Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
हैदराबाद पोलिसांनी माहिती दिली आहे, कोणतेही थंड पेय पिऊ नका कारण कंपनीच्या एका कामगाराने त्यात इबोला नावाच्या धोकादायक विषाणूचे दूषित रक्त मिसळले आहे.
हा मेसेज व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल असून आम्हाला फेसबुकवरही मिळाला.
हैदराबाद पोलिसांनी अशी कोणती माहिती दिली आहे का? हे पाहण्यासाठी आम्ही कीवर्ड सर्च केले. आम्हाला १३ जुलै २०१९ रोजी या मेसेज संदर्भात हैदराबाद पोलिसांनी केलेली एक फेसबुक पोस्ट आढळली.
“सोशल मीडियावर कूल ड्रिंक्स आणि हैदराबाद शहर पोलिसांच्या चेतावणीबद्दल पसरवलेल्या बातम्या खोट्या आहेत आणि हैदराबाद शहर पोलिसांनी यासंदर्भात कोणताही संदेश जारी केला नाही.” असे या पोस्टमध्ये चार वर्षांपूर्वी लिहिलेले आम्हाला दिसले. यावरून हा मेसेज जुना असल्याचे आणि अनेक वर्षांपासून दिशाभूल करीत असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
याच आशयाचे @hydcitypolice ने १३ जुलै २०१९ रोजी केलेले ट्विट सुद्धा आमच्या पाहणीत आले.
भारत सरकारची अधिकृत फॅक्टचेक यंत्रणा पीआयबी ने सुद्धा याप्रकारचा मेसेज खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे ३० जून २०२३ रोजी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
अशाप्रकारे आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Facebook post by Hyderabad City Police on July 13, 2019
Tweet made by Hyderabad City Police on July 13, 2019
Tweet made by PIB Factchek on June 30, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in