Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkयुपीत एक्झिट पोलच्या खोट्या स्क्रिनशॉटद्वारे एआयएमआयएम आणि बसपा जिंकल्याचा दावा, जाणून घ्या...

युपीत एक्झिट पोलच्या खोट्या स्क्रिनशॉटद्वारे एआयएमआयएम आणि बसपा जिंकल्याचा दावा, जाणून घ्या सत्य काय आहे?

एक्झिट पोलचे निकाल लागल्यानंतर सोशल मीडियावर या संबंधित अनेक खरे-खोटे स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. यातच ‘आजतक’ आणि ‘झी न्यूज’ वाहिनींच्या नावाने दोन स्क्रिनशॉट जास्त प्रमाणात व्हायरल होत आहे.

आजतकच्या स्क्रिनशॉटमध्ये दावा केलाय की, वाहिनीने दाखवलेल्या एक्झिट पोलमध्ये असदुद्दीन ओवेसी यांची पार्टी एआयएमआयएम यांना युपीत ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे. स्क्रिनशॉटमध्ये भाजपला १८०, समाजवादी पार्टीला १९० आणि बसपाला २० जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला आहे.

फेसबुक पोस्ट – Salman Hashmi

या स्क्रिनशॉटमध्ये असं सांगितलंय की, एआयएमआयएम ह्यावेळी युपीत आपले खाते उघडणार आहे. हा स्क्रिनशॉट फेसबुक आणि ट्विटरवर खूप व्हायरल होत आहे.

दुसरीकडे झी न्यूज वाहिनीच्या एक्झिट पोलमध्ये बहुजन समाज पार्टी जिंकल्याचे स्क्रिनशॉटमध्ये दिसतंय. यानुसार युपीत समाजवादी पार्टीला ६०-७०, भाजपला १२०-१२५, बसपाला २१०-२२० आणि काँग्रेसला ०-१ जागा मिळू शकतात. त्या स्क्रिनशॉटमध्ये असं लिहिलंय की, बसपा युपीमध्ये धमाकेदार पुनरागमन करणार आहे.

फेसबुक पोस्ट – Sunil Sawant

उत्तर प्रदेशामध्ये शेवटच्या टप्प्यानंतर मतदान झाल्यावर ७ मार्च रोजी अनेक एक्झिट पोलचे सर्वेक्षण समोर आले. बहुधा सर्वच सर्वेक्षणामध्ये युपीत भाजपलाच विजय मिळणार, असल्याचे दिसून येत आहे. पण १० मार्च रोजी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर या सर्व गोष्टी स्पष्ट होतील. याच दरम्यान हे स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे, ज्यात युपीत एआयएमआयएम आपले खाते उघडणार आणि बसपा तिथे विजय मिळवणार, हा दावा केला जातोय.

Fact Check / Verification

आजतकचा स्क्रिनशॉट या स्क्रिनशॉटचा शोध घेण्यासाठी आम्ही आजतकच्या युट्युब वाहिनीवर गेलो. तिथे आम्हांला ७ मार्चचा एक व्हिडिओ मिळाला. ज्यामध्ये आजतकच्या एक्झिट पोलबाबत सांगत होते.

व्हायरल स्क्रिनशॉटमध्ये आजतकच्या लोगो खाली २०:०७ ही वेळ दिसत आहे. याच्या मदतीने आम्ही आजतकच्या युट्युब व्हिडिओद्वारे त्या वेळेच्या फ्रेमवर जाऊन पोहोचलो. ही तीच वेळ आहे, जिथून व्हायरल स्क्रिनशॉट घेण्यात आला होता.

त्या फ्रेममध्ये कुठेही एआयएमआयएमचे नाव दिसत नाही. तिथे युपीत एक्झिट पोलमध्ये राज्यात ४०३ पैकी ५८ जागा मिळाल्याचे दाखवले जात आहे. त्या सर्वेक्षणात या ५८ जागांमध्ये भाजपला ४९, सपाला ८, बसपाला १ आणि काँग्रेस व बाकीच्यांना ० जागा मिळणार, असे बोलले जात होते.

न्यूजचेकरचे विश्लेषण

आजतकच्या या व्हिडिओची तुलना व्हायरल स्क्रिनशॉटशी केल्यावर स्पष्ट होते की, तो स्क्रिनशॉट खोटा आहे. आजतक / इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये भाजपला युपीत २८८ ते ३२६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. सपाला ७१-१०१, बसपाला ३-९ आणि काँग्रेसला १-३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

झी न्यूजचा स्क्रिनशॉट

या आधी काही दिवसांपूर्वी न्यूजचेकरने या संबंधित एक फॅक्ट चेक केला होता. त्या स्क्रिनशॉटमध्ये झी न्यूजच्या एक्झिट पोलनुसार सपा विजयी होण्याचे सांगितले जात होते. पण आमच्या तपासात हा स्क्रिनशॉट खोटा ठरला.

आता त्याच स्क्रिनशॉटमध्ये फेरफार करून बसपा विजयी होण्याचा दावा केला जात आहे. पण याचा शोध घेतल्यानंतर हे स्पष्ट झाले की, झी न्यूजने कुठलाही एक्झिट पोल घेतला नव्हता. त्यांनी फक्त ओपिनियन पोल घेतला होता. जो त्यांनी जानेवारी २०२२ मध्ये सांगितला होता.

याच्या आधीच्या स्क्रिनशॉटमध्ये पहिले सपा आणि आता बसपा विजयी होण्याचा दावा केला जात आहे. पण दोन्ही स्क्रिनशॉट खोटे आहेत. त्या वेळी केले गेलेले ओपिनियन पोल आणि आता झी न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये भाजपाच विजयी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Conclusion

या पद्धतीने आमच्या तपासात दोन्ही स्क्रिनशॉट खोटे ठरले. आजतकच्या एक्झिट पोलमध्ये युपीत एआयएमआयएमला ११ जागा मिळण्याचा दावा केला जात होता आणि झी न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये बसपा विजयी होण्याचा अंदाज वर्तवला जात होता, या दोन्ही गोष्टी खोट्या ठरल्या.

Result : Manipulate/Altered Media

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular