पाडसांना वाचविण्यासाठी हरणाने स्वत:ला चित्त्याच्या हवाली केल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर एक कहाणी व्हायरल झाली आहे. यात एक हरणाला दोन चित्त्यांनी घेरलेले दिसत आहे तर ते चित्ते त्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. दावा केला जात आहे हा फोटो ज्याने काढला तो फोटोग्राफर देखील नंतर डिप्रेशनमध्ये गेला.
पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा फोटो जगातील सर्वोत्कृष्ट फोटो समजला जातो… त्याचं कारण म्हणजे ज्या फोटोग्राफरने हा फोटो काढला नंतर तो डिप्रेशन मध्ये गेला… घटना अशी होती की दोन चित्ते एका हरणीच्या मागे लागले होते… ती हरिण आपल्या पिलासोबत होती, जर आपला जीव वाचवायचा असता तर ती पळून जाऊ शकली असती परंतु तिची पिल्लं तिच्यासोबत येऊ शकली नसती… आपल्या लहानग्यांना एक नवीन जीवन मिळावे म्हणून तीने स्वतःला चित्त्याच्या स्वाधीन केलं… स्वतःचा गळा त्याच्या तोंडात असताना आपली पिल्लं योग्य सुरक्षित स्थळी जावीत याची वाट बघत होती… असं जगात एकच व्यक्ती करू शकते ती फक्त आई!

फेसबुक पोस्ट इथे वाचू शकता

फेसबुक पोस्ट इथे वाचू शकता


Crowdtangle वर देखील 8047 इंट्रेक्शन्स आहेत तर सर्वात जास्त 1500 लाईक्स सखाराम बोबडे यांच्या फेसबुक पोस्टला आहेत.
Fact Check/Verification
पाडसांना वाचविण्यासाठी हरणाने स्वत:ला चित्त्याच्या हवाली केल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या कहाणीचे सत्य काय आहे? हे जाणून घेण्यासाछी आम्ही व्हायरल पोस्टमधील फोटो गुगल इमेज रिव्हर्सच्या साहाय्याने शोधला असता आम्हाला DNAच्या वेबसाईटवर एक बातमी आढळून आली ज्यात म्हटले आहे की, हरणाची शिकार करतानाची छायाचित्रे टिपणाऱ्या फोटोग्राफर Alison Buttigieg ने अफवांचे खंडन केले आहे.

अधिक माहितीसाठी alison buttigieg या किवर्ड्सनी शोध घेण्यास सुरू केली असता आम्हाला फोटोग्राफर alison buttigieg यांची वेबसाईटवरील पोस्ट आढळून आली. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, मी सप्टेंबर 2013 मध्ये मसाई मारा, केनियामध्ये या चित्ता मारल्याचा साक्षीदार होतो. चित्त्याची आई आपल्या लहान पिल्लांना शिकार कशी करायची हे शिकवत होती. पण ते हरणाला मारण्याएेवजी त्याच्याशी खेळत होते. मात्र मादी चित्त्याने हरणाचा गळा घोटला आणि आपल्या पिल्ल्यांना शिकार कसे करायचे ते शिकवले.

याशिवाय आम्हाला Alison Buttigieg यांची फेसबुक पोस्ट आढळून आली. ज्यात, त्यांनी म्हटले आहे की, मी काढलल्या फोटोची बनावट कहाणी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच मी डिप्रेशनमध्ये आहे का याची चौकशी करणारे बरेच फोन मला आले होते. असेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. एलिसन यांनी दोन्ही पोस्टमध्ये डिप्रेशन आल्याचे म्हटलेले नाही.

Conclusion
अशाप्रकारे, आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, पाडसांना वाचविण्यासाठी हरणाने स्वत:ला चित्त्याच्या हवाली केल्याचा व हे फोटो काढणारा फोटोग्राफर डिप्रेशनमध्ये गेल्याचा दावा चुकीचा आहे
Result: Misplaced Context
Our Sources
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.