरा करण्यास सुरुवात केली.दुपारी 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत जल्लोष सुरु होता. मंकला वैद्य 10.30 पर्यंत त्याठिकाणी होते. त्यात यावेळी B.J.P. व इतर हिंदू संघटनेचे कार्यकर्ते पाठिंबा देण्यासाठी भगवा ध्वज (भगवा झेंडा) घेऊन आले, अनेक मुस्लीम तरुण त्यांच्या धर्माचा झेंडा घेऊन आले होत्र. शमशुद्दीन सर्कलवर त्यांनी दोन्ही झेंडे एकत्र फडकवले. शिवाय भारतीय ध्वज, काँग्रेस पक्ष ध्वज, मंकला वैद्य यांचा फोटो असलेला झेंडा, तसेच दलित संघटनेचा झेंडाही फडकवण्यात आला.” अशी माहिती त्यांनी दिली.

यासोबतच भटकळच्या स्थानिक न्यूज वेबसाईट साहील ऑनलाइनचे कार्यकारी संपादक इनायतुल्ला यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “आमदार वैद्य यांच्या विजय सोहळ्यात फडकलेला ध्वज हा इस्लामचा धार्मिक ध्वज आहे. हा ध्वज विविध उत्सवांच्या प्रसंगी दर्ग्यांमध्ये फडकवला जातो. स्थानिक तनझीम संघटनेच्या तरुणांनी विजयाच्या आनंदात हा ध्वज फडकवला. या ध्वजावर चंद्र, मोठा तारा आणि लहान ताऱ्याच्या प्रतिमा आहेत. या विजय सोहळ्यात हिंदू आणि मुस्लिम सर्वच कार्यकर्ते सहभागी झाले होते.” असे त्यांनी सांगितले.

साहिलने ऑनलाइन पोस्ट केलेल्या YouTube व्हिडिओमध्ये, रात्री उशिरा भटकळ सर्कलमध्ये हिरवे आणि भगवे झेंडे फडकताना दिसत आहेत.

Reported by Sahil Online

व्हायरल व्हिडीओ तपासला तर त्यात दिसणार्‍या ध्वजावर चंद्राची प्रतिमा आहे, ताऱ्याचे चिन्ह मोठे आहे आणि बाकीच्या भागावर लहान तार्‍याची प्रतिमा आहे. आम्ही या ध्वजाची पाकिस्तानी ध्वजाशी तुलना केली असता, हे लक्षात येते की पाकिस्तानचा ध्वज वेगळा आहे, कारण त्यातील एक चतुर्थांश भाग पांढरा आहे.

Conclusion

या सत्यशोधनानुसार भटकळमध्ये काँग्रेसच्या विजयादरम्यान जो ध्वज फडकला होता, तो मुस्लिम धर्माचा असून तो पाकिस्तानचा ध्वज नसल्याचे आढळून आले.

Results: False

Our Sources

Report By TV9 Kannada , Dated: May 13, 2023
Reporty By Vartha Bharathi , Dated: May 13, 2023
Reporty By Prajavani , Dated: May 14, 2023
YouTube Video By Sahilonline , Dated: May 15, 2023
Conversation with RKBhat, Udayvani Reporter Bhatkal
Conversation with Inayathulla, Managing Editor Sahilonline


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Most Popular