Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Crime
Claim
दोन लोक अंधारात गोळीबार करताना दिसत आहेत, हा व्हिडिओ मणिपूर हिंसाचाराचा आहे.
Fact
हा व्हिडिओ जवळपास तीन वर्षे जुना आहे आणि त्याचा मणिपूर हिंसाचाराशी काहीही संबंध नाही.
मणिपूर सध्या हिंसाचाराच्या (Manipur Violence) आगीत जळत आहे. हिंसाचार इतका वाढला आहे की, दंगलखोरांना पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये दोन लोक अंधारात गोळीबार करताना दिसत आहेत. हा मणिपूर हिंसाचाराचा व्हिडिओ असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओच्या माध्यमातून लोक केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील भाजप सरकारवर निशाणा साधत आहेत.
छत्तीसगड काँग्रेसच्या सेवा दलानेही हा व्हिडिओ शेअर केला असून तो मणिपूरचा असल्याचा दावा केला आहे आणि कॅप्शन दिले आहे की, “ये कोई फ़िल्मी सीन नहीं मणिपुर में मोदी जी की डबल इंजन की सरकार है अब दलाल मीडिया और मोदी भक्त ये बताए कि यहाँ कौन सा विपक्ष और नेता गये थे भड़काने ? कहावत है “नाच न जाने, आँगन टेढ़ा” देश बर्बाद कर दिया..” या दाव्याचा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
ऑल इंडिया ट्राइबल स्टूडेंट यूनियनने बुधवारी पुकारलेल्या सॉलिडॅरिटी मार्चदरम्यान मणिपूरमध्ये हिंसाचाराला सुरुवात झाली. हा संघर्ष आदिवासी आणि बिगर आदिवासी समाजातील आहे. बिगर आदिवासी मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा (एसटी) दर्जा का मिळू नये, यासाठी आदिवासी समाज आंदोलन करत आहे. वास्तविक, मणिपूर उच्च न्यायालयाने राज्य सरकारला मैतेई समाजाच्या एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीवर विचार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे हा हिंसाचार होत आहे. वृत्तानुसार, हिंसाचारात आतापर्यंत डझनहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
यांडेक्स सर्च इंजिनवर व्हायरल व्हिडिओची कीफ्रेम उलट शोधताना, आम्हाला एक Instagram पोस्ट सापडली. या पोस्टमध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ पाहता येईल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की हा व्हिडिओ 5 जुलै 2020 रोजी ‘threatty_’ हँडलसह शेअर करण्यात आला होता. व्हिडीओ जुना आहे, सध्याचा नाही हे सत्य इथे समोर आले आहे.
इंस्टाग्राम पोस्टमध्ये व्हिडिओबद्दल कोणतीही विशेष माहिती देण्यात आलेली नाही. कॅप्शनमध्ये फक्त “वॉरझोन!” लिहिलेले आहे. यासोबतच #gaming #justforfun सारखे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत. ‘threatty_’ नावाच्या या हँडलच्या बायोमध्ये त्याच नावाच्या YouTube चॅनेलचा उल्लेख करण्यात आला आहे. हे एक गेमिंग चॅनेल आहे. चॅनेलवर सर्व गेमिंग व्हिडिओ पाहता येतील.
जरी, व्हायरल व्हिडिओ गेमिंग व्हिडिओ आहे की मूळ आहे याची आम्ही पुष्टी करू शकत नाही, परंतु हे स्पष्ट आहे की त्याचा मणिपूर हिंसाचाराशी काहीही संबंध नाही.
आमच्या तपासात हे सिद्ध झाले आहे की व्हायरल व्हिडिओसह करण्यात आलेला दावा दिशाभूल करणारा आहे. मणिपूरमधील हिंसाचाराच्या आधी तीन वर्षांपूर्वी पासूनच हा व्हिडिओ इंटरनेटवर उपलब्ध आहे.
Our Sources
Instagram post by ‘threatty_’
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in
Vasudha Beri
December 20, 2024
Tanujit Das
December 19, 2024
Prasad S Prabhu
December 7, 2024