Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
गोव्यामध्ये ओव्हरलोडिंगमुळे बोट बुडाली.
Fact
हा दावा खोटा आहे. आफ्रिकेतील काँगोमधील गोमा येथे ही घटना घडली आहे.
पाण्यात बोट बुडतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे. दावा केला जात आहे की, ही बोट गोवा येथे बुडाली. काही युजर या घटनेला भीषण अपघात असे म्हणत आहेत तर काहींनी बोट मालकाने क्षमतेपेक्षा जास्त माणसे भरल्याने ही दुर्घटना घडल्याचे म्हटले आहे.



दाव्याचे संग्रहण इथे पाहता येईल.
मराठीच्या बरोबरीनेच हिंदी आणि इंग्रजी भाषेतूनही हा दावा X वर व्हायरल झाला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.



न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Newschecker ने सर्वप्रथम व्हायरल व्हिडिओच्या मुख्य किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला व्हायरल व्हिडिओतील घटना DRC काँगो तसेच लेक किवू येथे घडली असल्याचे सांगणाऱ्या असंख्य पोस्ट आढळल्या.

यावरून सुगावा घेऊन आम्ही संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून Google वर सर्च केला असता काँगो येथे घडलेल्या या घटनेची माहिती देणारे न्यूज रिपोर्ट आम्हाला मिळाले.
BBC ने 4 ऑक्टोबर 2024 रोजी दिलेल्या बातमीत, “डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोच्या पूर्वेकडील किवू तलावावर एक फेरीबोट पोहोचण्याच्या ठिकाणच्या अवघ्या काहीशे मीटर अंतरावर पलटी झाल्याने किमान 78 लोकांचा मृत्यू झाला आहे. ही बोट दक्षिण किवूमधील मिनोवा शहरातून निघाली होती आणि गोमा येथे येत असताना ती बुडाली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये बोट एका बाजूला झुकताना आणि नंतर बुडताना दिसत आहे. प्रादेशिक गव्हर्नरच्या म्हणण्यानुसार जहाजात 278 प्रवासी होते.” असे लिहिले आहे.

Reuters ने 4 ऑक्टोबर 2024 रोजी दिलेल्या वृत्तात आम्हाला समान मजकूर वाचायला मिळाला. “काँगोच्या पूर्वेकडील डेमोक्रॅटिक रिपब्लिकमधील किवू सरोवरात गुरुवारी 278 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटल्याने किमान 78 लोक बुडाले, असे प्रांतीय गव्हर्नर यांनी सांगितले. रॉयटर्सच्या साक्षीदाराने सांगितले की, पीडितांना बॉडी बॅगमध्ये घालून नेले जात असताना नातेवाईकांना अश्रू आवरता आले नाहीत. मोठ्या प्रमाणावर व्हायरल व्हिडिओ फुटेजमध्ये मल्टि-डेक जहाज शांत पाण्यात कालांडताना पाहता येते आणि ते उलटत असताना प्रवाशी पाण्यात पडताना दिसले.” असे ते वृत्त सांगते.

DW News, Al jazeera, AP आणि The Federal सारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यातही व्हायरल व्हिडीओ काँगो येथील असल्याचे म्हटलेले आहे.



अशाप्रकारे ही घटना काँगो येथील असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान व्हायरल दाव्यात संबंधित घटना गोवा येथे झाला असल्याचे म्हटले जात असल्याने आम्ही त्यादृष्टीने तपास केला. आम्हाला गोवा पोलिसांनी यासंदर्भात आपल्या अधिकृत X खात्यावरून 5 ऑक्टोबर 2024 रोजी केलेले ट्विट सापडले.
“अधिकृत स्पष्टीकरण: सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओमध्ये गोव्याच्या किनाऱ्याजवळ बोट उलटल्याचा दावा करण्यात आला आहे. हे खोटे आहे. ही घटना आफ्रिकेतील काँगोमधील गोमा येथे घडली आहे. कृपया असत्यापित बातम्या शेअर करणे टाळा.” असे आवाहन गोवा पोलिसांनीं केले आहे.
Herald TV या गोवा येथील माध्यमाच्या @OHeraldoGoa या युट्युब चॅनेलने 5 ऑक्टोबर 2024 रोजी प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ रिपोर्टमध्ये, “हा अपघात गोवा येथे घडलेला नसून व्हायरल दावा खोटा असल्याचे म्हटले आहे.
यावरून व्हायरल व्हिडिओद्वारे केला जाणारा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात पाण्यात बुडणाऱ्या बोटीचा अपघात गोवा येथे झालेला नसून काँगो येथे झालेल्या अपघाताचा व्हिडीओ खोट्या दाव्याने शेयर केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Google reverse image search
News published by BBC on October 4, 2024
News published by Reuters on October 4, 2024
Tweet made by Goa Police on October 5, 2024
News published by Herald TV on October 5, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
JP Tripathi
November 27, 2025
Salman
November 26, 2025
Kushel Madhusoodan
November 26, 2025