Authors
मागील आठवडाही व्हायरल क्लेम्सची बरसात करून गेला. पेन्शनधारकांचे न वापरलेले पैसे परत घेण्याचे आदेश सरकारने बँकांना दिल्याचा दावा करण्यात आला. ल्युपो केक मध्ये टॅब्लेट्स सापडले असून त्याचे सेवन केल्यास मुलांना अर्धांगवात होतो, असा दावा करण्यात आला. एका भारतीय महिलेने सापाला जन्म दिला आहे, असा दावा करण्यात आला. कोल्डड्रींक्स मध्ये इबोला व्हायरस असून ते न पिण्याचा सल्ला देणारा दावा व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
ल्युपो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्याने लहान मुलांना अर्धांगवायू होतो?
ल्युपो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्याने लहान मुलांना अर्धांगवायू होतो, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
गर्भवती महिलेने सापाला जन्म दिला नाही
एका गरोदर भारतीय महिलेने नुकताच सापाला जन्म दिला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.
सॉफ्ट ड्रिंक्समध्ये इबोला विषाणू असल्याचा दावा हैदराबाद पोलिसांनी केला?
सॉफ्ट ड्रिंक्समध्ये इबोला विषाणू असल्याचा दावा हैदराबाद पोलिसांनी केला असल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
पेंशनबद्दलचा असा आदेश सरकारने दिला नाही
पेन्शन न वापरणाऱ्यांच्या खात्यातील पैसे परत पाठवा असा आदेश सरकारने बँकांना दिला आहे. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in