Authors
Claim
1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात राम आणि कमळ असलेली नाणी आणली.
Fact
हे सरकारी चलन नाही त्यामुळे त्यांच्याद्वारे व्यवहार करता येत नाहीत. ही निव्वळ मंदिरातून पूजेच्या निमित्ताने मिळालेली नाणी आहेत.
1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने भारतात राम आणि कमळ असलेली नाणी आणली होती, असा दावा सध्या सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. व्हाट्सअपच्या माध्यमातून हा दावा केला जात आहे.
“दोन आण्याचा नाण्याच्या एका बाजूस राम आणि दुसऱ्या बाजूस कमळ सन – 1818 म्हणजे 200 वर्षांपूर्वी इंग्रजांना पण माहीत होत की राम मंदिर कमळ वालेच बांधतील….. !जय श्रीराम सुप्रभात….!” असे व्हायरल दावा सांगतो.
अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिराचा अभिषेक 22 जानेवारीला होणार आहे. पंतप्रधान मोदी दुपारी मंदिराच्या गाभाऱ्यात धार्मिक विधी सुरू करतील. या सोहळ्यासाठी सुमारे 7 हजार पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर मंदिर उभारणीत भाजपचा पुढाकार या क्रमाने हा दावा व्हायरल होत आहे.
Fact Check/Verification
ईस्ट इंडिया कंपनीने भारतात 1818 मध्ये पारंपारिक नाणी जारी करण्यास सुरुवात केली, आणि नाण्यांवर राम आणि कमळाची चित्रे होती का? यासंदर्भात शोध घेण्यासाठी आम्ही Google वर काही कीवर्डद्वारे सर्च केला.
Google वर ‘1818 2 anna coin’ शोधल्यानंतर, आम्हाला Snap Deal, Flipkart च्या काही लिंक सापडल्या जिथे आम्हाला अशी अनेक ऐतिहासिक नाणी सापडली.
यासह, आम्हाला शॉपक्लूजच्या वेबसाइटवरून या नाण्याची प्रतिमा मिळाली, जिथे पूजा नाणे असा उल्लेख आहे. 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी असा उल्लेख आढळला.
आम्ही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवरही जाऊन कंपनीच्या कार्यकाळात कोणते चलन चलनात होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सिंधू संस्कृतीच्या कालखंडापासून मुघल साम्राज्यापर्यंत, कंपनीच्या काळातील नाण्यांची चित्रे येथे आहेत. 1818 पूर्वी आणि नंतर राम आणि सीतेची प्रतिमा असलेली कोणतीही अधिकृत नाणी चलनात होती का हे शोधण्यासाठी आम्ही आरबीआयच्या चलन विभागाचा शोध घेतला. येथे सिंधू संस्कृतीतील स्वतंत्र भारताच्या नाण्यांचे वर्णन आणि चित्रे आहेत. भारतातील विविध स्वतंत्र राज्यांची आणि ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीपूर्वीची आणि नंतरची नाणी यांचीही चित्रे आहेत. पण हे राम आणि सीतेचे नाणे कुठेही दिसले नाही.
ब्रिटीश राजवटीच्या पूर्ण सुरुवातीपर्यंत, हैदराबाद, अयोध्या, उदयपूर यांसारख्या भारतातील विविध शासक साम्राज्यांमध्ये विविध प्रकारची नाणी जारी केली जात होती.
Coinquest नावाच्या वेबसाईटवर भारतात पुजेच्या वेळी वापरल्या जाणाऱ्या चलनाबद्दल लिहिणाऱ्या सुमित भोला यांच्याशीही आमचा संपर्क झाला. आम्ही त्यांना फोटो पाठवल्यानंतर त्यांनी सांगितले की हे सरकारी चलन नाही ज्याद्वारे व्यवहार करता येतील. हे निव्वळ मंदिरातून पूजेच्या निमित्ताने मिळालेले नाणे आहे.
Conclusion
सोशल मीडियावर व्हायरल झालेला ईस्ट इंडिया कंपनीने 1818 मध्ये भारतात पारंपारिक नाणी आणल्याचा दावा खोटा असल्याचे आमच्या निरीक्षणातून सिद्ध झाले आहे. सदर नाणे पूजेसाठी प्रचलित होते.
Result: False
Our sources
RBI Website
Shopclues
Google Search
(हे आर्टिकल न्यूजचेकर बंगालीसाठी सर्वप्रथम परोमिता दास यांनी केले असून ते येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा