Thursday, December 26, 2024
Thursday, December 26, 2024

HomeFact CheckFact Check: DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा...

Fact Check: DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली?

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली.

Fact
नाही, व्हायरल दावा खोटा आहे.

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे. पंतप्रधान मोदी दुपारी मंदिराच्या गर्भगृहात धार्मिक विधी सुरू करतील. या सोहळ्यासाठी सुमारे 7 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. दरम्यान, झी न्यूजसह इतर प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की तामिळनाडूतील सत्ताधारी पक्ष DMK खासदार कनिमोझी यांच्या कुटुंबीयांनी राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली आहे.

तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की हा दावा खोटा आहे. कनिमोझी यांच्या कार्यालयानेही याला दुजोरा दिला आहे.

झी न्यूजने 29 डिसेंबर 2023 रोजी, “राम मंदिर: एक तरफ सनातन संस्‍कृति को कोसती है DMK, दूसरी तरफ कनिमोझी की फैमिली ने भेजा 613 किलो का घंटा” या हेडींगसह बातमी प्रकाशित केली आहे. या बातमीत असा दावा करण्यात आला आहे की, “हिंदूंच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या DMK खासदार कनिमोझी यांच्या कुटुंबीयांनी तामिळनाडूतील रामेश्वरम येथून अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलो वजनाची घंटा पाठवली असून त्यावर त्यांचे नावही लिहिले आहे”.

Fact Check: DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली?
 Courtesy: FB/ZeeNews

मराठी न्यूज वेबसाईट लोकमतनेही आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या वृत्तात हाच दावा केला आहे.

Fact Check: DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली?
Screengrab of Lokmat.com

संबंधित दावा व्हाट्सअपच्या माध्यमातूनही मोठ्याप्रमाणात व्हायरल केला जात आहे.

Fact Check: DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली?

Fact Check/Verification

जेव्हा Newschecker ने व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी संबंधित कीवर्डच्या मदतीने Google वर शोधले तेव्हा 29 डिसेंबर 2023 रोजी इंडिया टुडेच्या यूट्यूब चॅनेलवर प्रकाशित केलेला व्हिडिओ रिपोर्ट सापडला. हा व्हिडिओ त्याच घंटेचा होता जीचा उल्लेख व्हायरल दाव्यात करण्यात आला आहे.

Fact Check: DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली?
Courtesy: YT/India Today

ही घंटा तामिळनाडूतून राम मंदिरासाठी पाठवण्यात आल्याचे व्हिडिओ रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. यावेळी घंटेवर इंग्रजीत लिहिलेली काही नावेही दिसली. पी कनिमोझी, पी लोकेश, महालक्ष्मी, कुमारन, वनगम अमरनाथ, व्यंकटेश नागमणी हे घंटेवर लिहिलेले आहे. याशिवाय एसपीई ग्रुप टीएन असेही लिहिले आहे. मात्र, कनिमोझी यांचा उल्लेख रिपोर्टमध्ये कुठेही करण्यात आलेला नाही.

याशिवाय एएनआय या वृत्तसंस्थेच्या अधिकृत एक्स हँडलवरून केलेले ट्विट देखील आम्हाला आढळले. या ट्विटमध्ये त्या घंटेचा व्हिडिओही होता. या व्हिडीओमध्येही घंटेवर लिहिलेली सर्व नावे दिसतात, जी वर नमूद केली आहेत.

Fact Check: DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली?
Courtesy: X/ANI

यानंतर, आम्ही आमचा तपास पुढे नेला आणि SPE ग्रुपचा शोध घेतला. त्यामुळे आम्हाला SPE Gold या कंपनीची वेबसाइट सापडली. वेबसाइटवर दिलेल्या कंपनीच्या संचालकांच्या नावांमध्ये पी लोकेशचे नाव होते, ज्याचा उल्लेखही घंटेवर आहे. याशिवाय टीकेएस पुगझेंधी, पी सरवणन आणि पी कथिरावन या तीन संचालकांची नावे आहेत.

Fact Check: DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली?
Courtesy: SPE Gold

दरम्यान, आम्हाला 21 सप्टेंबर 2020 रोजी द हिंदूच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट देखील सापडला. त्यामध्ये फिचर इमेज स्वरूपात सदर घंटेचे चित्र वापरण्यात आले आहे. या घंटेला लीगल राइट्स कौन्सिल नावाच्या एनजीओने निधी दिला असल्याचे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

Fact Check: DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली?
Courtesy: The Hindu

जेव्हा आम्ही लीगल राइट्स काउंसिलच्या वेबसाइटवर शोध घेतला तेव्हा आम्हाला आढळले की एसपीई ग्रुपचे संचालक टीकेएस पुगझेंधी हे या एनजीओच्या केंद्रीय समितीचे सदस्य आहेत.

Fact Check: DMK खासदार कनिमोझी यांनी अयोध्या राम मंदिरासाठी 613 किलोची घंटा पाठवली?

आमच्या तपासणीत हे स्पष्ट झाले की सुमारे 613 किलो वजनाची ही घंटा एसपीई ग्रुपशी संबंधित लोकांनी तयार केली आहे.

आमच्या तपासाची पुष्टी करण्यासाठी आम्ही एसपीई ग्रुपशी संपर्क साधला तेव्हा त्यांचे संचालक पी लोकेश म्हणाले, “ही घंटा त्यांच्या कुटुंबाच्या आणि कंपनीच्या वतीने पाठवण्यात आली आहे. यावेळी त्यांनी द्रमुकच्या खासदार कनिमोझी यांच्याशी कोणत्याही प्रकारे संबंधित नसल्याचेही सांगितले.”

जेव्हा आम्ही DMK खासदार कनिमोझी यांच्याशीही संपर्क साधला तेव्हा त्यांनी व्हायरल दाव्याचे खंडन केले आणि स्पष्टपणे सांगितले की “अयोध्या राम मंदिरासाठी घंटा त्यांच्या कुटुंबाने पाठवली नाही”.

Conclusion

आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की व्हायरल दावा खोटा आहे. सुमारे 613 किलो वजनाची ही घंटा द्रमुक खासदार कनिमोझी यांच्या कुटुंबीयांनी पाठवली नाही.

Result: False

Our Sources

Video report published by India Today on 29th Dec 2023
Video Tweeted by ANI on 28th Dec 2023
Telephonic Conversation with DMK MP Kanimozhi
Telephonic Conversation with SPE Group Director P Lokesh

(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी रुंजय कुमार यांनी केले असून येथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular