Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: भेसळ करण्यासाठी प्लास्टिकचे गहू बनविले जाताहेत? व्हायरल दावा खोटा आहे

Fact Check: भेसळ करण्यासाठी प्लास्टिकचे गहू बनविले जाताहेत? व्हायरल दावा खोटा आहे

Claim
गव्हात भेसळ करण्यासाठी प्लास्टिकपासून हुबेहूब गहू असे कारखान्यात बनविले जातात.
Fact
हा दावा खोटा आहे. प्लास्टिक पुनर्निर्मिती करण्याच्या प्रक्रियेला दिशाभूल करून बनावट गहू निर्मिती केली जात असल्याचे सांगितले जात आहे.

खाद्यपदार्थात होणारी भेसळ हा चिंतेचा विषय आहे. याच पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर बनावट गहू बनविले जात असल्याचे सांगत एका कारखान्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. दावा आहे की, प्लास्टिक पासून गहू तयार करून गव्हात भेसळ केली जात आहे.

Fact Check: भेसळ करण्यासाठी प्लास्टिकचे गहू बनविले जाताहेत? व्हायरल दावा खोटा आहे
Courtesy: Twitter@Girish_99999

समान दावा आम्हाला फेसबुकवरही पाहायला मिळाला.

व्हायरल व्हिडीओ व्हाट्सअपवरही मोठ्याप्रमाणात फिरत आहे. “एका कट्ट्यात किमान पाच ते दहा किलो हा बनावट गहू टाकत असतील, तर आपल्या आरोग्याचे तीन तेरा वाजणारच” असे हा दावा सांगतो.

Fact Check/ Verification

Newschecker ने व्हायरल व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला. व्हिडिओमध्ये प्लास्टिक वर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जात असल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. व्हिडीओ पाहताना त्यावर ‘Smartest Workers’ असा वॉटरमार्क असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

यावरून सुगावा घेऊन आम्ही किवर्ड सर्च केला असता, आम्हाला smartest.worker हे इंस्टाग्राम पेज सापडले. संबंधित पेजने २४ सप्टेंबर रोजी अपलोड केलेला व्हिडीओ आम्हाला पाहायला मिळाला. तो व्हिडीओ आम्हाला व्हायरल व्हिडिओशी मिळताजुळता असल्याचे दिसून आले.

Fact Check: भेसळ करण्यासाठी प्लास्टिकचे गहू बनविले जाताहेत? व्हायरल दावा खोटा आहे
Courtesy: Instagram@smartest.workers

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये आम्हाला, ‘Plastic’s New Purpose: Unveiling the Recycling Journey’ असे वाचायला मिळाले. प्लास्टिकच्या पुनर्निर्मितीचा प्रवास उलगडण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करीत आहोत. असे या पेजच्या स्पष्टपणे लिहिलेले आहे. यावरून हा व्हिडीओ वापरलेले जुने प्लास्टिक प्रक्रिया करून पुन्हा बनविले जात असल्याची माहिती आम्हाला मिळाली. या कॅप्शनमध्ये कुठेही बनावट गहू बनविण्याचा उल्लेख आलेला नाही.

पुढील तपासात smartest.worker या पेजने अपलोड केलेल्या इतर व्हिडिओंची माहिती आम्ही शोधली. आम्हाला कौशल्याचा वापर करून केल्या जाणाऱ्या विविध कलांची आणि त्या कला साकारणाऱ्या कामगारांची व्हिडीओ स्वरूपातील माहिती हे पेज देत असल्याचे निदर्शनास आले.

Fact Check: भेसळ करण्यासाठी प्लास्टिकचे गहू बनविले जाताहेत? व्हायरल दावा खोटा आहे
Courtesy: Instagram@smartest.workers

जीवनाच्या प्रत्येक पैलूतील सामान्य समस्यांचे सर्जनशीलतेने निराकरण करण्यासाठी पर्याय शोधणाऱ्या सर्जनशीलतेचे कौतुक करणे हा आपला मुख्य उद्देश असल्याचे पेजच्या Bio मध्ये लिहिलेले आहे. त्याचे मूळ इंग्रजी स्वरूप पुढीलप्रमाणे आहे. “We at smartest workers aim to appreciate the creativity in inventing alternatives to creatively solve common issues in every aspect of life.” यावरून आमच्या लक्षात आले की व्हिडीओ अपलोड करतानाच तो प्लास्टिक पदार्थांच्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया सांगत आहे.

व्हायरल व्हिडिओत प्लास्टिक पासून बनविला पदार्थ गव्हाच्या दाण्यासारखा दिसतो. यावरून संशय निर्माण झाला असल्याचा सुगावा घेऊन आम्ही वापरलेल्या प्लास्टिकची पुनर्निर्मिती करण्याची प्रक्रिया कशी केली जाते? याचा शोध घेतला. यासंदर्भात युट्युबवर असंख्य व्हिडीओ आम्हाला पाहायला मिळाले.

Fact Check: भेसळ करण्यासाठी प्लास्टिकचे गहू बनविले जाताहेत? व्हायरल दावा खोटा आहे
Youtube Search Results

यापैकी @Ressource-deutschlandDe या युट्युब चॅनेलने २७ सप्टेंबर २०१८ रोजी अपलोड केलेला व्हिडीओ आपण पाहू शकता. यामध्ये प्लास्टिकच्या पुनर्निर्मितीची प्रक्रिया दाखविण्यात आली आहे.

संबंधित व्हिडिओमध्ये प्लास्टिक पुनर्निर्मिती करण्याची प्रक्रिया पाहताना १३.०० मिनिटानंतर दाण्याच्या आकारात तयार केले जाणारे प्लास्टिक पाहता येते.

या प्रक्रियेचे अनेक व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्हाला, सर्वप्रथम प्लास्टिक स्वच्छ केले जाते. यानंतर त्याचे छोटे तुकडे केले जातात. हे तुकडे पुन्हा स्वच्छ करून पुढे ओले प्लास्टिकचे तुकडे सुकविले जातात. मग हे वाळलेले तुकडे कापून अधिक बारीक केले जाते. त्यानंतर ते उकळवून थंड केले जातात आणि प्लास्टिकचे छोटे दाणे तयार केले जातात. सदर तुकडे वेगवेगळ्या रंगात बनविले जातात. अशी माहिती मिळाली. दरम्यान ते तांदूळ किंवा गहू असल्याचा संशय निर्माण होऊ शकतो. हे आमच्या लक्षात आले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल दावा खोटा असल्याचे लक्षात आले. प्लॅस्टिकची पुनर्निर्मिती करण्याच्या प्रक्रियेचा व्हिडीओ दिशाभूल करून व्हायरल करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Result: False

Our Sources
Google search results
Youtube search results
Video uploaded by Smartest Workers on September 24, 2023
Video uploaded by @Ressource-deutschlandDe on September 27, 2018


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in

फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular