Saturday, December 21, 2024
Saturday, December 21, 2024

HomeFact Checkबाजारात डुप्लिकेट चायना मेड अमूल बटर आले आहे? खोटा आहे हा दावा

बाजारात डुप्लिकेट चायना मेड अमूल बटर आले आहे? खोटा आहे हा दावा

सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अमूल कंपनीच्या ‘बटर’ या उत्पादनासंदर्भात आहे. बाजारात डुप्लिकेट चायना मेड अमूल बटर आले आहे असून यापुढे खरेदी करताना काळजी घ्या. असे आवाहन हा दावा करतो.

बाजारात डुप्लिकेट चायना मेड अमूल बटर आले आहे? खोटा आहे हा दावा
Courtesy: Twitter@Sc_Baba03

फेसबुकवरही याच विषयावरील समान दावे आम्हाला पाहायला मिळाले. या उत्पादनासंदर्भातील हा दावा अनेक युजर्स व्हाट्सअप सारख्या माध्यमावरूनही शेयर करू लागले आहेत.

Factcheck/ Verification

व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती अमूल बटर या एकाच उत्पादनाचे दोन पॅक दाखवीत त्यापैकी एक पॅक कसा चायना मेड आणि बनावट आहे हे सांगताना आढळते. आम्ही त्या व्हिडिओच्या कि फ्रेम्स काढून शोधून पाहण्याचा प्रयत्न केला. आम्हाला व्हायरल व्हिडीओ ५ नोव्हेंबर २०२२ रोजी आवाम की आवाज या युट्युब चॅनेलवर अपलोड करण्यात आल्याचे लक्षात आले. या चॅनेलवर उपलब्ध व्हिडिओतील काही भाग सध्या व्हायरल केला जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही या संदर्भात काही माहिती मिळते का? याचा शोध गुगल वर किवर्डस च्या माध्यममातून घेतला.

आम्हाला टाइम्स नाऊ ने प्रसिद्ध केलेली २८ डिसेंबर २०१८ ची एक बातमी सापडली. अमूल बटर असल्याचे सांगून बनावट लोणी खोटे पॅकेजिंग करून विकणाऱ्या एका टोळक्याचा २०१८ मध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश करून अटक केल्याची माहिती आम्हाला त्या बातमीत मिळाली.

बाजारात चायना मेड डुप्लिकेट अमूल बटर आले आहे.
Courtesy: Timesnownews.com

या जुन्या बातमीचा आणि व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचा काहीच संबंध असल्याचे आम्हाला जाणवले नाही. व्हायरल व्हिडिओमध्ये म्हणण्यात आल्याप्रमाणे खरेच बनावट बटर बाजारात आले आहे का? हे शोधण्यासाठी आम्ही आणखी शोध घेतला असता, आम्हाला अमूल कंपनीने केलेल्या एका ट्विट कडे नेले. यामध्ये कंपनीने एक स्पष्टीकरण दिले आहे. “व्हायरल व्हिडिओमध्ये दाखविले जाणारे अमूल बटर चे दोन्ही पॅक अधिकृत असून ते दोन्हीही भारतातच बनविण्यात आले आहेत.” असे कंपनीने म्हटले आहे.

या ट्विट मध्ये व्हायरल व्हिडिओबद्दलचे विस्तृत स्पष्टीकरण देण्यात आले आहेत. व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेले अमूल बटर चे दोन वेगवेगळे पॅक हे जुन्या आणि नवीन पॅकिंग चा भाग आहे. FSSAI ने जारी केलेल्या नव्या नियमावली प्रमाणे केलेल्या नव्या पॅकिंगची जुन्या पॅकिंगशी तुलना करून हा खोटा दावा करण्यात आल्याचे यामध्ये म्हटलेले आहे. FSSAI च्या नव्या नियमांनुसार नव्या पॅकेजिंग वर समोरील भागात व्हेज चा सिम्बॉल लावण्यात आला आहे. असेही हे अमूल कंपनीचे ट्विट सांगते.

Conclusion

अशाप्रकारे अमूल कंपनीचे बटर या उत्पादनाचे बाजारात चायना मेड डुप्लिकेट आले आहे. हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources


Video published by Awam ki Awaz on November 5, 2022

News published by Timesnow.com on December 28, 2018

Tweet made by Amul on February 15, 2023


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular