Authors
Claim
रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिंदू समाजाच्या लोकांनी मारहाण केली.
Fact
हा दावा दिशाभूल करणारा आहे. वास्तविक, व्हायरल झालेला व्हिडिओ जुलै 2015 मधला आहे, बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे यांच्या विरोधात बोलणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सांगलीतील शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.
रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिंदू समाजाच्या लोकांनी मारहाण केली. असा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
आम्हाला इतर भाषांतही समान दावा व्हायरल होत असल्याचे दिसले.
नुकतेच प्रभू राम यांना मांसाहारी संबोधून वादात सापडलेले राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या वक्तव्यावर खेद व्यक्त केला होता. मात्र, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटना आणि भाजप करत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अनेक ठिकाणी एफआयआरही नोंदवण्यात आले आहेत. याच क्रमाने, सोशल मीडिया युजर्स एक व्हिडिओ शेअर करत आहेत, ज्यात दावा केला जात आहे की रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिंदू समाजाच्या लोकांनी मारहाण केली आहे.
Fact Check/Verification
रामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना हिंदू समाजातील लोकांनी मारहाण केल्याच्या नावाखाली झालेल्या दाव्याची चौकशी करण्यासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओमध्ये ऐकलेल्या संवादांद्वार गुगलवर कीवर्ड सर्च केला. प्रक्रियेत, आम्हाला 2015 मध्ये इंडिया टुडेने प्रकाशित केलेला YouTube व्हिडिओ सापडला, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओमधील दृश्ये आहेत.
इंडिया टुडेने 21 जुलै 2015 रोजी प्रकाशित केलेल्या यूट्यूब व्हिडिओनुसार, महाराष्ट्रातील सांगली येथे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर शिवप्रतिष्ठानचे संस्थापक आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्या विरोधात बोलल्याबद्दल शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. याशिवाय, व्हिडिओमध्ये संस्थेचे मुंबई ब्युरो चीफ साहिल जोशी हे बोलताना ऐकू येतात की या संपूर्ण घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही आणि पोलिसांनी शिवप्रतिष्ठानच्या 5 कार्यकर्त्यांनाही अटक केली आहे.
वरील व्हिडिओ रिपोर्टमधून मिळालेल्या माहितीच्या मदतीने आम्ही गुगलवर ‘Jitendra Awhad attacked in Sangli’ सारखे कीवर्ड शोधले तेव्हा आम्हाला अशी माहिती मिळाली की झी २४ तास आणि जय महाराष्ट्र न्यूज या माध्यमांनी यासंदर्भात 20 जुलै 2015 रोजी मराठी भाषेत रिपोर्ट प्रकाशित केले आहेत.
महत्वाचे म्हणजे या घटनेची अधिक माहिती आज तक आणि टाइम्स ऑफ इंडियाने क्र. म. श. 20 आणि 21 जुलाई 2015 रोजी प्रकाशित केलेल्या लेखांमधून मिळू शकते.
Conclusion
त्यामुळे हिंदू समाजातील लोकांकडून रामावर वादग्रस्त वक्तव्य करणारे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना मारहाण करण्याच्या नावाखाली करण्यात येत असलेला दावा दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. वास्तविक, व्हायरल झालेला व्हिडिओ जुलै 2015 मधला आहे, बाबासाहेब पुरंदरे यांना दिल्या जाणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराविरोधात आणि शिवप्रतिष्ठान संस्थापकांविरोधात विधान केल्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर सांगलीतील शिवप्रतिष्ठान कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता.
Result: False
Our Sources
Reports published by Aaj Tak & Times of India
YouTube videos published by India TV, Zee 24 Taas & Jai Maharashtra News
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी सौरभ पांडे यांनी केले असून ते येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा