सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.

सुंठ पावडर हुंगल्याने कोरोना नष्ट होत नाही, व्हायरल झाला चुकीचा दावा
सुंठ कोरोनव्हायरस रोखण्यास मदत करते असा दावा असणारे व्हायरल व्हॉट्सअॅप फॉरवर्डन न्यूजचेकरला एका वाचकाने पाठवले आहे. सुंठ, तिच्या “क्षारीय गुणधर्मांमुळे” कोरोनाव्हायरसचा संसर्ग होण्यापासून रोखू शकते, असा दावा करणारा एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. पण हे खरे नाही, व्हायरल दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

निता अंबानी जगातील सर्वात महागडे पाणी पित असल्याच्या दाव्याने फोटो व्हायरल
सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत असा दावा करण्यात आला आहे की, नीता अंबानी जगातील सर्वात महागडे पाणी पितात, ज्याच्या एका बाटलीची किंमत 44 लाख रुपये आहे. व्हायरल पोस्टमध्ये नीता अंबानी बाटलीतून पाणी पिताना दिसत आहेत. व्हायरल पोस्ट शेअर करत लिहिले की, “नीता अंबानी श्रीमंतांमध्ये आघाडीवर, जगातील सर्वात महागडे पाणी पितात.” याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

भाजप खासदार रवी किशन यांचा जुना व्हिडिओ भ्रामक दाव्यासह व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करुन दावा करण्यात आला आहे की भाजप खासदार रवी किशन यांनी दलितांच्या घरी जबरदस्तीने जेवण केले आणि त्यांना दलितांच्या घामाचा वास आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रवी किशन कारमध्ये बसलेले दिसत आहे. व्हिडिओमध्ये रवी किशन त्याच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला म्हणतात, “तुझ्या घामाचा वास येत आहे, काय बोलावे. पण हे खरे नाही, व्हायरल दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

लागीरं झालं जी’ मालिकेतील अजिंक्यच्या निधनाची अफवा, हे आहे सत्य
‘लागीरं झालं जी’या प्रसिद्ध टिव्ही मालिकेतील अजिंक्य म्हणजेच नितीश चव्हाणचे निधन झाले असल्याचा दाव्याने एक फोटो व्हायरल होत आहे. अनेक युजर्सनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा असल्याचे आढळून आले आहे. शेअरचॅट या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर हा दावा मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.

पाडसांना वाचविण्यासाठी हरणाने स्वत:ला चित्त्याच्या हवाली केले? व्हायरल कहाणीचे हे आहे सत्य
पाडसांना वाचविण्यासाठी हरणाने स्वत:ला चित्त्याच्या हवाली केल्याच्या दाव्याने सोशल मीडियावर एक कहाणी व्हायरल झाली आहे. यात एक हरणाला दोन चित्त्यांनी घेरलेले दिसत आहे तर ते चित्ते त्याचे लचके तोडण्याचा प्रयत्न करत आहेत. दावा केला जात आहे हा फोटो ज्याने काढला तो फोटोग्राफर देखील नंतर डिप्रेशनमध्ये गेला. पण हे खरे नाही, व्हायरल दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.