Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: गोव्यात बनावट काजू बनविले जातात असा व्हिडीओ पाहण्यात आलाय? जाणून...

Fact Check: गोव्यात बनावट काजू बनविले जातात असा व्हिडीओ पाहण्यात आलाय? जाणून घ्या वस्तुस्थिती

Claim
गोवा राज्यात कृत्रिम पद्धतीने बनावट काजू बनविले जातात.

Fact
व्हायरल व्हिडीओ काजूच्या आकाराच्या बिस्किटांचा आहे. अशापद्धतीने काजूगर बनविता येत नाहीत.

गोवा राज्यात कृत्रिम पद्धतीने बनावट काजू बनविले जात असल्याचे सांगणारा एक व्हिडीओ सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. फेसबुकवर हा व्हिडीओ शेयर करून दावा केला जात आहे की तुम्हाला सर्व काजू एकाच आकाराचे मिळाल्यास ते नकली किंवा बनावट आहेत.

Fact Check: गोव्यात बनावट काजू बनविले जातात असा व्हिडीओ पाहण्यात आलाय? जाणून घ्या वस्तुस्थिती
Courtesy: Facebook/Sunil Radhakrishnan Nair II

फेसबुकच्या बरोबरीनेच हा व्हिडीओ व्हाट्सअप च्या माध्यमातूनही मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे.

गोवा राज्यात काजूच्या बागायतींना महत्व आहे. शेतकरी आपापल्या बागेत पिकणारे मुरटे आणि त्यांना जोडून लागणाऱ्या काजू बिया यांचा व्यापार करतात. यापैकी मुरट्या चा वापर फेणी आणि कीटकनाशके सारखी इतर उत्पादने तयार करण्यासाठी आणि काजू बि वर प्रक्रिया करून काजू गर बनविले जातात. दरम्यान गोवा आणि कोकणातील काजू गर खरेदी करण्याकडे ग्राहकांचा ओढा जास्त आहे. या पार्श्वभूमीवर व्हायरल होत असलेल्या या दाव्याने काजू गर उत्पादन प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

Fact Check/ Verification

व्हायरल व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे खरोखरच बनावट काजू बनविले जातात का? याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही व्हायरल व्हिडीओचे की फ्रेम्स बनविले आणि गुगल रिव्हर्स इमेज सर्च च्या माध्यमातून शोध घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला गुगलने ‘Spoons of Indore’ या फेसबुक पेज कडे नेले. ‘How fake kaju is made’ या शीर्षकाखाली या पेजने १८ मार्च २०२३ रोजी व्हायरल व्हिडीओ पोस्ट केल्याचे आमच्या निदर्शनास आले. या पेज चा मुख्य उद्देश खाद्यपदार्थांचे व्हिडीओ लॉग तयार करणे असून तेथे आम्हाला त्यांच्या YouTube and  Instagram खात्यांच्या लिंक ही सापडल्या.

Fact Check: गोव्यात बनावट काजू बनविले जातात असा व्हिडीओ पाहण्यात आलाय? जाणून घ्या वस्तुस्थिती
Courtesy: Facebook /Spoons of Indore

आम्ही या पोस्ट च्या कॉमेंट सेक्शन तपासला असता हा व्हिडीओ काजू बिस्किट नावाचा स्नॅक्स बनवण्याबाबतचा आहे, अशा प्रतिक्रिया अनेकांनी पोस्टवर दिल्या आहेत. हे आमच्या निदर्शनास आले. “हा व्हिडीओ काजूच्या आकाराचे बिस्कीट तयार करण्याचा आहे”, “हा व्हिडीओ काजू नव्हे तर बिस्किटे तयार करण्याची रेसिपी आहे” अशाप्रकारच्या कॉमेंट्स आम्हाला वाचायला मिळाल्या. काही यूजर्सनी अशाप्रकारचे बिस्कीट गोव्यात नव्हे तर उत्तर भारतात मिळतात अशा प्रकारच्या कॉमेंट्स केल्याचे आमच्या वाचनात आले.

Fact Check: गोव्यात बनावट काजू बनविले जातात असा व्हिडीओ पाहण्यात आलाय? जाणून घ्या वस्तुस्थिती
Comments in Spoons of Indore ‘s Post

व्हायरल व्हिडीओ हा बनावट काजू बनविण्याचा नसून काजू बिस्किटे बनविण्याचा असल्याचे लक्षात येताच आम्ही त्यादृष्टीने सर्च केला असता, आम्हाला  kaju biscuit recipe या किवर्ड वर तसे असंख्य व्हिडीओ मिळाले. Cook with nain नावाच्या युट्युब चॅनेल ने व्हायरल व्हिडिओत दाखविल्याप्रमाणे काजूच्या आकाराची बिस्किटे तयार करण्याची रेसिपी दाखविणारा व्हिडीओ २७ जुलै २०२२ रोजी अपलोड केला असल्याची माहिती आम्हाला मिळाली. काजूच्या आकाराच्या बिस्किटांना मागणी आहे. यामुळे हे पदार्थ बनविले जातात. पिठाचा वापर करून त्यामध्ये मीठ व चवीनुसार इतर पदार्थ घालून ते काजूच्या आकारात कापले जातात आणि तळून त्याची बिस्किटे तयार केली जातात. तळून तयार झाल्यानंतर देखील मीठ व साखर सारखे पदार्थ वरून लावून चव वाढविली जाते. लहान मुलांमध्ये काजू बिस्कीट म्हणून हा पदार्थ प्रिय असल्याची माहितीही आम्हाला मिळाली.

Fact Check: गोव्यात बनावट काजू बनविले जातात असा व्हिडीओ पाहण्यात आलाय? जाणून घ्या वस्तुस्थिती
Cook with nain’s Video

यासंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी अशाप्रकारे कृत्रिमरीत्या काजू बनविण्याचे प्रकार झाले आहेत का? याचा शोध घेतला. मात्र आम्हाला तशी माहिती मिळाली नाही. काजू उत्पादन क्षेत्रात १९८३ पासून कार्यरत सुशीलकुमार नाकाडी यांच्याशी संपर्क साधला असता, “व्हायरल व्हिडिओमध्ये साच्यातून काडून तळला जाणारा पदार्थ हा लाल रंगाचा अर्थात बिस्किटासारखाच दिसतो.” असे त्यांनी सांगितले. “शेंगदाणे किंवा इतर पदार्थांचा वापर करून काजू गर बनविण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये पाहावयास मिळत नाहीत. काजूगर पांढरे किंवा मोती रंगाचे असतात. त्यामुळे या व्हिडिओत बनविण्यात आलेला पदार्थ काजूच्या आकाराचा असला तरी काजू गराची नकल ठरत नाही.” असे त्यांनी सांगितले.

आम्ही ‘Spoons of Indore’s च्या इंस्टाग्राम पेज च्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्याकडून प्रतिक्रिया मिळताच हा लेख अपडेट केला जाईल.

Conclusion

बनावट काजू बनवतानाचा असे सांगत व्हायरल झालेला व्हिडिओ प्रत्यक्षात काजू बिस्किट नावाचा स्नॅक्स बनवण्याचा आहे, असे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे.

Result: False

Sources

Self Analysis


Facebook Post by 
Spoons of Indore on March 18, 2023


Youtube video by 
Cook with nain on July 27, 2022


Conversation with Mr. Sushilkumar Nakadi (Cashewnut production expert since 1983)


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular